नवीन लेखन...

लेखिका इंदिरा गोस्वामी

 

इंदिरा रायसम गोस्वामी यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४३ ( काहीजण १९४२ साली म्हणतात ) साली गुवाहाटी, आसाम येथे झाला. त्यांचे खरे नांव होते मामोनी रायसम गोस्वामी . त्या मामोनी बाईडो ह्या नावाने प्रसिद्ध होत्या. इंदिरा गोस्वामी ह्या आसामी साहित्यातील अग्रगण्य नांव आहे. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण शिलॉंग येथे झाले पुढील शिक्षणासाठी त्या गुवाहाटी येथे आल्या. त्याचे पुढील शिक्षण टी. सी.गर्ल्स कॉलेज आणि गुवाहाटी कॉलेजमध्ये झाले.

त्यांचा पाहिला कथांसंग्रह पुस्तक त्याच्या वयाच्या २० व्या वर्षी प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे शिक्षण चालू होते. त्याच्या आत्मचरित्रात्मक ‘ द अनफिनिशड आटोबायोग्राफी ‘ या कादंबरीत अनेक घटना त्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या आहेत. त्यांचे त्याच्या वडलांवर खूप प्रेम होते ते अचानक त्यांचे निधन झाल्यावर त्यांना नैराश्यामुळे आत्महत्या करण्याची इच्छा झाली. कारण त्या एक मुलाखतीत म्हणतात ‘ माय फादर वॉज माय शॅडो ‘ . त्यामुळे त्या अनेक महिने अस्वस्थ होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील होता , तो स्वभाव त्याच्या अनेक पुस्तकातून जाणवतो. त्या देशातील महत्वाच्या लेखिका होत्या. आसामी भाषेत त्यांनी विपुल लेखन केले. तर इंग्रजीत ‘ रामायणा फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्रा ‘ हे महत्वाचे पुस्तक लिहिले. त्या रात्री ३ ते सकाळी ११ वाजेपर्यंत लिहीत असायच्या त्यांनतर इतर कामे सुरु व्हायची. त्या पी. एच . डी . च्या मार्गदर्शक होत्या.

इंदिरा गोस्वामी यांचा विवाह माधवन राईसोम आयंगार ह्यांच्याशी झाला. ते इंजिनिअर होते. त्या त्याच्याबरोबर काश्मीरला गेल्या कारण त्यांचे तेथे एका पुलाचे बांधकाम चालू होते. तेथे गेल्यावर तिथल्या मजुरांची अवस्था , त्यांचे होणारे शोषण पाहुन त्या अस्वस्थ होत होत्या हे त्यांच्या लिखाणातून अनेक वेळा वाचताना जाणवते. दुर्देवाने त्याच्या पतीचे लग्नानंतर अठरा महिन्यात काश्मीर येथे अपघातात निधन झाले . तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि पुन्हा एकदा आत्महत्या करावीशी वाटली , झोपेच्या गोळ्या घेतल्या, त्यांना झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय लागली. त्यांनतर त्या परत आसामला आल्या आणि गुवाहाटीच्या सैनिक शाळेत शिकवू लागल्या. हे सर्व झाल्यावर इंदिरा गोस्वामी परत लिखाणांकडे वळल्या.

काश्मीरमध्ये पतीबरोबर असताना आणि मध्य प्रदेशात त्याच्याबरोबर असताना जे काही पाहिले , अनुभवले हे त्यांच्या ‘ आहिरोन ‘ आणि ‘ द चिनाब्ज ‘ ह्या कादंबऱ्यांतून आले आहे. त्यांचे शिक्षक उपेंद्रचंद्र यांच्या सांगण्यावरून त्या वृंदवानला आल्या. तिथल्या विधवा त्यांचे आयुष्य , त्यांच्या समस्या त्यांना कळल्या त्या सर्व त्यांनी आपल्या’ द ब्लू नेकेड बार्जा ‘ ह्या कादंबरीत लिहिल्या आहे. इंदिरा गोस्वामी यांना भारतातील अग्रगण्य लेखकात स्थान आहे याचे प्रमुख कारण त्या आपल्या विचारांशी प्रामाणिक होत्या त्यांनी जे जे पाहिले , जे जे सोसले त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसते. जे जे केले ते प्रामाणिकपाने केले एक स्वतःचे कर्तव्य म्ह्णून , मनापासून करावेसे वाटले म्ह्णून. आसामी भाषेसाठी , आसामी लोकांसाठी त्यांनी मोकळेपणाने काम केले. त्यांचे नांव भारतात नाही तर मलेशिया , इंडोनेशिया मध्येही आदराने घेतले जाते. इंदिरा गोस्वामी म्हणतात मला माझ्या सर्व लेखनात मला माझे सर्वात आवडते पुस्तक ‘ दोतल हातिएर ओईये खोवा हाउदा ” हे आहे. त्या म्हणत , ” मी रहाते दिल्लीत मला दिल्लीने खूप काही दिले परंतु माझा आत्मा मात्र आसाम मध्येच असतो. आसाममधल्या प्रत्येक समस्येशी मी जोडली गेलेली आहे.” त्यांनी उल्फा संघटना आणि सरकार यांच्यामध्ये शांतीपूर्ण चर्चेसाठी मध्यस्थी केली होती , तसे प्रयत्न केले होते.

