नवीन लेखन...

अभिनेत्री एलिझाबेथ टेलर

एलिझाबेथ टेलर हिचा जन्म २७ फेब्रुवारी १९३२ लंडन येथे झाला. तिला लिझ टेलर म्हणून म्हणत असत. मेरेलिन मन्रो, ग्रेटा गार्बो, लिझ टेलर, सोफिया लॉरेन अशा सोदर्यवती अभिनेत्री त्यावेळी हॉलीवूडवर राज्य करत होत्या असेच म्हणावे लागेल. लिझ टेलरचे सौदर्य हाही एक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळी चर्चेचा विषय होता.  ‘ क्लियोपात्रा ‘ मधील गालिच्यांमधून होणारी तिची ‘ एन्ट्री ‘ आजही कोणीही जाणकार विसरू शकत नाही. ती सुखवस्तू कुटुंबात जन्माला आली. त्याचे कुटुंब १९३९ साली लॉस ऍंजिलिसला आले. तिने १९४२ साली ‘ देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट ‘ या चित्रपटात लहानशी भूमिका केली. त्यांनतर तिने १९४४ साली ‘ नॅशनल वेलवेट ‘ या चित्रपटात काम केले. ती त्यावेळी ‘ मेट्रो-गोडवेन-मेयर ‘ या कंपनीची सर्वात लहान आणि सर्वात सुप्रसिद्ध स्टार होती. पुढे १९५० साली तिने पहिल्यांदा मोठ्या मुलीची भूमिका केली ती ‘ फादर ऑफ द ब्राईड ‘ या विनोदी चित्रपटात.

पुढे पुढे तिची लोकप्रियता इतकी वाढली की पैसा आणि चित्रपट याची कमतरता भासली नाही. १९६३ साली तिचा जबरदस्त चित्रपट आला ‘ क्लिओपात्रा ‘ . ह्या चित्रपटासाठी त्यावेळी तिने १ मिलियन डॉलर्स घेतले. मोठे बजेट असणारा ह्या चित्रपटात तिच्याबरोबर होता ‘ रिचर्ड बर्टन ‘ हा आघाडीचा कलावंत. तिथेच त्याचे बहुचर्चीत प्रेमप्रकरण सुरु झाले. १९६४ साली त्यांचा विवाह झाला . त्याआधी तिची चार लग्ने झाली होती. त्याचा हा विवाह दहा वर्षे टिकला . १९७४ साली त्यांचा परत घटस्फोट झाला आणि तिने परत रिचर्ड बर्टनशी १९७५ साली विवाह केला खरा पण तो विवाह जेमतेम एक वर्ष टिकला.

१९५० ते १९९६ पर्यंत तिने आठ वेळा विवाह केले. त्यात दोनदा रिचर्ड बर्टनशी विवाह केला त्यामुळे ती चर्चेत राहिलीच परंतु तिचे चित्रपटही चर्चेत राहिले. तिने रॉक हडसन, रिचर्ड बर्टन,वेन जॉन्सन, मर्लिन ब्रँडो अशा कलाकारांबरोबर काम केले. १९६० नंतर तिचे करियर डळमळीत होऊ लागले. तिचे वजन वाढू लागले आणि ती जेन फोंडा, ज्युली ख्रिस्ती यांची बरोबरी करू शकली नाही. तरीपण १९४२ पासून २००७ पर्यंत ती कार्यरत राहिली . चित्रपटाबरोबर तिने टी. व्ही . मालिकाही केल्या., स्टेज शो देखील केले. ती सतत चर्चेत राहिली ती तिच्या आणि रिचर्ड बर्टन यांच्या प्रेमप्रकरण आणि लग्ने यामुळेच. तिचा शेवटचा पती तिच्यापेक्षा २० वर्षाने लहान होता. ते लग्नही पाच वर्षे टिकले तिचे सौदर्य आणि तिचे डोळे इतके आकर्षक होते की त्याची मोहिनी आजही अनेकांना आहे.

मला आठवतंय मी तिला दोन-तीन वेळा स्वाक्षरीसाठी पत्रे पाठवली. तिनेही प्रत्येकवेळा फोटो आणि स्वाक्षरी पाठवली. माझे मुंबईत एकदा स्वाक्षरीचे प्रदर्शन भरले होते. मी त्या प्रदर्शनामध्ये तिची स्वाक्षरी केलेला फोटो आणि तिच्याबरोबर सोफिया लॉरेन हिचा स्वाक्षरी केलेला फोटो ठेवला होता. मी लांबून बघत होतो एक वृद्ध गृहस्थ ते फोटो बराचे वेळ बघत होते . मी जवळ गेलो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी दिसले. त्यावेळी इंटरनेट आपल्या इथे घरोघरी पोहोचले नव्हते. ते म्हणाले आज पहिल्यांदा तिचा फोटो जवळून बघीतला कारण आजही क्लिओपात्रामधील तिचे डोळे मी विसरू शकलो नाही. शेवटी मी तो फोटो त्याच्या हातात दिला. तेव्हा ते सुखावले आणि धन्यवाद म्ह्णून निघून गेले.

लिझ टेलरने पुढे एच.आय. व्ही . झालेल्यांसाठी खूप मोठे काम केले. तिने एलिझाबेथ टेलर एड्स फॉउंडेशन १९९१ साली स्थापन करून भरीव कार्य केले. पुढे तिची मायकेल जॅक्सन ह्याच्याशी मैत्री झाली. तो तिचा चांगला मित्र बनला. तिला एक मुलाखतीत विचारले होते मायकेल तुझा चांगला मित्र कसा बनला तेव्हा ती म्हणाली एकतर आम्ही दोघेही चाईल्ड आर्टिस्ट आहोत त्याचप्रमाणे तोपण एड्स साठी काम करतो . त्यावेळी मायकेल जॅक्सन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तरी पण ती आपल्या मैत्रीवर ठाम होती. लिझ टेलरला अकँडमी अवॉर्ड्स पासुन अनेक अवॉर्ड्स आणि मानसन्मान मिळाले त्याची लिस्ट बरीच मोठी आहे. लिझ टेलर लक्षात राहिली ती अनेक कारणामुळे क्लियोपात्रा, तिचे आकर्षक डोळे, तिचे समाजकार्य आणि तिची बहुचर्चीत आठ लग्ने . त्याचबरोबर तिला दागिन्यांची प्रचंड आवड होती. तिच्याकडे अनेक दुर्मिळ मौल्यवान हिरे आणि दागिने होते. त्यामुळे लिझ टेलरची ज्वेलरी हा देखील चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होता. आपण यू ट्यूब तिच्या मौल्यवान दागिन्यांचा वीडियो जरूर बघू शकता. अशा लिझ टेलरचे २३ मार्च २०११ रोजी लॉस ऐंजेलिस येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..