नवीन लेखन...

आपलं (च) म्हातारपण

म्हातारपण असतं नाजूक साजूक
तापून निवणाऱ्या एका काचेप्रमाणे
म्हातारपण असतं दुखरं ठुसठुसतं
उगा सलणाऱ्या शब्दांच्या वेदनांगत

म्हातारपण असतं थकलेलं शीणलेलं
दाट कापडाच्या उसवत्या वीणीप्रमाणे
मन असतं अस्थिर, भिरभिरणारं
तरंगणाऱ्या एका नि:संग पर्णाप्रमाणे

म्हातारे डोळे असतात हळवे
थोड्याशा प्रकाशाने भिरभिरतात
जराशा आपुलकीनेही पाझरतात
किंचित तिरीपीने येते तिरीमिरी
आधाराला अशावेळी लागतं कुणीतरी

म्हातारपण एकटं एकटं असतं
आतुरतेने वाटते हवी कुणाची साथ
आभाळ पेललेले हे समर्थ हात
आज कागद झेलतानाही शरमतात

आहे का परप्रकाशी हे म्हातारपण
परावलंबी, अगतिक, लाजिरवाणं
आग ओकून निद्रिस्त ज्वालामुखीप्रमाणे
कि निष्पर्ण होत जाणाऱ्या वृद्ध वृक्षाप्रमाणे

म्हातारपण असतं साजिरं गोजिरवाणं
मायेच्या मेणागत सहज पाघळणारं
स्निग्ध, शांत निष्पाप नि निरागस
सोबत अनुभवाचे गहिरे श्वास-निश्वास

आम्ही शोधताना मोठेपणाच्या पाऊलखुणा
ठसे उमटवणारी पाऊले मागेच रहातात
भराभरा चढताना प्रगतीच्या पायऱ्या आम्ही
जाणवतही नाही ते स्पर्शणारे आशीर्वादांचे हात

म्हातारपण आपलं हे आपलंच असतं
सतत आपली पाठराखण करतं
निवांत टेकावं कधी तर अचूक गाठतं
विरळ केसांतून, अरळ बोळक्यातून हसत राहतं

उगा धावतो साठवण्या तारुण्याचे कवडसे
दृष्टीआड करुन जवळचे वार्धक्याचे वळसे
विकासत जीवन असे फुलत जाते लोभसवाणे
गडद रुपेरी सुरांनी खुलून येते जीवनगाणे

म्हातारपण असतं संपन्न सिद्ध, द्यावे त्याला काय देता
एक मायेची फुंकर, आपुलकीची ओंजळ नि तेवती कृतज्ञता

– यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..