इंदिरा गोस्वामी यांची जवळची नातेवाईक मृणाल हिने सांगितले की ‘ बुआ दिल्ली विश्वविद्यालयात साहित्य विभागाध्यक्ष होती. रात्रंदिवस लिहीत असायची. तिने रामायण शोध संस्थांनाची स्थापना केल्यानंतर आपले घरही त्या संस्थानाला दान दिले. नेदरलँड पुरस्काराचे मिळालेले ६२ लाख रुपये हॉस्पिटलसाठी दान दिले .’ इंदिरा गोस्वामी निवृत्त झाल्यावरही त्यांना मानद प्रोफेसरचा दर्जा दिला . इंदिरा गोस्वामी यांना खूप पुरस्कार मिळाले. त्यांना डच सरकारचा ‘ प्रिंसिपल प्रिंस क्लाउस लाउरेट ‘ पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार २००० साली मिळाला , साहित्य अकादमी पुरस्कार १९८३ , असम साहित्य सभा पुरस्कार १९८८ , भारत निर्माण पुरस्कार १९८९ , उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान का सौहार्द्र पुरस्कार १९९२ , कमलकुमारी फाउंडेशन पुरस्कार १९९६ , अन्तर्राष्ट्रीय तुलसी पुरस्कार फ्लोरिडा यू एस ए १९९९ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

त्याशिवाय ” दक्षिणी कामरू”दक्षिणी कामरूप की गाथा ” या कादंबरीवर आधारित हिन्दी टी. व्ही. मालिका बनली होती त्याचप्रमाणे त्याच कादंबरीवर आसामी भाषेत “अदाज्य ” ह्या दोघांना चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार मिळाला . त्या जेव्हा मुबंईत आल्या तेव्हा त्यांचे भाषण आईकले आणि त्यांचे दक्षिणी कामरूप की गाथा हे पुस्तक आधीपासून माझ्याकडे होते , मी ते वाचलेले होते , त्यावर स्वाक्षरी घेतली तेव्हा एक मराठी माणूस आपले पुस्तक वाचतो आणि त्यावर स्वाक्षरी घेतो हे पाहून त्यांना आनंद झाला होता, स्वाक्षरी सोबत त्यानी दोन ओळीही लिहिल्या . मी फक्त त्यांचे डोळे आणि चेहऱ्यावरचे वेगळे तेज पाहून अक्षरशः स्तंभित झालो होतो.

त्यांची सुमारे २८ ते ३० पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी नाबर स्रोत , )नीलकण्ठी ब्रज , अहिरण , मामरे धरा तरोवाल आरु दुखन उपन्यास , दँताल हातीर उँये खोवा हाओदा , संस्कार, उदयभानुर चरित्र इत्यादि , ईश्बरी जखमी यात्री इत्यादि , तेज आरु धूलिरे धूसरित पृष्ठा , मामनि रयछम गोस्बामीर उपन्यास समग्र , दाशरथीर खोज , छिन्नमस्तार मानुहटो , थेंफाख्री तहचिलदारर तामर तरोवाल ह्या कादंबऱ्या लिहिल्या त्याच्या आधा लिखा दस्ताबेज , दस्ताबेजर नतुन पृष्ठा या आत्मकथा आहेत, त्यांनी काही अनुवादही केले त्याची नावे अशी आहेत प्रेमचन्दर चुटिगल्प , आधा घण्टा समय , जातक कथा , कलम , आह्निक .त्यांचे काही कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यांची नांवे आहेत चिनाकी मरम, कइना, हृदय एक नदीर नाम आणि प्रिय गल्पो.

अशा या समाजासाठी जगणाऱ्या विद्वान आसामी लेखिकेचे २९ नोव्हेंबर २०११ रोजी आसामातील गुवाहाटी येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 427 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..