नवीन लेखन...

पोळी का करपली ? वेताळ कथा

नाना झिपऱ्या हेकटच . त्याने आपला हट्ट सोडला नाही . झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाकडे निघाला .

“नानुल्या , काय ?आज बेसन ,शिळी भाकरी विथ कांद्याच लंच घेतलेल दिसतय !” वेताळाने प्रेतात प्रवेश केला होता .
“……” झिपऱ्या गप्पच .
“हा !तू कसा बोलणार ?तुझे मौन भांगेलना ?मला कसे कळले कि पिठाल भाकरीचे जेवण केलय ते ?हाच प्रश्न तुझ्या मानत आला असेल , नाही का ?”
झिपऱ्याने होकारार्थी मुंडी हलवली .
“थांब ,मीच तुझ्या शंकेचे निरसन करतो . अरे माझ्या झाडापाशी आल्या पसन तू सारा आसमंत ‘पादा’ क्रान्त करतोयस ! अख्या विश्वाला तो गंध, तुझ्या लंचचा मेनू वाटसपच्या स्टेटस सारखा व्हायरल करतोय! काय योगा योग आहे बघ , आजची कथा पण जेवणाच्या संबंधीच आहे . तर एक आट -पाट नगर होत . जावू दे.  त्या पेक्ष्या तुला मी त्या कथेची ऑडीओच ऐकवतो !”
वेताळाने आपले आईस कोल्ड हाताचे हडकी पंजे झिपऱ्याच्या दोन्ही कानाला हेडफोन सारखे लावले.
झिपऱ्या एकू लागला .
                                                                                                                                               000
पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा  ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले .
पोपट्या जेवायला बसला होता . समोर जेवणाचे किंग साईझ ताट होते .
भल्या थोरल्या पितळीत एका कडेला बेवारश्या सारखी अंग चोरून पडलेली शेपूची भाजी आणि उग्र करपलेली रोटा सारखी पोळी (पोळी ऐवजी लाकडी पोळपाटच तव्यावर भाजून बायकोने  ताटात वाढलाय कि काय?अशी शंका क्षणभर पोपट्याला आली होती ! पण तो बोलला नाही . कारण आता त्याचे लग्न झाले होते याची त्याला जाणीव होती ! )हा,नाही म्हणायला, भाजीला एकटे वाटू नये म्हणून, तिला मूक पाठींबा देत मिठाचा छोटासा  ढीगला असाह्य नजरेने दूरच्या कोपऱ्यातून भाजी कडे पहात होता . खरे तर या परस्थितीला पोपट्याच जवाबदार होता. पण आता वेळ निघून गेली होती !काल त्यानेच हि शेपूची भाजी मोठ्या हौशेने आणली होती. साल या शेपूच्या भाजीचा दुहेरी फटका असतो . एकतर हि निवडून द्यावी लागते , वर त्याची झालेली भाजी खावी पण लागते !
“शकुंतला, अग पोळी करपलीय !” न राहून पोपट्याने, पावसाळ्यातला भाजलेला पापड जसा नरम पडतो, तश्या आवाजात तक्रार केली .
“करपली !? मुद्दामच आज थोडी ज्यास्त वेळ भाजली!तुम्हाला ‘खरपूस ‘पोळी आवडते ना ? म्हणून!”शकुंतले ने आपली चूक मान्य करण्या ऐवजी तिचे समर्थन केले ! आणि ते ‘स्त्री ‘सुलभच होते . लग्न झाले कि कसे वागायचे हे बायकांना आपोआप सुचते .
‘खरपूस’आणि ‘करपट’ यातील सीमा रेषा शकुंतलेला समजावून सांगण्याच्या विचार पोपट्याने मनातच थोपवला . कारण त्यामुळे शकुंतला रागावली असती ! आणि आता त्याचे लग्न झाले होते . बायकोचे मन राखणे , घरातल  वातावरण आनंदी नसले, तरी गढूळ होवू न देणे हे त्याच्या सप्तपदीतीलीच वचने होती ! हे त्याचे कर्तव्ये आणि जवाबदारी नव्हती का ?
“आग ,आज खाईन,पण उद्या आपल्या साध्याच पोळ्या कर . खरपूस नको . “
करपट ढेकर देत त्याने हात धुतले.
ऑफिसात वडा – पाव खावून दिवस ढकलला .
दुसरे दिवशी पुन्हा तशीच थाळी ! आणि तशीच पोळी !
करपट सॉरी ‘खरपूस’ पोळी पोपट्या कडे टीव्ही सिरीयल (मराठी )मधल्या दुष्ट बाई सारखी पाहून हसत होती !
“अग ,शकू हे काय ?पुन्हा आज पण पोळी का करपली ?”नको ,नको म्हणताना पोपट्याचा आवाज थोडा वाढलाच .
“ओरडू नका !मला अशाच पोळ्या येतात !”(-खायची तर खा ,नाहीतर मरा उपाशी !-हा पुढचा भाग शकुने न बोलताही पोपट्याला एकू आला. लग्न झाल्यावर अश्या ‘सिद्धी’ प्राप्त होतात.अस्तु !  )
“आग ,थोडा प्रयत्न केलास तर जमतील तुला . मी तुझ्या आई कडे आल्तो तेव्हा किती मऊसूत पोळ्या केल्त्यास तू! तशाच करत जा ना ! “
“तेच म्हणतीय मी ! आमच्या आई कडच्या गॅस वर छान पोळ्या होतात . तुमच्या गॅस मध्ये काहीतरी खोड आहे ! “
“गॅस ,तोच ‘भारत गॅस ‘आहे ,आपल्या कडे आणि आई कडे !”
“अहो , गॅस म्हणजे गॅस ,नाही ! शेगडी ! आईकडे ‘पिजन ‘चा स्टोव्ह आहे ! सीम वर छान पोळ्या होतात ! नाहीतर तुमच्या  शेगडीची फ्लेम!तुमच्या सारखीच भडकते! मग पोळी करपणार नाही तर काय होईल ! “
“मग काय करू ?”
“आई सारखी शेगडी आणा ,अन मग माझ्या पोळ्या बघा ! “शकुने चालेन्ज दिले .
अर्थात पोपट्याने सात हजाराची ‘पिजन ‘शेगडी आणली .
ताटातली पोळी पोपट्याला खुन्नस देत होती . ‘हम नही बदलेंगे !’ हा  पोळीने आपला हेका कायम ठेवला होता !
“पोळी का करपली ?”
“तवा ! आईकडे तवा मस्त आहे . हा तुमच्याकडचा तवा – लोखंडी ,गंजका ,भिक्कार आहे !पोळ्या कशा चांगल्या होतील ?”
शकूचे म्हणणे रास्त होते .
तवा , फ्राइंग प्यान ,नॉन स्टिक सेट घरात आला .
ताटातल्या पोळी कडे पोपट्या ‘खावू का गिळू ‘ असल्या नजरेने पहात होता !
ताटातली पोळी तशीच होती ! ब्ल्याक करंट !
” शकेSS, पोळ्या करतेस का गौऱ्या थापतेस ?”पोपट्या भडकला .
“मवाल्या सारखे  काय ओरडताय ?(बोंबलताय !)काय झाल ?मेली, एव्हडीशी पोळी करपली तर ,घर डोक्यावर घेतल या बाबान ! तरी आई म्हणत होती ‘शके पोरग तिरसट दिसतय ,दे नकार!, या बँकवाल्या पेक्षा एखादा मराठीचा मास्तर बघू!’ पण बाबा आड आले ! आमच्या आई कडे बणसी  गहू असतो ,पोळ्या मऊ होतात ! तुम्ही लोकवन गव्हाच भुस्कट आणता अन मलाच वर ‘पोळी ‘का चांगली होत नाही म्हणून विचारता ?  माझ मेलीच नशीबच फुटक!आता मी काय करू SS” शकुने पोलीस सायरन सारखा गळा काढला !
पोपट्याचे ‘झुक गया आसमान ‘ झाल . त्याने शरणांगती पत्करली .
“आग ,तस सांग ना!तू रडू नकोस ! मी आणतो बन्सी गहू . पण प्लीज तेव्हड पोळ्याच बघ ना ! तुझ्या पोळ्या मुळे मला बँकेत डब्बा नेता येत नाहीय !रोज रोज बाहेरच खाऊन पोट बिघडतय ! ”
मग माहेरवाला ‘बणसी ‘ गहू आणला . अनुभवाने शहाणा झालेल्या पोपट्याने तो तिची आई आणते ,त्याच  गिरणीतूनच दळून  पण आणला. हो ,नाहीतर ‘आमच्या आई कडच पीठ !’ पोळ्या आड यायचं .

