नवीन लेखन...

असे गुरू ! , असेही गुरू !

२. असेही गुरू  : (हल्लीचे )  :

पूर्वीच्या काळीं विद्येला महत्व असे. नीतिसूत्रांत म्हटलेंच आहे, ‘विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व या जगामाजी’. पूर्वीच्या लोकांनी विद्येचें महत्व अशा शब्दामध्ये व्यक्त केलें आहे –

अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम्
अन्नेन क्षणिकातृतिर् यावज्जीवच विद्यया ।

अन्नदान हें श्रेख्ठ दान आहे, पण विद्यादान त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे.  कारण, अन्नानें क्षणभर तृप्ती मिळते , मात्र विद्येनें ती जन्मभर मिळते. विद्या महत्वाची, म्हणजेच,  पर्यायानें, विद्यादान करणारा गुरूही महत्वाचा.

प्रश्न असा आहे की, आज सर्वत्र तशी परिस्थिती आहे कां ? थोडे अपवाद असतील, पण सर्वत्र काय दिसतें ?

काळ बदलला तसें ‘गुरु-जी’ चें अनेक ठिकाणी ‘गुर्जी’ झालें. शालेय शिक्षकांना ‘मास्तर’ म्हणूं लागले, ‘सर’ म्हणूं लागले ( दोन्हीही, इंग्रजीवरून; ‘master’ व ‘sir’ यांवरून ) . कॉलेजमधील लेक्चररनासुद्धा ‘प्रोफेसर’ म्हटलें जाऊं लागलें. पण, गेल्या कांहीं दशकांमध्ये विद्येचें commercialization मात्र झालें. शिकवणार्‍या व्यक्ती विद्येपेक्षा पैशाचा विचार जास्त करूं लागल्या. शिक्षण ही एक सेवा, कर्तव्य, एक श्रेष्ठ कार्य न समजतां , पैशाच्या तराजूत तोललें जाऊं लागलें आहे. असा हिशेब केल्यावर, मग empathy, devotion, dedication वगैरेंचा प्रश्न येतोच कुठे ?

एका उदाहरणानें ही गोष्ट स्पष्ट होईल. एक उदाहरण पुरें . म्हणतात ना,  ‘शितावरून भाताची परीक्षा’.

हें उदाहरण एका parent चें व ‘Special (challenged) persons’ साठी असलेल्या एका इस्टिट्यूशनमधील एका ‘गुरू’चें आहे. नांवांना महत्व नाहीं, मुद्दा महत्वाचा. या parent चा ward (पाल्य)  त्या इस्टिट्यूशनमध्ये जात असे. त्याच्या कांहीं problems ची चर्चा करायला तो / ती  parent त्या संस्थेच्या गुरु-cum-संचालकाला/ संचालिकेला  भेटला / ली . त्याला  / तिला  काय उत्तर  मिळालें असेल – ‘हें आमचें काम नाहीं ’.  या विषयावर आणि अन्यही problems नरमगरम चर्चा झाली, जिच्यात पालक नरम तर गुरू गरम. गुरूनें (इंग्रजीत) या चर्चेचा शेवट असा केला – ‘इथें नको, तुमची काय ती बडबड councellor पुढे करा, तुम्हाला तेंच  आवश्यक आहे’. आपण असें धरून चालूं की, या  ‘गुरू’ला राग आलेला होता, मग त्या रागाच्या योग्यायोग्यतेबद्दल काय असेल तें असो. पण तरीही , एका पालकाशी असें unmannerly वागायचें, असें rude बोलायचें ? आणि तेंही पाल्यासमोर ! ‘गुरू’च्या अशा वागण्याचें-बोलण्याचें कारण काय असावें ,  तर तें म्हणजे, एक ,  हा विचार, ही वृत्ती की, ‘या विषयातलें मला सर्व कळतें, पालकांना काय कळतें ?’ ; आणि दुसरें म्हणजे अशी भावना की, ‘तुमच्या पाल्याला या संस्थेत शिकायची संधी देऊन आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत !’ . जसा विचार, तसा आचार (आचरण) !

आज अनेक शाळा-कॉलेजांमध्ये संचालक आणि पालक यांच्यात संघर्ष होतो आहे, याचेंही कारण तेंच आहे, (अन्य कारणें काय असतील ती असोत ).  तें पूर्वीचे तसे गुरू, अन् हे हल्लीचे असेही गुरू ! !

कुठे ते सांदीपनी, चाणक्य यांच्यासारखे महान् गुरू आणि कुठे हे आजचे  ‘गुरू’ !  (अर्थात् आजच्या युगातही कांहीं चांगले गुरू आहेत ; पण ‘अपवादानें नियम सिद्ध होतो’ या न्यायानें, तें संख्येनें कमी आहेत. यात नवल तें काय ? , कारण हल्लीच्या , विद्येपेक्षा धनाला अधिक महत्व असलेल्या ज़मान्यात ती बाब तशीच असणार ! )  थोडक्यात काय, तर, हल्लीचे अनेक ‘गुरू’ असे असतात की  त्यांच्याबद्दल बोलावें तेवढें कमीच! कंठशोष फोलच ! .

म्हणूनच, अखेरीस म्हणावें लागतें  की  –

क़ाबिल उस्ताद मुक़द्दस, जैसे काबा
अगर नाक़ाबिल हो, तो तौबा तौबा !

जर गुरू, capable असेल, worthy असेल, तर त्याला ( मक्केतील ‘काबा’ प्रमाणें) पवित्र मानावें , श्रेष्ठ मानावें, (त्याला वंदावें) . पण जर गुरू नाक़ाबिल असेल, ( ज्ञान अथवा आचार-विचारानें) capable नसेल , worthy नसेल तर, (तौबा, तौबा!) , अशा गुरूपासून दूरच रहावें ! (तेंच श्रेयस्कर).

सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.

– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..