नवीन लेखन...

विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

बुधवार २८ डिसेंबर २०११.

 

 

ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशीश्यते ||

 
अर्थ :: (एका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मिती झाली आहे तरी ब्रम्ह परिपूर्णच आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 
ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

 
हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

 
पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला वरील श्लोक, ब्रम्हाच्या पूर्णत्वासंबंधी आहे. आता ब्रम्हाची संकल्पना समजणे फारच कठीण आहे. विद्वान प्रवचनकार, ब्रम्ह या विषयावर तास-दोन तास प्रवचन देतात.पण ऐकणार्‍यांपैकी किती व्यक्तींना ब्रम्ह म्हणजे नक्की काय हे समजते? प्रवचनकारालाही ते कितपत कळले असते? तर्कच केलेला बरा.

 
मी, या श्लोकाचा विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

 
हा श्लोक सजीवांच्या मातेला देखील लागू पडतो, कसा तो ध्यानात घ्या.

 

 

 

 

 

 
हा श्लोक वनस्पतींच्या वाढीला देखील लागू पडतो. झाडाला अनेक वर्षे फळे येतात, प्रत्येक फळात अनेक बिया असतात. त्या बिया जमिनीत रुजल्या की त्याच प्रजातीची झाडे निर्माण होतात. या झाडांनाही अनेक वर्षे फळे येत राहतात. जनक आणि जात झाडेही परिपूर्ण असतात. या सर्व झाडांनाही स्वतंत्र अस्तित्व असते. एका झाडाची लहानशी फांदी तोडून ती ओलसर जमिनीत खोचली तर काही दिवसांनी तिला मुळे फुटतात, पाने आणि फुलेही येतात. जनक आणि जात कलम स्वतंत्रपणे वाढतात, परिपूर्ण असतात.

 

 
या श्लोकासंबंधी, आणखी एका दृष्टीकोनातून विचार करता येतो.

 
सर्व सजीव जिवंत पेशींचे बनलेले असतात. नराचा शुक्राणू आणि मादीचे बीजांड यांचा संयोग झाला की गर्भपिंड निर्माण होतो. या मूळ पेशीचे अनेक वेळा विभाजन होऊन नवीन जिवंत पेशी निर्माण होतात. प्रत्येक पेशीचे, सजीवाच्या शरीरातील स्थान आणि कार्य ठरलेले असते. यासाठी, त्या मूळ पेशीत असलेल्या आनुवंशिक तत्वात असलेल्या जनुकीय आज्ञावलीनुसारच वाढ होते. केवळ ३८ आठवड्यातच, मानवी बालक जन्म घेते. त्याच्या शरीरात, एक या अंकावर १४ शून्ये मांडली तर जी संख्या होते, तितक्या पेशी असतात. या दृष्टीकोनातून, मला अभिप्रेत असलेला, या श्लोकाचा अन्वयार्थ असा –

 
सजीवांची एक जिवंत पेशी परिपूर्ण असते. या पूर्ण पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते. तीही परीपूर्णच असते. परिपूर्ण अशी दुसरी पेशी निर्माण झाली तरी जनक पेशी पूर्णच असते, दुसरी पेशी, म्हणजे जात पेशी, पहिल्या पेशीपासून निर्माण झाली असली तरी ती तिसरी परिपूर्ण पेशी निर्माण करू शकते. जात पेशी परिपूर्ण असली तरी जनक पेशी पूर्णच शिल्लक राहते.

 

 
हा श्लोक सजीवांच्या आनुवंशिक तत्वास आणि आनुवंशिक आज्ञावलीस तंतोतंत लागू पडतो. या आनुवंशिक तत्वामुळे सजीवांच्या जिवंत पेशी निर्माण होतात. पेशींचे विभाजन होउन अनेक पेशी निर्माण होतात. मातेच्या गर्भाशयात मूळ पिंडपेशीपासून विभाजनाने एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशी वाढ होउन बालक म्हणजेच जात सजीव जन्म घेतो. वाढीव पेशी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हाडांच्या पेशी वेगळ्या, ह्र्दयाच्या पेशी वेगळ्या, ज्ञानेंद्रियांच्या पेशी वेगळ्या वगैरे वगैरे…प्रत्येक पेशीला, शरीराच्या कोणत्या भागात स्थिर व्हायचे हे माहित असते. आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञावलीमुळे हे सर्व ठरलेले असते. एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते तरी दोन्ही पेशी परिपूर्ण तर असतातच, पण त्या दोन्ही पेशी स्वतंत्रपणे कार्य करू शकतात.

 
या श्लोकात अभिप्रेत असलेली, ब्रम्हापासून सृष्टी निर्माण झाली आहे, विश्वनिर्मिती झाली आहे, ही संकल्पना, अध्यात्मिक भाषेत सांगितली आहे. ती विज्ञानीय भाषेत देखील सांगता येते.

 
सुबुद्ध वाचकहो माझ्या या लिखाणावर मनन करा आणि कृपया आपले बहुमोल मत कळवा.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..