नवीन लेखन...

अन्नशुद्धि

आजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे.

एक सत्य आपण सर्वांच्या लक्षात राहावे म्हणून ह्याचा उल्लेख येथे करत आहे. वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला ज्यामध्ये दोन छोटी झाडे, जी कुंडीमध्ये लावली होती, त्यांना वेगवेगळ्या खोलीत ठेवले. एक सारखा सूर्यप्रकाश, पाणी …. दिले गेले परंतु त्याचबरोबर एका झाडाजवळ शास्त्रीय संगीत लावले गेले व दुसऱ्या जवळ pop music. आठवडाभर हा प्रयोग केला गेला. त्यानंतरचे निरीक्षण हे होते की ज्या झाडाजवळ शास्त्रीय संगीत लावले होते, ते झाड टवटवीत तसेच फुलांनी बहरलेले दिसले व Pop music लावलेले झाड थोडेसे मलूल झालेले दिसले. आणखीन एक प्रयोग केला गेला शिजवलेल्या भातावर. दोन पारदर्शी डब्यांमध्ये शिजवलेला भात ठेवला गेला. तसेच एका डब्यावर love तर दुसऱ्यावर hate हे शब्द लिहिले गेले. दोन व्यक्तींना त्या डब्याजवळ जाऊन त्याप्रकारचे विचार मनात आणायला सांगितले. सात दिवस सतत तसे विचार केले गेले. सात दिवसानंतर बघितले तर love लिहिलेल्या डब्यातला भातावर थोडी हिरवळ बुरशी आली होती. पण hate लिहिलेल्या डब्यातल्या भातावर काळी बुरशी आलेली दिसली. तात्पर्य असे की भले झाड असो की पदार्थ ह्यांवर आपल्या विचारांचा कळत-नकळत परिणाम होतो. म्हणून म्हटले जाते ‘ जसे अन्न तसे मन आणि जसे मन तसे अन्न’.

आपल्या जीवनातला अन्न हा सर्वात महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. कारण आज अन्नामुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. अन्न शुद्धी म्हणजे सात्विक शाकाहारी भोजन, न शिजवलेले स्वच्छ पदार्थ फक्त एवढेच नाही, भाज्या धान्य स्वच्छ धुवून मगच वापरावे पण त्याचबरोबर मनाची शुद्धी ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये विचारांची स्पंदने बाहेर टाकणारी तीन केंद्रे आहेत. डोळे, हाथ आणि पाय. जेवण बनवण्यासाठी डोळे आणि हाथ ह्यांचा वापर होतो. एखादी व्यक्ती छान स्वयंपाक बनवत असेल तर आपण म्हणतो की ‘ हिच्या हाताला चव आहे.’ पण तेच मसाले, तीच कृती वापरून कोणी दुसऱ्याने तोच पदार्थ बनवला तर त्याची चव वेगळी असते. कारण अदृश्यरित्या विचारांचा मसाला ही त्यात पडत असतो. त्याची चव ही जाणवतेच. विचारांची ऊर्जा अपरोक्ष रित्या आपल्या शरीरावर तसेच मनावर ही काम करते.

बाह्यशुद्धीची जसे आपण काळजी घेतो तसेच आंतरिक शुद्धीवर ही आपण लक्ष ठेवावे. आपण घरामध्ये शिरा बनवतो. हाच पदार्थ देवासाठी बनवला तर तो प्रसाद मानला जातो. घरी बनवला किंवा हॉटेलमध्ये विकला गेला तर त्याला आपण पदार्थ म्हणतो. तीन ही ठिकाणी एकाच पदार्थाचे महत्व वेगळे असते. बनवणाऱ्याची तसेच खाणाऱ्यांची भावना ही वेगवेगळी असते. म्हणून स्वयंपाक बनवणे हे एक काम नाही परंतु फार मोठी जबाबदारी आहे. हृदय परिवर्तनाची सुंदर, प्रेमळ पद्धती म्हणजे अन्न.

आजच्या आधुनिक युगात हॉटेलमध्ये, रेकडीकर किंवा घरामध्येच स्वयंपाक बनवण्यासाठी आचारी…… हे दृश्य दिसते पण जेवण बनवणाऱ्यांची मानसिकता ह्याच अन्नाद्वारे प्रत्येकाच्या मनावर परिणाम करते हे सत्य आज आपल्या ध्यानी नाही. एक राजा होता. एके दिवशी त्याच्या राज्यात गुरूंचे आगमन झाले. राजाला मनापासून वाटत होते की आजची रात्र गुरूंनी माझ्या राजवाड्यात भोजन तसेच आराम करावा. खूप विनवणी केल्यानंतर गुरूंची स्वीकृती मिळाली. राजाने खूप पाहुणचार केला. पंचपक्वान्ने बनवली गेली. गुरु ही राजावर अत्यंत खुश झाले. गुरूंच्या झोपण्याची व्यवस्था अश्या खोलीत केली होती जिथे राजाचा सर्व खजिना ठेवला होता. गुरु जेव्हा त्या खोलीत झोपायला गेले तर त्यांना झोप ही येईना. वारंवार त्यांना तो खजाना चोरी करण्याचे विचार येऊ लागले. त्या विचारांनी ते हैराण झाले. सकाळ होताच राजाला सांगितले की ‘ मला आचाऱ्याला भेटायचे आहे.’ आचाऱ्याबरोबर बोलताना त्यांना समजले की त्या व्यक्तीकडे पैश्याची कमतरता असल्यामुळे दिवस-रात्र चोरीचे विचार ह्याच्या मनात चालतात व त्याचाच परिणाम की गुरूंना सुद्धा तेच विचार आले.

विचार शुद्धी म्हणजेच खरी अन्नशुद्धी. प्रेमाने, शुद्ध विचारांनी, भावनांनी बनवलेले अन्न हे तनाला आणि मनाला पोषक आहार देते. म्हणून स्वयंपाक बनवताना व्यर्थ, नकारात्मक, चिंता अनेक विचारांचा शब्दांचा प्रयोग टाळावा. स्वयंपाक घरात शांतता राखावी. विचारांना श्रेष्ठ बनवणारी गीते, भजन अथवा नामस्मरण ह्यांचा उपयोग करावा. एखाद्याचे मन जिंकण्याचा मार्ग म्हणजे अन्न.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 20 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..