मराठी लघुकथा लेखक अरविंद गोखले

अरविंद गोखले यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी.पर्यंत झाले. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९१९ रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. १९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. १९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.

‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात १९३५ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बर्यानच कथा, नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत.

स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत; तसेच ना.सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. ’अमेरिकेस पहावे जाऊन’ हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. अरविंद गोखले यांच्या लघुकथांचे ’अरविंद गोखले यांची कथा’ या नावाने संकलन करून ते भालचंद्र फडके यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे. अरविंद गोखले यांचे २४ ऑक्टोबर १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…