मनाचे श्लोक – १०१ ते ११०
जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची | म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101|| अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे | देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102|| हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी | […]
