नवीन लेखन...

झापडं काढा सुनिल, सचिन

22.02.19

पुलवामा येथील भारतीय CPRF च्या जवांनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमुखी पडले. यामागे पाकिस्तानचा हात आहे, हें सांगायला कुणां डिफेन्स-एक्सपर्टची किंवा राजकीय विश्लेषकाची, आवश्यकता नाहीं. गेल्या कांहीं भारत-पाक युद्धांमध्ये भारतानें पाकला ‘सॉलिड ठोकलेलं’ आहे. त्यामुळे, कन्हेन्शनल् युद्धांत भारतासमोर आपला टिकाव लागणं कठीण, हें पाक पुरतं जाणून चुकला आहे. १९७१ची त्याची जखम अजून भळभळते आहेच. अणुबाँब भारत व पाक दोघांकडेही आहेत. त्याचा वापर केला गेला तर भारताला धक्काच पोचेल ; मात्र पाकिस्तान पुरता बेचिराख होऊन जाईल, त्याचा नि:पात होऊन जाईल, इतका की अनेक दशकें त्याला उभें रहाणेंही कठीण होऊन जाईल. त्यामुळे, एकीकडे पोकळ डरकाळ्या फोडत, आंतून दहशतवादाला खतपाणी घालणें, ही पाकिस्तानची नीती आहे, हें एखादें दुधखुळें पोरही सांगेल.

सगळा देश याप्रसंगीं हुतात्म्यांचा सोबत आहे आणि भारत सरकारच्या बरोबर आहे. भारत सरकारनें पाकिस्तानशी विविध पातळ्यांवर संबंध तोडायला सुरुवात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय फोरम्स् मध्ये पाकवरील दबाव वाढवला आहे, हें नक्कीच स्तुत्य आहे. त्याबद्दल सरकारची स्तुती करावी तेवढी थोडीच ! संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रांमधील पाकिस्तानी व्यक्ती या स्वत: दहशतवादाला खतपाणी घालत नसतीलही, पण त्यांचा बॉयकॉट् करून पाकिस्तान या देशाला ठोस अणि सज्जड संदेश देणें गरजेचें आहे. (ओल्याबरोबर सुकेंही जळतें, पण त्याला इलाज नाहींच ! ). कांहीं दशकांपूर्वी अॅपरथीड् वरून दक्षिण आफ्रिकेला जगानें एकटें पाडले होते, आणि त्या देशाच्या खेळाडूंना कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळात भाग घेण्यांस बंदी घातलेली होती, हें उदाहरण विसरतां कामा नये. जे कोणी तें विसरत असतील, त्यांना त्याची जाणीव करून देणें आवश्यक आहे.

आय्. सी. सी. , आय्. ओ. ए. यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांना ही गोष्ट ध्यानांत घेणें सोयीचें वाटत नसेल तर नसो, भारतानें त्यांना अजिबात भीक घातली नाहीं पाहिजे. आतां भारताच्या खेळाडूंना आय्. ओ. ए. बॅन् करणार आहे म्हणे . त्या बायस् बद्दल त्या संघटनेवर कदाचित् आंतरराष्ट्रीय फोरम मध्ये केस् सुद्धां करतां देईल. तो मार्ग सरकारनें एक्सप्लोअर् करायला हवाच .

या विषयावरून , बी. सी. सी. आय्. नें, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मॉचेस् मधून बॅन करण्यांबद्दल, आय्. सी. सी. ला पत्र धाडलें आहे. यावरून, त्यांना जनक्षोभाची कल्पना आलेली आहे, असें दिसतें. पण इकडे श्रीयुत मनोहर सांगताहेत , ‘आय्. सी. सी. च्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणें असें प्रॉव्हिजन नाहीं’ म्हणून. अहो मनोहर, जागे व्हा, तुमची आय्. सी. सी. ची हॅट काढा, आणि वकिली हॅट चढवायची असलीच तर, ‘काय शक्य नाहीं’ हें सांगण्यांपेक्षा, ‘जें करायला हवें तें करायला कोणता लीगल् मार्ग चोखाळतां येईल’, तें सांगा.

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांची विधानें या सार्‍या पार्श्वभूमीवर पहायला हवीत. दोघेही क्रिकेटमधील बड्या आसामी ! एक तर भारतरत्न ! वर्ल्ड् कप संबंधी हे दोघेही सज्जन सांगताहेत की भारतानें त्याअंतर्गत मॅच पाकशी खेळावी ! कां तर म्हणे, ही मॅच् जिंकून भारताला दोन पॉइंट मिळतील, आणि तेंच पाकिस्तानला योग्य उत्तर ठरेल. अरे ! म्हणजे, ही मॅच् भारतच नक्की जिंकणार आहे, हें या सद्.गृहस्थांना आधीच माहीत आहे की काय ? क्रिकेट हा खेळ असा आहे की त्यांत कांहींही रिझल्ट लागूं शकतो. कदाचित् भारतीय टीम ‘ऑन् पेपर’ जास्त प्रबळ दिसत असेलही, पण पाकच्या खेळाडूंची ‘दांत खाऊन’ खेळायची वृत्ती आपल्याला ठाऊक नाहीं काय ? त्यामुळें , जर त्या मॅचमध्ये जर भारत हरला, तर ‘गाढव गेलें आणि ब्रह्मचर्यही गेलें’ या म्हणीसारखी दयनीय स्थिती भारताची व्हावयाची !

पण, ‘कोण जिकेल, कोण हरेल’ , ‘वर्ल्ड् कप् सीरीज् मध्यें भारताला किती पॉइंटस् मिळतील’ , हा मूळ मुद्दा नाहींच , तर तो आहे, ‘अॅट् व्हॉटेव्हर कॉस्ट्, भारतानें पाकिस्तानशी खेळूंच नये ’, हा.

तेंव्हां सुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल .

— सुभाष स. नाईक

टिप्पणी-२२०२१९

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..