पण झाल भलतच . पोळ्या सोबत भाजी पण रंग बदलू लागली !
पोपट्या वैतागला .
-गॅस ,म्हणजे शेगडी बदलली .
-तवा बदलला .
-गहू बदलला
-पिठ बदललं .
-पीठासाठी पिठाची चक्की पण बदलली .
तरी पोळी का करपली ?याचे उत्तर मिळेना! .

पोपट्याने बिरबलाला स्मरून खूप विचार केला.
त्याने शेवटी निर्णय घेतला !
आता तो खावून , पिवून सुखी आहे !
000

“तर झिपऱ्या पोपट्याने नेमका काय निर्णय घेतला ? “वेताळाने शेवटी विचारले .
“पोपट्या सध्या खावून -पिवून सुखी आहे .  म्हणजे त्याने  नवी ‘पोळीवाली’ मैना हुडकली ! त्याने हेच केलय ! ”
” ‘त्याने हेच केलय !’ हे तू इतक्या कॉन्फिडटली  कसा सागतोयस ?”
“वेताळा, चावटपणा पुरे ! माझ्याच घरच्या गोष्टी मला का सांगतोस ?”
“झिपऱ्या तुझ मौन भांगल . तेव्हा ‘मै तो चला !’ बाय !
वेताळ तेरा नंबरच्या बसला लटकून त्याच्या घराकडे अर्थात त्याच्या झाडा कडे रवाना झाला .
वेताळ हल्ली फार आळशी झालाय . नाही का ?

सु र कुलकर्णी.

तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..