नवीन लेखन...

चतुरस्त्र लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

मराठी लेखक आणि चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म ६ जुलै १९२७ रोजी झाला.

मराठी कवी, गीतकार मा. ग.दि. माडगूळकर यांचे व्यंकटेश माडगूळकर हे धाकटे बंधू होत. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर दीर्घकाळ नोकरीत होते.

आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी ‘माणदेशी माणसे’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.

त्यानंतर गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळीचे दिवस ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, आणि सत्तांतर, ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.

व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ‘कोवळे दिवस’ ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. ‘पुढच पाऊल’ ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.

व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, ‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ आणि ‘बिनबियांचे झाड’ ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. ‘प्रवास एक लेखकाचा’ हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे.

व्यंकटेश माडगूळकरांचे २८ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

लेखक घर बांधतो
व्यंकटेश माडगूळकर यांचा लोकसत्ता मधील लेख.
http://www.loksatta.com/lokrang-news/famous-marathi-writer-vyankatesh-madgulkars-home-312608/

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4386 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on चतुरस्त्र लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

  1. श्री व्यंकटेश माडगूळकर यांची साहित्यीक माहीती सर्वत्र उपलब्ध आहे पण त्यांची कौटुंबिक माहीती कुठेच सापडत नाही. त्यांच्या पत्नी, मुले, नातवंडे ह्याबद्दल कसलीही माहीती नेटवर उपलब्ध नाही. त्यांचे काही आत्मचरित्र वगैरे प्रकाशित झालेले आहे का? असल्यास, कुठे मिळू शकेल ह्याची माहीती मिळाली तर बर हौईल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..