मनाचे श्लोक – ३१ ते ४०
महासंकटी सोडिले देव जेणे | प्रतापे बळे आगळा सर्व गूणे | जयांते स्मरे शैलजा शूलपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||31|| अहिल्या शिळा राघवे मुक्त केली | पदी लागता दिव्य होऊनि गेली | जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||32|| वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा | शशी सूर्य तारांगणे मेघमाळा | चिरंजीव केले जनीं दास दोन्ही […]
