नवीन लेखन...

झोपलेल्या राशि

तारवटल्या डोळ्यांनी,
बदलत रहातो कुशी
अंथरुण भर लोळत लोळत,
झोपते मेष राशि ।।

कधी इथे झोप कधी तिथे,
सवय त्याची अशी,
खुट्ट होता ताडकन्
उठते वृषभ राशि ।।

जाडजुड गादी हवी
पलंगपोस मऊ ऊशी,
राजेशाही थाट, पाय –
चेपून घेते, मिथुन राशि ।।

दंगा गोंगाट असो किती
झोप यांना येते कशी,
शांत गाढ माळरानीही
घोरते निवांत कर्क राशि ।।

आपलेच अंथरुण पांघरुण
आपलीच तीच ऊशी,
सावधान पोज घेऊनच
निद्रा घेते सिंह राशि ।।

दारे खिडक्या बंद करुन
पुन्हा पुन्हा तपाशी,
अर्धे नेत्र उघडे ठेऊन,
झोपते कन्या राशि ।।

दमसा भागता जीव म्हणे
कधी एकदा आडवा होशी,
ब्रह्मानंदी टाळी लागून,
झोपी जाते तुळ राशि ।।

एक मच्छर भुणभूण कानी
कपाळावर बसली माशी,
माझ्या नशीबी झोप नाही,
म्हणते नेहमी वृश्र्चीक राशि ।।

रात्रि जागरण विनाकारण
आँफीसात डुलकी खुशाल घेशी,
रित अशी ही उनाडटप्पू
झोपली बघा धनू राशि ।।

सगळं कसं वेळेवर
जांभयी दहाच्या ठोक्याशी,
गजर नाही भोंगा नाही
उठते वेळेत मकर राशि ।।

शिस्तीत आपण रहायचं
तक्रार नाही कशाची,
जिथे जसे जमेल तशी,
निद्रीस्त होई कुंभ राशि ।।

हातपाय घुऊन येऊन
प्रार्थना करून देवापाशी,
दिनकर्माचा आढावा घेते
सात्विकतेने मीन राशि ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..