नवीन लेखन...

आकाशवाणी पुणे केंद्र

२ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.

गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे… !!!
सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली.
आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक पुणे आकाशवाणीवर वर्षी येत असतात.

मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते,पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या  इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते.

सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत,पालखीवर दरवर्षी “पायी वारी पंढरीची “ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.

या वर्षी पुणे आकाशवाणीने “निवेदक आपल्या भेटीला” या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते.
यात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.पुणे आकाशवाणीचा ब्लॉगदेखील आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2640 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on आकाशवाणी पुणे केंद्र

  1. 6-1-2021 रोजी प्रसारित नाती जोपासताना या विषयावर डॉ प्रतिभा देशपांडे आणि डॉ संजीवनी रहाणे यांचा कार्यक्रम झाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
    22-2-2021 रोजी यांची मुलाखत झाली “जयश्री देशपांडे” कोरोना काळात बंद असतांना वृद्ध मंडळींना डबे पोहचवून त्यांची काळजी घेणे,,, हवं नको ते पाहणे तर यांचा पण फोन नंबर मिळावा ही अपेक्षा
    आकाशवाणी च्या नंबरवर कॉल केला होता पण अजून काही रिप्लाय नाही मिळाला…

  2. आकाशवाणी पुणे केंद्रावरून सादर झालेली पु.लं. च्या भाषणाच्या pen drive मिळतात काय?

Leave a Reply to DEVDATTA HARI DIVEKAR Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..