सोडून दे अहंकार तुझा
लाचार आहेस आपल्या परि
पूर्ण जीवन तुला न मिळे
न्यूनता राहते कांहीं तरी…१
धनराशि मोजत असतां
वेळ तुजला मिळत नसे
शरीर संपदा हाती नसूनी
मन सदा विचलित असे…२
शांत झोपला कामगार तो
दगडावरी ठेवूनी डोके
देह सुदृढ असूनी त्याचा
पैशासाठी झुरतां देखे…३
उणीवतेचा कांटा सलूनी
बाधा येत असे आनंदी
म्हणून खरे समाधान ते
लाभत नसते मग कधी…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


Leave a Reply