नवीन लेखन...

४ फेब्रुवारी…फेसबुक.. हॅप्पी बर्थडे

“आज फेसबुक चा वाढदिवस आहे…(हे मला मगाशी फेसबुकवर समजलं) …पण मुळात फेसबुक हे नाव कसं सुचलं असेल ???….काय विचार असेल त्यामागे ??…. मला तर वाटतंय …. अगदी दाट संशयच आहे…की यामागे सुद्धा आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीचं अर्थात बॉलीवूडचं योगदान असावं……कसं ???..

हे असं

१९९३ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट… “बाझीगर”… सगळ्यांना नक्कीच आठवत असेल … आता त्यातल्या आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेल्या एका हिट गाण्याचा मुखडा नीट आठवा…… तो असा होता..

“किताबे” बहुत सी पढ़ी होंगी तुमने
मगर कोई “चेहरा” भी तुमने पढ़ा है ?
पढ़ा है मेरी जां … नज़र से पढ़ा है
बता मेरे चेहरे पे…क्या क्या लिखा है…..

यातल्या “चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर??

एव्हढंच काय….आता अंतरा सुद्धा बघूया..
उमंगें लिखी है…जवानी लिखी है
तेरे दिल की सारी…कहानी लिखी है
कहीं हाल-ए-दिल भी ..सुनाता है चेहरा ( ऑ…. हेच सगळं तर आपण profile update मध्ये लिहितो की….. पुन्हा नीट वाचा हवं तर)
ना बोलो तो फिर भी…बताता है चेहरा…. ( म्हणजे notifications तर नव्हेत ?)
ये चेहरा हकीकत में…इक आईना है… ( अरे …ही तर timeline )
बता मेरे चेहरे पे …क्या क्या लिखा है….
अगर हम कहें हमको …उल्फत नहीं है
कहोगी भी कैसे.. मोहब्बत नहीं है… ( ते memory आणि Friendsversary का काय ते आलंय ना आता )
बड़े आये चेहरे पे … ये मरने वाले
दिखावे का ऐसे…वफ़ा करने वाले ( ते तर जगभरचे users चे आकडेच सांगतात )
दिखावा नहीं प्यार..की इम्तहाँ है
बता मेरे चेहरे पे….क्या क्या लिखा है… ( आणि…..हीच ती wall बरं का..)…

हे सारं कसं आपल्या परिचयाचं वाटतंय ना.. तर या सगळ्यावरून मला दाट शक्यता हीच वाटतेय की फेसबुक चा उगम इथूनच…. काय म्हणता ?? मग…आपलं बॉलीवूड आहेच मुळी भारी!

तर….अशा या सर्वांच्या लाडक्या फेसबुकला… Happy Birthday!

तळटीप : सदर पोस्ट केवळ मनोरंजनासाठी आहे… याचा वास्तवाशी संबंध असेल किंवा नसेल…. आणि असला किंवा नसला तरी योगायोग समजावा..

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..