नवीन लेखन...

अमृततुल्य मैत्री

तिघांनीही आयुष्याचं आठवं दशक ओलांडलंय.

बाळाराम म्हात्रे ८८ वर्षांचे, प्यारेलाल परळकर यांचं वय ८६, तर माधवराव म्हात्रे यांची उमर ८३. मुंबईतल्या गावदेवी येथील गोरेगावकर वाडीत कोणे एके काळी मैत्रीचे धागे जुळलेले हे तिघेजण ४ एप्रिलला आपल्या मैत्रीचा अमृतमहोत्सव साजरा करतायत!

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. सुरुवातीला ते त्याला ‘बंगालीबाबू? म्हणायचे. हा बंगालीबाबू लवकरच मराठी शिकला आणि इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाला. गणपती, होळी साजरी करू लागला.

१९३०-३१ मध्ये महात्मा गांधींनी असहकाराचं आंदोलन सुरू केलं. प्यारेलाल परळकर यांना ते दिवस आठवतात. माधवराव आणि ते गुप्तपणे कॉँग्रेसची पत्रकं वाटत असत. प्यारेलाल म्हणतात, “१ ऑगस्ट १९३०१ रोजी पं. मदनमोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखाली बोरीबंदर येथे सत्याग्रह सुरू होता. त्यावेळी ब्रिटिश पोलिसांनी बेफाम लाठीमार केला. मी अँम्ब्युलन्स ब्रिगेडिअर म्हणून काम करत असे. खेतवाडीत कॉँग्रेसने जखमींसाठी रुग्णालय उभारलं होतं. आम्ही जखमींना तिथे घेऊन जायचो.

स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या तिघांचे नोकरी-व्यवसाय सुरू होते. बाळाराम सॉलिसिटर कंपनीत, माधवराव वालचंद कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करत. प्यारेलाल विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर झाले. १९३४ पासून ते वकिली करू लागले. १९७८ मध्ये पर्सनेळ अधिकारी, असिस्टन्ट लेबर अँडव्हायझर इ. जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

याच काळात तिघेही ‘पाठारे क्षत्रिय वक्‍तृत्वोत्तेजक समाजा’तही काम करत. वयाच्या सतराव्या वर्षीच माधवराव तिथे ग्रंथपाल आणि ऑडिटर होते, तर प्यारेलाल यांनी सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. बाळाराम ग्रामदेवी देवस्थानात व्यवस्थापक म्हणून काम करत. प्यारेलाल सांगतात, ‘एकत्र काम करताना आमच्यात अनेकदा मतभेद झाले, पण वाद विकोपाला जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली.

मित्रांच्या आवडीनिवडीबाबत माधवराव ‘चित्रलेखा*शी बोलताना म्हणाले, “मला नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताची खूप आवड. प्यारेलालही हळूहळू माझ्याबरोबर येऊ लागला. त्यालाही गाण्याची आवड निर्माण झाली. आम्हा दोघांना फिरण्याचाही छंद. आम्ही सात वेळा अमेरिकेला एकत्र जाऊन आलो.

‘गावदेवीला असताना आम्ही गिरगाव चौपाटीवर नियमितपणे पोहायला जात असू.” असं सांगतात. प्यारेलालजी आजही नियमितपणे ‘मंडपेश्वर स्विमिंग टँक’मध्ये पोहायला जातात.

प्रदीर्घ आयुष्यात मैत्रीचा आनंद सातत्याने अनुभवला तरी संसारातली सुखदुःख वाट्याला ‘यायचीच. माधवराव आणि प्यारेलाल यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा या मैत्रीनेच त्यांना सावरलं. आता ही त्रिमूर्ती आपली मुलं, सुना, नातवंडं यांच्यासह मजेत आहेत.

वयपरत्वे बाळाराम आणि प्यारेलाल यांना कमी ऐकू येतं, तर माधवरावांचा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या वेळी एक डोळा निकामी झाला. त्यातच हाय ब्लडप्रेशर आणि स्पॉन्डेलायटिसचा त्रासही त्यांना होतो. शरीर थकत चाललं तरी सगळ्यांचा मानसिक उत्साह दांडगा आहे. १९६२ मध्ये प्यारेलाल बोरिवलीला, तर माधवराव मुंबई सेन्ट्रलला राहायला गेले. परंतु गावदेवी येथील ज्ये नागरिक केंद्रात सर्वांची नेहमी भेट होते. या ठिकाणी साठी पार केलेले अनेक ज्येछ नागरिक दर शुक्रवारी एकत्र येतात. त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर चर्चा होते. महिन्यातून एकदा डॉक्टर, साहित्यिक अशा मान्यवरांची गाठभेट आयोजित करण्यात येते.

मित्रांच्या प्रोत्साहनामुळे माधवरावांनी १९९७मध्ये ‘बाहुल्यांची राणी’ आणि ‘संध्याछाया? हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. ते त्यांनी आपल्या दिवंगत पत्नीला अर्पण केले आहेत.

नवी पिढी टीव्ही आणि कॉम्प्युटर युगात वाढतेय. विटी-दांडू, आट्यापाट्या हे खेळ इतिहासजमा होत चाललेत. एकत्र कुटुंबपद्धती लयाला जातेय. अशा वातावरणात ‘घरातली सगळी माणसं आपापल्या कामाला गेली तरी मित्र असले तर एकटेपणाची भावना जाणवत नाही, असं प्यारेलालजी सांगतात.

चार एप्रिल रोजी गावदेवीच्या दादोबा जगन्नाथ सभागृहात बाळाराम, प्यारेलाल आणि माधवराव यांच्या अपूर्व मैत्रीचा अमृतमहोत्सव साजरा होतोय. “दोस्त दोस्त ना रहा? असं पदोपदी जाणवणाऱ्या यंत्रयुगात अशी मैत्री खरोखरच अमृततुल्य. ही मैत्री शतायुषी व्हावी अशीच शुभेच्छा!

 प्रज्ञा रावकर (मुंबई) यांच्या लेखावरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..