नवीन लेखन...

अंधार पर्व

मागील सुमारे 2 वर्षात अनेक मुखवटे टराटरा फाटले तर काही मुखवटे इतके निर्लज्ज झालेकी त्यांची अवस्था मुखवट्यावर मुखवटा हीच होती.सामान्य माणूस सुरवातीला सर्व लाईटली घेता होता कारण त्याला तसा वस्तुपाठच मिळालेला होता त्यांच्या सो कॉल्ड गॉड कडून. . मग मात्र स्वतःमधील स्वतः शोधण्यात वेळ गेला . मृत्यूने आपले उग्र स्वरूप धारण केले , जवळची माणसे जाऊ लागले तर जवळची माणसे फोन घेत नव्हती कारण त्यांना कोरोनाचा विषय नको होता , मैत्री फक्त भटकण्यासाठी , मजा करण्यासाठी असावी का हा प्रश्न मला पडला. घराबाहेर पडू शकत नव्हतो आणि आजही नाही कारण घरी वडील ९५ वर्षांचे . त्यांचे असे जाणे मला मान्य नाही म्हणून त्यांना जगवण्याची धडपड आजही करत आहे.जगण्यासाठी संघर्ष प्रत्येकाला कार्यकला लागत आहे तो कोणत्या ना कोणत्या रूपात आहे.एखाद्याला फोन केला कसा आहेस तो मजेत म्हणतो , तो स्वतःभोवती पोझिव्हिटीचे कवच करून स्वतःला घेरतो. असली कवचे मला मान्य नाही दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होणे महत्वाचे असते . त्यावेळीस त्याला त्याची गरज असते. रस्त्यातून वेळी अवेळी सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या . समोरच्या स्मशानातील उंच चिमणीतून बाहेर पडणारा धूर , पहाटे पहाटे प्लास्टिक जळल्याचा वास . सगळेच अस्वस्थ करणारे आहे.यातून खरेच बाहेर पडू का किंवा जो कोणी बाहेर पडणार आहेत त्यामध्ये आपण असू का ?अनेक प्रश्न मनात येत असतात, रात्र रात्र जागून आणि दिवस दिवस झोपून काढावा लागतो.म्हणा सगळीच चक्रे उलटी फिरत आहेत.मग आपण कुठे आशावादी असावे कुठे पॉझिटिव्ह असावे. परंतु त्यालाही मर्यादा आहेतच ना .
मी एक अध्यात्मावर बोलणाऱ्याला म्हणालो हे सगळे बघून अस्वस्थ आहेच तेव्हा तो म्हणाला तू कशाला त्यांचा विचार करतो , मोठमोठया साधुसंतांवर बोलणारा माणूस मला झुरळापेक्षा लहान वाटला .अनेकांना जगण्याच्या समस्या , पैशाच्या समस्या तर काहींना सत्तेच्या समस्या. ह्या सत्तेच्या समस्यानी तर इतके किळसवाणे प्रकार केले की जेव्हा देशाचा इतिहास पुढे बसला जाईल तेव्हा माणसुकीवरचा विश्वास उडालेला असेल. यातही औषधे , सामान ह्याचा काळाबाजार करणारे भरपूर आहेत त्यांना आपणच वठणीवर आणले पाहिजे त्याचा सतत अपमान करून पाणउतारा करून .
अनेक डॉक्टर्स , नर्सेस , वॊर्डबॉय मंडळी अहोरात्र काम करत आहेत , तुम्हाला माहीत नाही पुढे खऱ्या मानसोपचाराची गरज त्यांना पुढे लागणार आहे . प्राण जाताना माणसाची होणारी तडफड ते सतत पहात आहेत तर दुसरीकडे , किती माणसे मरतात एरवी असे म्हणणारे निर्लजही आहेतच. त्यातच सत्तेची पोळी कशी भाजली जाते हे पण दिसत आहे.
आपण एक अंधाऱ्या गुहेतून जात आहोत , कधीतरी ही गुहा संपेल तेव्हा मात्र गाफील राहू नका सतर्क रहा पुढील प्रवासासाठी , आतातरी प्रत्येक गोष्ट पारखून घ्या , कुणाच्याही खाद्यावर विश्वासाने डोके ठेवू नका , तो जकधी तुमच्या डोक्याखालचा खांदा काढून घेईल या साठी कुणावरही ‘ निर्भर ‘ राहू नका तर प्रत्येकवेळी ‘ आत्मसिद्ध , स्वयंसिद्ध ‘ होणे आता गरजेचे आहे. आता काळ कठीण आहेच , पुढेही तोड द्यावे लागले हे निश्चित , निदान नवीन स्मशाने बांधण्यासाठी , नवीन टेंडर काढू नका , तर हॉस्पटलस काढा आणि ती सरकारने स्वतः चालवावी नाहीतर परंत व्यापारी ठेकेदार सामान्य माणसाला लुटतच रहातील.
अजून अंधारपर्व संपले नाही, पहाट अजून लांबवर आहे
दुर्देवाने आज तुम्ही माणूस नाही तर एक आकडा आहात .
— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..