नवीन लेखन...

वाजवा वाजवा.. टाळ्या वाजवा…

कलर्स वाहिनीवर सध्या एक मालिका चालू आहे. या मालिकेची सुरुवात गेल्या वर्षी १ एप्रिल २०१९ पासून झाली. ‘जीव’ जडला, वेडा पिसा झाला की; अजून काय घडणार? हे कळण्यासाठी आपण मालिका पहातच राहतो.

आता दिड वर्ष होऊन गेलंय. गुंड असलेला शिवा आता सुधारला आहे. सुशिक्षित सिद्धीने त्याच्यात आमूलाग्र बदल करुन त्याला एकदम ‘जंटलमन’ करुन टाकलंय. शिवाचे वडील बरेच महिने झाले, सातारला गेलेले आहेत.

घरात आत्ता आठजणं राहतात. शिवा, त्याची आई, बहीण व सिद्धी. शिवाचे काका, काकू व त्यांची नेहमी घरातच असणारी दोन मोठी मुलं. शिवाची काकू ही स्वयंपाकघर सांभाळते आणि हिंदी चित्रपटातील खलनायक ‘प्राण’ सारखा दिसणारा काका जेव्हा पहावं, तेव्हा मंगल लष्करेंबरोबर ‘वहिनी, वहिनी’ करत मागे मागे फिरतो. हा काका कधीही काही कामधंदा करत नाही. हे दोघं दिवसा, रात्री, मध्यरात्री, घरात, घराबाहेर नेहमी खलबतं करतानाच दिसतात. त्यांचा विषय देखील ठरलेलाच असतो, ‘राजाभाई टाॅवरला घराबाहेर काढण्याचा!’ शिवाची आई, मंगल सदानकदा नटूनथटून आपल्या मोबाईलमध्ये चित्रपट पहात असते. ती खुशीत आली की, ‘वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा’ व चिडल्यावर ‘मंगलचा अडकित्ता चाले कट कट कट…’ म्हणते.

आत्याबाई गावातील बडं प्रस्थ आहे. नटसम्राट नाटकामध्ये अप्पासाहेब बेलवलकर आपल्या पत्नीला ‘सरकार’ म्हणतात, इथे आत्याबाई राजकारणी असल्यामुळे आपल्या चिरंजीवांना ‘सरकार’ म्हणतात. आत्याबाईबरोबर आता तिची एक जुनी मैत्रीण राहते आहे..’चंपा’! हिला पाहिलं की, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंगचीच आठवण होते. या संपूर्ण मालिकेत लक्षात राहतो, तो एकच माणूस… भावे!

भावे हा आत्याबाईंचा सेक्रेटरी आहे. जिथं आत्याबाई, तिथं काखेत काळी हॅण्डबॅग घेतलेला भावे दिमतीला हजर असतोच. कायम सफारी ड्रेसमधील भावे हा आत्याबाईंच्या पुढे हांजी हांजी करणारा केविलवाणा प्राणी दिसतो. तो त्यांचा फक्त सेक्रेटरीच नाही तर सल्लागारही आहे. आधी तो आत्याबाईंचं बोलणं ऐकून घेतो आणि मग स्वतःचे मत सांगतो. प्रसंगी आत्याबाई कितीही चिडल्या, रागावल्या तरी भावे जागचा हालत नाही. अशावेळी भावे संवादातून बोलण्याऐवजी डोळ्यांतून बोलतो. भावेला जेव्हा शिवाच्या वाड्यावर सिद्धीला निरोप द्यायला पाठवलं जातं तेव्हा त्याचा रूबाब पहाण्यासारखा असतो. तो मोजकंच बोलून सर्वांचा कचरा करतो. आत्याबाईंच्या ‘सरकार’ने चेष्टा मस्करी केली तरी स्मितहास्य करुन गप्प बसतो. सरकार दरबारी असे अनेक ‘भावे’ साहेबांच्या मागेपुढे दिसतात. मालिका लेखकाने ‘भावे’ छान उभा केलाय व त्या कलाकाराने त्या भूमिकेत खरोखरच ‘जीव’ ओतलाय…

© – सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१७-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..