नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग १९

मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे.

चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो.

उपवासाच्या विविध व्यंजनामधे जिऱ्याच्या जोडीला आल्याचा मान असतो. पचायला मदत करणारे, अजीर्ण दूर करणारे, पोटाची फुगारी, आमाचा अवरोध दूर करणारे म्हणून आले प्रसिद्ध आहे.

आजीबाईच्या बटव्यातील एक हमखास उपयोगी पडणारे औषध म्हणजे, आल्या लिंबाचे सेंदेलोण पादेलोण हिंग घालून तयार केलेले पाचक.

नुसते नाव घेतले तरी तोंडात लाळेचे लोट तयार होतायत, तर प्रत्यक्षात जीभेवर आले की लाळेचे फव्वारेच तयार होतील.तयार झालेल्या या लाळेमुळे पित्त आणि आल्यामुळे कफाचे अजीर्ण, आणि वात लगेच कमी होतो.

म्हणजेच तीन्ही दोष कमी व्हायला आले धावून आले ! ???

आले पोटात आत जावून काम करतेच, पण कुठेही लचकले, मुरगळले, तरी पहिला घरगुती उपचार आठवतो, तो म्हणजे आल्याचा लेप ! पायाची टाच दुखत असू दे किंवा गुडघ्याला सूज असू दे, आले वाटून लावले कि हमखास वेदना कमी होतात. स्वभावतःच गरम असल्यामुळे, लेप लावण्यापूर्वी पुनः गरम करावे लागत नाही.

लेप लावल्यावर आल्याचा तिखटपणा त्वचेवर क्षोभ उत्पन्न करतो, दाह होतो, उष्ण गुणांनी पदार्थ प्रसरण पावतो, याच नियमांनी त्वचेअंतर्गत असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे त्या अवयवाला तात्पुरत्या स्वरूपात जास्तीची मदत मिळते आणि वेदना कमी केल्या जातात.

अशीच प्रक्रिया प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाच्या लेपाने होते. फक्त वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. कारण काही मसाले त्वचेवर फोड देखील उत्पन्न करतात. पण जायफळ, दालचिनी, कांदा हे मसाले त्वचेवर लेप लावून वेदना कमी करण्यासाठी सेफ झोन मध्ये आहेत.

प्रत्येक मसाला चवीला, तिखट लागला तरी तो प्रत्येक वेळी पित्त वाढवेलच असे नाही. जशी लवंग ! चवीला तिखट असली तरी पित्त कमी करण्यासाठी तिला वैद्यांच्या दुनियेत मानाचे स्थान आहे.

चवीप्रमाणेच एखादा पदार्थ स्पर्शाला थंड असला तरी पित्ताला कमी करतो असेही नाही. जसे फ्रीजमधील मिरची .

आल्यापासूनच पुढे सुंठ बनवली जाते. चांगले जून झालेले आले, चुना लावून वाळवले जाते. आणि सुंठ बनते. आले जरी पित्ताला वाढवणारे असले तरी, सुंठ मात्र पित्ताला कमी करते.

अनुभव आणि वाढलेले वय स्वभावातला तिखटपणा कमी करतोच ना ! फक्त माणसात तेवढा दिसत नाही, जेवढा आल्यात आहे.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.11.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..