नवीन लेखन...

गंगाखेडची देहदान चळवळ

गंगाखेड! परभणी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. पण राजकीय दृष्ट्या नेहमीच खळबळजनक. आणि मयताचे १०वा, १२वा करण्याचे पंचक्रोशीत एकमेव ठिकाण. म्हणून गंगा, कावळे आणि मावळे मोठ्या प्रमाणात. संत जनाबाईचे हे जन्मस्थान!

अश्या या गंगाखेड मधे एक अवलीया भेटला, Shankar Ingale !!

सणावाराचे दिवस, विधानसभेच्या ज्वालामुखीवर बसलेला महाराष्ट्र. आणि या धामधुमीत या अवलीयच्या डोक्यात मात्र अवयवदान/देहदान जनजागृती. त्या साठी या पठ्ठ्याने रेस्टहाऊस बुक केले. 100 एक लोकांना आमंत्रित केले. तसं मला सांगत गेला. मी दुरून प्रोत्साहन देत गेलो. आणि बैठकीच्या आदले दिवशी रात्री फोन करून विचारतो, “डावरे सर, उद्या सकाळी येऊ शकता का?”

आता याच कामात स्वतःला वाहून घेतल्याने नकार देण्याचा विषय नव्हताच. पण 8 दिवसापासून तयारी करणारा हा माणूस नेमकं आदले दिवशी का विचारतो.? तर काही नाही, फक्त गडबड्या रामू. इतकंच म्हणता येईल!

सकाळी गंगाखेडला पोचलो. त्याने 100 एक लोकं बोलावले असले तरी विषय आणि सण लक्षात घेता 10 एक लोकं येतील ही माझी अपेक्षा फोल ठरली जेंव्हा बैठकीला 35/40 जण आले तेंव्हा. बैठक झाली.

बैठकीच्या सुरुवातीलाच मला बोलायला उभं केलं. मी बोललो. अवयवदान आणि देहदान या मधला फरक सांगितला. नेत्रदाना सारख्या चळवळीत भारत किती मागे आहे आणि श्रीलंका सारखा छोटा देश किती प्रगत आहे हे सांगितलं. बैठकी नंतर कुणाला काही शंका असतील तर विचारा! असं जेंव्हा म्हणालो तेंव्हा मात्र उपस्थितां पैकी 90% लोकांनी शंका विचारल्या. त्यांचे माझ्या परीने मी निरसन केलं. मोबाईल no देऊन कधीही call करा म्हणालो!

आता या वर पोस्ट लिहावे वाटण्याचे कारण म्हणजे, गंगाखेड सारख्या ग्रामीण भागात ही चळवळ जोर धरते आहे आणि शहरी भागात मात्र प्रचंड उदासीनता आहे.का? अन्नधान्य मिळवण्यासाठी देश ग्रामीण भागा वर विसंबून आहे तर आता मेडिकल कॉलेज ला लागणाऱ्या देहा साठी देखील ग्रामीण भागावर विसंबून राहणार का.? अवयव दानात अग्रेसर भूमिका घेत असला तरी त्या सुविधा सरकार पुरवणार का.? 75 मेडिकल कॉलेजेस ची सरकार घोषणा करतं पण देहदान चळवळी बाबत इतकी अनास्था का दाखवतंय.? काही ठिकाणी नवीन शिकणारी मुलं ही मानवी देह मिळत नाही म्हणून “रबरी देहा” वर शिकत आहेत. त्या विद्यर्थ्याचा जेंव्हा “डॉक्टर” होईल तेंव्हा तो खरच योग्य इलाज करू शकेल का.? मग चुकीच्या उपचारामुळे डॉक्टर ला मारहाण! अश्या बातम्या आपण वाचत राहायच्या का.? हे आणि असे खूप सारे अनुत्तरित प्रश्न घेऊन गंगाखेड सोडलं. होईल लवकरच सुधारणा! या आशेवर…..

तळ टीप :– “काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!!

— विनोद डावरे, परभणी
08-09-2019

#सहजच सुचलं – 108

विनोद डावरे
About विनोद डावरे 14 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..