भारताला ‘चेकमेट’ करण्याची जागतिक खेळी:
बंगाल ते हिंदी महासागर… विणला जातोय नवा सापळा! ज्यात ईशान्येला ‘ख्रिश्चन-मुस्लिम स्टेट’साठीची डीप स्टेटची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान—असा हा मोठा सापळा रचला जात आहे. म्हणूनच भारत बंगालचा उपसागर- विशाखापट्टणम-निकोबार असा एक अलिखित कॉरिडॉर निर्माण करत आहे.
जेणेकरून, उत्तर, वायव्य आणि इशान्येकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने ओपन राहील. पण त्याबाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव राहणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक व गुप्तहेर हालचालीना फार मोठी स्पर्धा असेल.
समुद्राच्या बाजूने ही सज्जता का जास्त महत्वाची आहे, हे समजण्यासाठी गेल्या वर्षीच्या जून जुलै मधील एक प्रसंग आठवावा लागेल. गेल्या वर्षी, त्रिवेंद्रमच्या एअर फोर्सच्या तळावर उतरवण्यात आलेल्या, ब्रिटिश एअर फोर्सच्या F35 विमानाचा प्रसंग आठवा. ते विमान याचीच चाचपणी करायला आलं होतं की, देशाच्या आग्नेय बाजूने भारताची संरक्षण सिद्धता किती आहे. म्हणूनच, या सर्व जागतिक राजकारणाच्या धकाधकीत भारत किती सुसज्ज आहे, यावर आपली जगातील उपयुक्तता,लष्करी तयारी, याची पत सिद्ध होणार आहे.
यावरून अमेरिका व चीन दोघांनाही हे लक्षात आलं आहे की, आग्नेय दिशेला भारत सज्ज आहे, अन्यथा आलेलं ब्रिटिश F 35 भारताच्या रडारवर दिसलं नसतं. वायव्येकडील सिद्धता आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान अवघ्या 84 तासात जगाला दाखवून दिली आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि नैऋत्य सागरी पट्टा हीच बाजू अशी आहे, जिथे चीन अमेरिका काही करू शकतात.
कारण आर्थिक जगतात आपण चवथ्या स्थानावर आहोतच, पण लष्करी दृष्टीने सुद्धा भारत आज जगात चवथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या सर्वाचा, सर्वात जास्त धोका, अमेरिका व चीन या दोघांनाही आहे. एरवी जरी हे दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पहात असले तरीही जागतिक पटलावर, दोघांचाही सामायिक शत्रू एकच आहे. तो म्हणजे भारत.
म्हणूनच भारताची घेराबंदी आणि नाकाबंदी हा मुख्य उद्देश अमेरिका व चीन यांच्यापुढे सध्या आहे. त्यातच मोदी हे देशात व विदेशात सुद्धा, कोणत्याही दबावाला बळी न पडता देशहिताच्या अनेकगोष्टी, अनेक प्रकल्प, अनेक योजना कार्यान्वित करत आहेत. अवघ्या 12 वर्षात मोदींनी जी कामगिरी केली आहे, ती आज जगभरात चर्चेचा विषय आहे. अनेक जण देशाच्या प्रगतीने आणि वेगाने थक्क झाले आहेत.
म्हणूनच इराण युद्धाच्या चर्चेसाठी जे डी व्हेन्स यांना धाडणारे ट्रम्प, मात्र तेवढ्याच कारणासाठी स्वतः चीनच्या दारात येऊन उभे राहणार नाहीत. भारत हा विषय आहेच खास. त्यातच ईशान्य बाजूची भारताची सज्जता आता बंगाल ते अरुणाचल प्रदेश, असा मोठा प्रदेश भाजपा व एनडीए च्या हातात गेल्यामुळे, आता भारत त्या बाजुला काही मजबूत अशी लष्करी तटबंदी उभारेलच. पण या प्रदेशातील दुखऱ्या नसेला सुद्धा दुरुस्त करून आजपर्यंत काँग्रेसी काळात मुद्दाम दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या या संपूर्ण पट्ट्यात, काहितरी भक्कम हालचाली करणार हे नक्कीच.
त्यातील ईशान्य दिशा, बंगाल विजयाने, लष्करी व राजकीय दृष्टीने पुन्हा एकदा मजबूत होईल. मोदींनी जो इशारा दिला आहे, त्याचं महत्व जागतिक इंधन टंचाईच्या भीतीमुळे आहेच. पण सद्यस्थितीत, इंधन समस्येने ग्रस्त जगात, या प्रभावाने काही प्रमाणात कमजोर भासत असलेल्या भारतावर, जर काही लष्करी कारवाई किंवा तश्या प्रकारचा राजकीय किंवा लष्करी दबाव निर्माण करायचा असेल, तर ही वेळ उपयुक्त आहे.
किंवा भारताला आर्थिक आणि लष्करी आघाडीवर गुंतवून, देशांतर्गत मोदी विरोधकांचा उपयोग करून घेता येईल. म्हणूनच मोदींनी 140 करोड जनतेला आवाहन केलं आहे. मोदींची तीच एक खूप मोठी शक्ती आहे. यावेळी जनतेला प्रगल्भता दाखवून, आतून व बाहेरून घेरू पाहणाऱ्या या स्थितीत, देशाच्या बाजूने ठाम उभं राहिलं पाहिजे. मोदींच्या आवाहनाला वर मांडलेल्या या एकूण स्थितीत खूप महत्व आहे. कारण यापेक्षा जास्त स्पष्टपणे सांगता येणार नाही. आपल्याला समजून घ्यावं लागेल.
– प्रसन्न आठवले


Leave a Reply