नवीन लेखन...

इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

दक्षिण अमेरिकेतले अर्जेंटिना, चिले हे सुंदर देश पाहिले, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण इमारती, ठिकाणे, तळ्यातला प्रवास सगळे पाहिले, अनुभवले. दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा ! त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’. या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान. हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला.


“आम्ही दक्षिण अमेरिकेला जाणार आहोत “असे जाहीर केले मात्र, सगळीकडून सूचनांचा मारा सुरू झाला.

“अग, तिथे जाण्यासाठी यलो फिवरचे इंजेक्शन घ्यावे लागते, आणि त्याचा इतका त्रास होतो म्हणे की…..”(या सल्ल्याबरोबर डोळे मोठ्ठे करणे, मान वेळावणे,तोंडावर हात घेणे वगैरे सगळे होते)

“अग, ते इतके दूर आहे की जाता जाताच कंबरडे मोडून जाते….”

“जसं काही चालतच जाणार आहे ही…विमानाने जावे लागते तिथे……” परस्पर उत्तर आलेच.

“न्यूयार्कची अमेरिका माहीत आहे, हा कुठला देश?….”

“तिथे जाणे सेफ आहे ना? नीट सगळी चौकशी केलीत ना?”

“कित्ती ठिकाणी भटकून झालं, तरी हिचं मन काही भरलं नाही अजून”…

शेवटचा टोला आईसाहेबांचा पडला व आमच्या तयारीला वेग आला. भराभर सामान गोळा करून ’अनुभव’ च्या प्रवासी कंपनी बरोबर आम्ही निघालो सुद्धा.

दक्षिण अमेरिकेतले अर्जेंटिना,चिले हे सुंदर देश पाहिले, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण इमारती, ठिकाणे,तळ्यातला प्रवास सगळे पाहिले, अनुभवले. दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा !त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’.या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान.हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला. इथे माचूपिचू आहे इतकीच माहिती होती .पण माचूपिचूबरोबरच कोरीकांचा, सॅक्सेवमन, इन्कांचा राजवाडा, भले मोठे कॅथेड्रल अशी असंख्य ठिकाणे इन्का संस्कृतीची माहिती देण्यासाठी उत्सुक आहेत ह्याची कल्पना नव्हती.

पेरू या देशातील आमचा प्रवेश राजधानीचे शहर लीमा मधून झाला. पेरूमध्ये बरंच काही बघायला मिळणार होतं असं गाईडमहाशय भारत सुटल्यापासून सांगत होते. त्यामुळे कधी एकदा पेरूमध्ये प्रवेश करतो असे झाले होते.पेरूमधला आमचा प्रवेश राजधानी लीमा मधून झाला. आखीव रेखीव रस्ते, छान टुमदार बंगले,बागा यांनी नटलेले लीमा खूपच छान आहे. हवा आल्हाददायक होती, पावसाची बारीक सर मधूनच येऊन झाडॆ, फुले, इमारती स्वच्छ ,चकचकीत करीत होती.त्यामुळे लीमामधील स्थळे बघताना तर खूपच मजा येत होती. दोन दिवस तिथे फिरून लीमाहून पेरूतील दुस-या महत्वाच्या शहरात–कुझ्कोला आम्ही विमानाने आलो .ती सायंकाळची वेळ होती. पावसाची भुरभुर चालू होती, हवेत सुखद गारठा होता. कुझ्को ११००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. विमानतळ अगदी साधासुधा, गावाच्या अगदी मधोमध. आमचे विमान टॅक्सीवेवर जाण्यासाठी वळले तर भिंतीपलीकडच्या घरांना विमानाचा पंख लागेल की काय अशी भीती वाटावी इतकी बाहेरची घरे जवळ ! गंमत म्हणजे बरीचश्या घरांच्या बाहेरच्या बाजूच्या भिंती विटा दाखवणा-या बिना गिलाव्याच्या होत्या. घरांवरचा कर कमी बसावा म्हणून अशी अर्धवट बांधकाम झाल्यासारखी घरे ठेवतात म्हणे. घरे १-२ मजलीच होती. पत्र्यावर लहान मुले मजेत पतंग उडवत होती. हस-या चेह-यांनी हात हलवून त्यांनी केलेले आमचे कुझ्कोतील स्वागत खूप म्हणजे खूप आवडले.

2 Comments on इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..