नवीन लेखन...

अभिनेते शरद तळवलकर

शरद गणेश तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१८ रोजी नगर जिल्ह्यात बोधेगाव येथे झाला. त्यांचे शेळी शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कुलमध्ये झाला. शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला खूप करायचे. १९३५ साली त्यांनी ‘ रणदुमदुभी ‘ नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला आणि शरद तळवलकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनच्या नाटकात त्यांना आग्रह धरला जाऊ लागला. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातली एक भूमिका आली आणि त्यांच्या ‘ नाट्य विकास ‘ संस्थेत त्यांनी तळवलकरांना बोलवले. नाटकात काम करणे हे त्याकाळात फारशी सन्मान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी त्यांना विरोध केल्यावर शरद तळवलकर यांनी आपले घर सोडले आणि मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला मा. विनायक यांच्या ‘ हंस पिक्चर्स ‘ मध्ये बाबुराव पेंढारकर यांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करायचे ठरवून अकाउंटंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकातून केलेल्या त्यांच्या भूमिका लोकांना आवडल्या, लोकप्रिय झाल्या. शरद तळवलकर यांनी कलाकार , दिग्दर्शक राजा परांजपे यांना गुरुस्थानी मानले होते.
पुढे शरद तळवलकर व्यावसायीक नाटकांतून भादव्या , फाल्गुनराव , कामण्णा , तळीराम , धर्यधर अशा भूमिका करू लागले. १९५२ साली गाजलेल्या ‘ पेडगावचे शहाणे ‘ आणि ‘ लाखाची गोष्ट ‘ या राजा परांजपे यांच्या चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. त्याचप्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘ अखेर जमलं ‘ या चित्रपटात लक्षणीय भूमिका मिळाली.
१९५५ साली आलेल्या ‘ करायला गेलो एक ‘ या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांचे नाव महाराष्ट्रभर केले. तेथून त्यांची यशस्वी वाटचाल चालू झाली . अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरी सोडली. पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर केलेले ‘ अवघाची संसार ‘ , ‘ दोन घडीचा डाव ‘ आणि ‘ याला जीवन ऐसे नाव ‘ हे त्यांचे चित्रपट गाजले. १९६२ साली आलेल्या ‘ रंगल्या रात्री अशा ‘ या चित्रपटात त्यांना आव्हानात्मक भूमिका मिळाली. ‘ बायको माहेरी जाते ‘ या चित्रपटात त्यांची विनोदी भूमिका खूप गाजली. त्यांनी संशयकल्लोळ , लग्नाची बेडी , अपराध मीच केला , दिवा जळू दे सारी रात , भावबंधन , ह्या नाटकातून कामे केली तर घरोघरी हीच बोंब , अप्पाजींची सेक्रेटरी अशा नाटकातून इरसाल भूमिकाही केल्या. त्यांचा मी एकच प्याला मधील तळीराम जेव्हा पहिला तेव्हा त्यांचा एक हात वर करून ‘ थोडीशी घेतो ‘ हे सांगण्याचा अभिनय लाजवाब असे. शरद तळवलकर यांचे ‘ लग्नाची बेडी ‘ या नाटकातील काम इतके इरसाल होते की सुदैवाने आजही आपण आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते बघू शकतो.
शरद तळवलकर यांनी मुबईचा जावई , आली अंगावर , नवरे सगळे गाढव , चांदणे शिंपीत जा , थोरली जाऊ , गडबड घोटाळा यातील विनोदी भूमिका गाजल्या होत्या. ‘ धुमधडाका ‘ मधील शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा सीन कोणीही विसरू शकत नाही. एकटी , लेक चालली सासरला या चित्रपटातील त्यांच्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. शरद तळवलकर यांनी १६० हुन अधिक चित्रपटातून कामे केली.
त्यांचे डार्लिग डार्लिग , सखी शेजारणी ह्या नाटकाचे प्रयोग चालूच होते आणि त्यांना आजाराने गाठले. तरी पण त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. माझा एक मित्र त्यांना भेटायला गेला तेव्हा तो बिचारा शांतपणे आत गेला , शरद तळवलकर डोळे उघडून त्याला हसून म्हणाले ‘ अरे अजून आहे मी ‘ आणि मग त्याच्याशी त्यांचे बोलणे सुरु झाले. त्यांच्या तोडून त्यांचे किस्से ऐकणे म्हणजे धमाल होती. एकदा ते एका मुलाखतीत म्हणाले होते , ‘ माझे लग्न स्मशानात ठरले जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरु झाला.’ त्याची कथाही अजब आहे.
शरद तळवलकर यांना एकटी , मुंबईचा जावई , जावई विकत घेणे आहे , रंगल्या रात्री अशा , धूम धडक , लेक चालली सासरला तू तिथे मी ह्या चित्रपटासाठी अवॉर्ड्स मिळाली होती.
शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते.
अशा या चतुरस्त्र अभिनेत्याचे २२ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले..
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..