नवीन लेखन...

आहाररहस्य १२

आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले.

देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले.

म्हणजे, मी जे तेल लहानपणापासून खात आलोय ते मला कसे पचवायचे, ते माझ्या शरीराला माहीत असते. त्यासाठी विशिष्ट कष्ट घेण्याची शरीराला गरज वाटत नाही. पण जेवणातले साधे तेल जरी बदलले तरी आधीपासून ठरवलेला सगळा कार्यक्रमच बदलून जातो. आणि नवीन संकटाला सामोरे जावे लागते.

एक पाहुणा काही कल्पना न देता, अचानक घरात आला तर, घरच्या अन्नपूर्णेची काय तारांबळ उडते हे तिचे तिलाच माहीत ! नवीन एडजेस्टमेंट करता करता नाकी नऊ येतात.
“त्या पाहुण्याला मीच बोलावले आहे”, हे घरात सांगायला विसरलेल्या नवर्‍याला, “तिचे” दुःख काय कळणार आणि कसे कळणार ?

जावे त्याच्या पंथा तेव्हा कळे….
असो..

समजा माझी मारूती अर्टीका आहे. ती काही कारणाने बंद पडली. म्हणून माझ्या मित्राची मारूती अर्टीगाच मी चालवायला घेतली तर सुरवातीला काय होते ?

माझ्या मते ती गाडी माझ्यासाठी नवीनच आहे. ( वापरून वापरून जुनी खटारा झालेली असली तरी देखील ) मित्राची आहे, चालवताना आधीच जरा जपून स्टार्टर मारेन.

त्याही आधी गाडीच्या सीटची हाईट, स्टीयरिंग पोझीशन, बॅकरेस्ट, ब्रेक सेटींग, एक्सलेटर सेटींग, क्लच सेटींग, मिरर, वायपर हे सगळं तपासून बघतो.

काही बदल हवा असेल तर, तसे करून घेतो. एक दोन तीन वेळा स्टार्टर मारताना पाहून मित्राच्या चेहर्‍यावर कारूण्ण्याच्या भावना बंद काचेतून मला स्पष्टपणे दिसत होत्या.
(पण बिचारा करणार काय ?ज्याचे दुःख त्याला )

शेवटी गाडी सुरू होऊन हळुहळू पुढे जातेय, माझा पाय ब्रेक वर असा काही पडतो की मागून गाडी वरच ऊचलली जातेय की काय. “काय नाही, काय नाही” म्हणत गाडीमागे धावत आलेल्या मित्राला खुणेनच परत जा म्हणून सांगत असतानाच ब्रेकचा पाय एक्स्लेटरवर पडतो. आणि गाडीचा घोडा होतो
मित्र रामराम म्हणत परत जाताना मिरर मधे मला स्पष्ट दिसते.
आणि एक ऊसळी मारून का होईना गाडी एकदाची मार्गस्थ होते.

गाडी त्याच कंपनीची, तेच माॅडेल तेच मॅन्युफॅक्चरींग ईयर पण गाडी चालवताना किती अॅडजेस्टमेंट कराव्या लागतात, हे बाजूच्या सीटवर बसून, सूचना देत देत, केवळ गंमत पाहणारीला काय समजणार ?

अगदी तस्संच शरीरात होतं. नेहेमीचे सरावाचे तेल आज आत न येता, नवीन ब्रॅण्ड आत आला तर आत काय धावपळ होत असेल ?
हे तेल पचवायला कोणाकडून किती एन्झाईम्स घ्यायची? त्यासाठी कोणाची मदत घ्यायची ? न पचलेल्या, शिल्लक तेलाला बाहेर कसं काढायचं ?

हे सर्व ठरवताना काही वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष देखील होत असेल, मरूदेत आधी आपल्याला जे माहीत आहे, तेच आधी पचवून घ्यावं, बाकीचं वेळ मिळेल तेव्हा, वरून आदेश कसा येतोय त्यावर ठरवू असं म्हणत, सायडींगला ठेवलं जातं.
आणि हे सायडींगला पडलेलंच, एक दिवस अचानक संप करतं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

ज्याचं दुःख त्यालाच कळतं. हेच खरं.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
02.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..