नवीन लेखन...

‘वर्ल्डवाइडवेब’ ची ३३ वर्षं

इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. त्यालाच World Wide Web (WWW) असं म्हटलं जातं. इंटरनेटची ही विशेष भेट देणाऱ्या माणसाचे नाव आहे ‘सर’ टीम बर्नर ली.

टीम बर्नर ली यांचा जन्म ८ जून १९५५ रोजी इंग्लंडमध्ये झाला. पहिल्या व्यावसायिक संगणकाचा वापर त्यांचे आई-वडील करीत होते. त्यातून संगणक या अनोख्या यंत्राचे कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झाले. त्यांचे शिक्षण शीन माऊंट प्रायमरी स्कूल व लंडनमधील इमॅन्युअल स्कूल येथे झाले. त्यांना रेल्वे कशी चालते याचेही कुतूहल होते. रेल्वेत इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग कसा केलेला असतो याचा अभ्यास त्यांनी केला होता. ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजमधून, भौतिकशास्त्राची पदवी त्यांनी पहिल्या वर्गासह मिळवली. पदवीनंतर अभियंता म्हणून नोकरी धरली नंतर ते फर्नडाऊन येथे डी. जी. नॅश यांच्याबरोबर प्रिंटर्ससाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामात गुंतले. जून ते डिसेंबर १९८० दरम्यान ते जीनिव्हातील सर्नच्या प्रकल्पात ‘माहिती तंत्रज्ञान कंत्राटदार’ बनले. तेथे त्यांनी माहितीच्या महाजालाची निर्मिती केली पण मध्येच त्यांनी जॉन पूल यांच्या इमेज कॉम्प्युटर सिस्टम्स या कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळली आणि पुन्हा १९८४ साली ते सर्नमध्ये परतले. माहितीच्या महाजालाचे सार्वत्रिकीकरण करणारे संशोधन त्यांनी केल्यामुळेच जग बदलवणारे ठरले. जिनेव्हा येथील युरोपीय आण्विक संशोधन संघटनेत (सीईआरएन) काम करत असताना टीम यांनी वर्ल्ड वाइड वेबचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले. वर्ल्ड वाइड वेबला आधी सर्नने आपल्या अधिकारात ठेवले होते. मात्र १९९२ साली ते सार्वजनिक करण्यात आले. १९९३ साली संपूर्ण जगाला याचे ॲ‍क्सेस देण्यात आले.

www म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही. या पेजवर एक टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया आपल्याला दिसेल. या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी एका हायपरलिंकची मदत होते. इंटरनेटहून माहिती मिळवण्यासाठी www काम करते. सर्व फाईल्स आणि पेजेसला आदान-प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम www करत असते.

‘सर’ टीम बर्नर्स ली यांना असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी या जागतिक संस्थेचा, प्रतिष्ठेचा ए. एम. टय़ुिरग पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे संगणक विज्ञानातील नोबेलच. बर्नर्स ली यांना वर्ल्ड वाइड वेबच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्या वेब ब्राऊजरच्या निर्मितीचे श्रेयही ली यांनाच आहे. सर्न या संस्थेच्या मोठा आवाका असलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने बर्नर्स ली यांनी हे माहितीचे महाजाल निर्माण केले.

मार्च १९८९ मध्ये त्यांनी माहिती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रस्ताव मांडला होता, ते वर्ल्ड वाइड वेब फाऊंडेशनचे अध्यक्ष राहिले आहेत. एनक्वायर हे या माहितीच्या महाजालाचे आधीचे रूप होते.

टीम बर्नर ली यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर किताब देऊन २००४ मध्ये गौरवले, २०१३ मध्ये पहिला राणी एलिझाबेथ पुरस्कार त्यांना मिळाला. चार्लस बॅबेज पुरस्कार, पॉल इव्हान्स पीटर पुरस्कार, सर फ्रँक व्हिटल पदक, जपान प्राइज, राष्ट्रकुल पुरस्कार, नील्स बोहर सुवर्णपदक असे अगणित पुरस्कार त्यांना मिळाले. ते ब्रिटिश रॉयल सोसायटीचे, तसेच अमेरिकन ॲ‍कॅडमी ऑफ आर्ट्स ