नवीन लेखन...

लेखिका महाश्वेता देवी

महाश्वेता देवी यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाका येथे झाला त्यावेळी ढाका हे भारतात होते. त्यांचे वडील मनीष घटक हे कवी आणि कादंबरीकार होते. त्यांच्या आई धारित्री देवी दखील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. महाश्वेता देवी यांचे शालेय शिक्षण ढाका येथे झाले. भारताच्या विभाजनानंतर त्यांचे कुटुंब आणि त्या पश्चिम बंगाल मध्ये राहावयास आले. त्यानंतर त्या विश्वभारती विद्यालयातील शांतिनिकेतनमधून इंग्रजी घेऊन ग्रॅजुएट झाल्या , कोलकाता विश्वविद्यालयातून इंग्रजी साहित्यविषयातून मास्टर्स डिग्री घेतली आणि त्यांनी पत्रकार , शिक्षक म्ह्णून आपले आयुष्य सुरु केले. पुढे त्यांनी कोलकाता विश्वविद्यालयात इंग्रजीच्या अध्यापक म्ह्णून नोकरी केली. त्यांचा विवाह सुप्रसिद्ध नाटककार बिजोन भट्टाचार्य यांच्याबरोबर झाला होता. त्यांचा मुलगा नाबारून भट्टाचार्य हा देखील कादंबरीकार आणि राजकीय समीक्षक होता . त्याचे २०१४ मध्ये निधन झाले. १९८४ नंतर लेखनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्ह्णून महाश्वेता देवी यांनी सेवानिवृत्ती घेतली.

साहित्यक्षेत्रात महाश्वेता देवी म्हटले की आपल्यासमोर त्याची अनेक रूपे येतात. मेहनत आणि ईमानदारीने त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा समाजावर वेगळा प्रभाव टाकला. त्यांनी स्वतःला पत्रकार , लेखक , साहित्यकार आणि आदोलनकर्त्या म्ह्णून विकसित केले. त्यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने भारतातील अधिसूचित जनजाती, आदिवासी , दलित , वंचित समुदाय हे होते.

महाश्वेता देवी यांनी वेगवेगळ्या मासिकातून लघुकथा लिहिल्या. त्यांनी १९५७ मध्ये ‘ नाती ‘ ही पहिली कादंबरी लिहिली होती. ‘झाँसी की रानी’ ही त्यांची प्रथम गद्य रचना होती. जी १९५६ मध्ये प्रकाशित झाली. इतके लिहिल्यावर त्यांच्या मनात विचार आला की मी कथाकार बनू शकेन. हे गद्य लेखन त्यांनी कोलकत्यात बसून नाही तर सागर , जबलपूर, पुणे, इंदोर , ललितपूर , झाँसी ग्वालियर येथे जाताना लिहिले आहे . ‘नटी’, ‘मातृछवि ‘, ‘अग्निगर्भ’ ‘जंगल के दावेदार’ और ‘1084 की मां’, माहेश्वर, ग्राम बांग्ला हैं ही महत्वाच्या कलाकृतीची नावे अशी आहेत. चाळीस वर्षात त्यांच्या छोट्या छोट्या कथांचे वीस संग्रह प्रकाशित झाले आहेत. आणि त्यांच्या जवळ जवळ १०० कदंबऱ्या बंगाली भाषेत प्रकाशित झालेल्या आहेत.

त्यांच्या काही पुस्तकांची नावे अशी आहेत नैऋते मेघ , अग्निगर्भ , गणेश महिमा , चोट्टि मुण्डा एबं तार तीर , शालगिरार डाके ,नीलछबि (१९८६, अब, ढाका।) , बन्दोबस्ती , आइ.पि.सि ३७५ , साम्प्रतिक , प्रति चुयान्न मिनिटे , मुख , कृष्णा द्बादशी , ६इ डिसेम्बरेर पर , बेने बौ , लुर जन्य , घोरानो सिँड़ि ,स्तनदायिनी, लायली आशमानेर आयना , आँधार मानिक, याबज्जीबन , शिकार पर्ब , अग्निगर्भ , ब्रेस्ट गिभार , डास्ट अन द्य रोड , आओयार नन-भेज काउ , बासाइ टुडु , तितु मीर , ब्याधखन्ड, प्रस्थानपर्ब .

त्यांच्या अक्लांत कौरव, अग्निगर्भ, अमृत संचय, आदिवासी कथा, ईंट के ऊपर ईंट, उन्तीसवीं धारा का आरोपी, उम्रकैद, कृष्ण द्वादशी, ग्राम बांग्ला, घहराती घटाएँ, चोट्टि मुंडा और उसका तीर, जंगल के दावेदार, जकड़न, जली थी अग्निशिखा, झाँसी की रानी, टेरोडैक्टिल, दौलति, नटी, बनिया बहू, मर्डरर की माँ, मातृछवि, मास्टर साब, मीलू के लिए, रिपोर्टर, रिपोर्टर, श्री श्री गणेश महिमा, स्त्री पर्व, स्वाहा और हीरो-एक ब्लू प्रिंट ह्या पुस्तकांचे अनुवाद हिंदी भाषेत झालेले आहेत. त्यांची स्वाक्षरी मी मुबईला त्यांच्या एका पुस्तकावर घेतली. त्यांना पाहिल्यावर मला आपल्या दुर्गाबाई भागवत यांची आठवण झाली अर्थात फरक इतकाच की दुर्गाबाई कधी शासकीय अवॉर्डच्या फंदात पडल्या नाही त्यांनी ते नेहमीच नाकारले.

त्यांच्या कित्येक कथा, कादंबऱ्यांवर चित्रपट बनवले गेले आहेत. त्यांच्या ‘ रुदाली ‘ वर कल्पना लाजमी यांनी चित्रपट बनवला तर गोविंद निहलानी यांनी ‘ हजार चौरासी की माँ ‘ वर चित्रपट बनवला.

त्यांना १९७९ मध्ये साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला. भारत सरकारने त्यांना १९८६ मध्ये पद्मश्री तर २००६ मध्ये पदमविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. १९९६ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार नेल्सन मंडेला यांच्या हस्ते देण्यात आला. ह्या पुरस्काराचे मिळालेले पाच लाख रुपये त्यांनी बंगालमधील पुरुलिया आदिवासी समितीला दिले. ‘ अरण्येर अधिकार ‘ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ती कादंबरी आदिवासी नेता बिरसा मुंडा याच्या आयुष्यावर आधारलेली आहे. १९९७ मध्ये रेमन मॅगसेसे अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला गेला.

२८ जुलै २०१६ मध्ये महाश्वेता देवी यांचे कोलकाता येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..