नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहार भाग १२

आता काय करू?

कोकणात गहू वापरायचा नाही तर
आता काय करू ?
आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे
आता काय करू ?
गहू सोडता येणार नाही.
आता काय करू ?
सुखाची एवढी सवय झाली आहे
आता काय करू?

जसा प्रदेश, तसा आहार
जसा आहार, तशी शरीरयष्टी
जशी शरीरयष्टी, तसे काम
जसे काम, तसा आहार.

ही एक साखळी आहे.
यातील एखादा दुवा बदलता येणार नाही.

जसा देश पंजाब, गहू मुख्य आहार.
गहू मुख्य आहार म्हणून मिळते बलदंड शरीरयष्टी.
पंजाबी जाट मजबूत शरीर, तसे झेपते काम.
कामच एवढे प्रचंड मेहनतीचे,
की आहार गव्हाचाच हवा
आणि
प्यायला लस्सी आणि खायला खवा.

मला गहू आवडतो, मला परवडतो, मी सात्म्य केलाय, आता मी तो खाणार, असे म्हणून कोकणाचे रूपांतर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड प्रदेशात थोडेच होणार आहे ? समुद्र आपली जागा किंवा गाज थोडीच बदलू शकणार बदलणार आहे? ( गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज )
किंवा एकवेळ गहू खाऊन खाऊन सात्म्य केला म्हणून आपले कामाचे स्वरूप थोडेच बदलणार आहे ?

ऊलट जेवढे कमी करता येईल, तेवढे काम आपण कमीच करत आहोत. विज्ञानाच्या सहाय्याने बौद्धिक काम वा शारीरिक श्रम कमीच करत करतोय…..
पण मनःशांती मात्र हरवतोय.

त्यासाठी कमी वेळात जास्त पैश्यासाठी धडपडतोय.. साधने मिळवतोय.

पूर्वी मधुमेह हा बुद्धिजीवी वर्गाचा आजार होता. पण आता कष्टकरी वर्गातही दिसतोय.
आज विज्ञानाने कुकर शेतकऱ्याच्या घरात आणून दिला आणि मागोमाग मधुमेह सुद्धा ! शेतकऱ्याच्या शेतात बैलजोडीच्या जोता ऐवजी टॅक्टर आला.
मागे पैसा वाढला, आणि पुढे पोटही ………

सुखाच्या जेवढे जवळ जातोय, तेवढे सुखापासून आपण लांब जातोय, एक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात महत्वाचे सुख आपण विसरत जातोय. ते म्हणजे आरोग्य.

म्हणून एक सूत्र आमचे ग्रंथकार सांगतात, पळवाटा शोधू नका.
निःसुखत्वम सुखायच……
आत्ता थोडासा सुखाचा त्याग करा, जे अंतिमतः सुखकर असेल.

हे सर्व ज्याच्यासाठी करतोय ते आरोग्यच, (किंवा पुढची पिढी ) जर माझ्या हातून, अगदी देखल्या डोळा, निसटून जात असेल तर, एवढी धडपड करायची तरी कशाला ?

वेगवेगळे आजार आज अगदी दरवाज्यात रांगेत उभे आहेत. एका चुकीच्या वेळी दरवाजा उघडायची खोटी…
तो आत आलाच म्हणून समजा….

पुढच्या पिढी या बंद दरवाज्यापासून अनभिज्ञ आहे.
त्यांनी दरवाजा जवळपास उघडलेला आहे, समोर संकट दिसतंय आणि ही पिढीपण ओरडून तेच विचारतेय,
आता काय करू?

आयुर्वेद दीनपणे साजरा करण्याची वेळ न येवो, या आयुर्वेददिनाच्या शुभेच्छांसह..

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..