नवीन लेखन...

फोर जी तंत्रज्ञान

फोर जी हे अत्याधुनिक असे तंत्रज्ञान असून त्याचा अर्थ फोर्थ जनरेशन वायरलेस असा आहे. वायरलेसची ती चौथी आवृत्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. थ्री-जी पेक्षा प्रगत असे हे तंत्रज्ञान असून त्यात पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने माहितीची देवाणघेवाण करता येते. केव्हाही व कुठेही अतिशय स्पष्टपणे व्हिडिओ पाहता येते.

त्यामुळेच त्याला मॅजिक टेक्नॉलॉजी (मोबाईल मल्टिमीडिया एनीटाईम एनीव्हेअर) असेही म्हटले जाते. आवाज व माहिती दोन्ही पाठवण्याची सुविधा यात असते. फोर जी तंत्रज्ञानात अनेक नवीन सेवांचा समावेश आहे. त्यात हाय डेफिनिशन व्हिडिओ, उच्च प्रतीचा आवाज, उच्च प्रतीची हाय डेटा वायरलेस चॅनेल्स यांचा समावेश होतो. फोर जी तंत्रज्ञानाचा वापर केवळ मोबाईलसाठीच नाही तर इतर अनेक दळणवळण सुविधांसाठी करण्यात येतो. त्यात वायरलेस ब्रॉडबँड अॅक्सेस सिस्टीम्सचा समावेश होतो. जास्त डेटा रेट व तरंगलांबी यामुळे अनेक वायरलेस उपकरणांसाठी त्याचा वापर करता येतो.

फोर जी वायरलेस तंत्रज्ञानात ऑरथॅगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हीजन मल्टीप्लेक्सिंग (ओएफडीएम), सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ रिसीव्हर्स, ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टीपल अॅक्सेस (ओएमएमडीए), युनिव्हर्सल मोबाईल टेलिकम्युनिकेशन सिस्टीम (यूटीएमएस) व मल्टीपल इनपुट, मल्टीपल आऊटपुट टेक्नॉलॉजी यांचा समावेश होतो. या सर्व प्रकारांमध्ये अतिशय वेगाने माहितीची देवाणघेवाण होते. माहिती देवाणघेवाणीचा वेग हा सेकंदाला १०० मेगाबाईट इतका जास्त असतो, त्यामुळे अनेक नेटवर्कवर रोमिंगची सुविधा मिळते. उच्चप्रतीची मल्टीमीडिया सेवाही मिळते. इंटरनेट प्रोटोकोल वायरलेस इंटरनेट सेवा देण्यासाठी फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क, वायरलेस लोकल लुप, पर्सनल एरिया नेटवर्क यांचा एकात्मिक वापरही केला जाऊ शकतो. फोर जी तंत्रज्ञानातही जपानच्या एनटीटी डोकोमो कंपनीने आघाडी घेतली असून त्यांनी २०१० मध्ये त्याची चाचणी घेतली आहे.

स्थिर वापरकर्त्यासाठी सेकंदाला १ गिगाबाईट्स तर चलत वापरकर्त्यासाठी (धावत्या मोटारीत) हा माहितीचा वेग सेकंदाला १०० मेगाबाईट राहील असे दिसते आहे. अतिशय उत्तम आवाज व नितळ व्हिडिओ (हाय डेफिनिशन सुविधा) यामुळे व्हिडिओ ब्लॉगिंग हा नवा प्रकार यामुळे उदयास येणार आहे. कोरियाची एलजी व सॅमसंग तसेच युरोपची सिमेन्स या कंपन्याही या तंत्रज्ञानात अधिक संशोधन करीत आहेत. या तंत्रज्ञानात भारत नऊ वर्षांनी मागे आहे. एकतर आताशी आपण थ्री-जी सेवा आणली आहे. त्यातही अजून पुरेसा प्रसार झालेला नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..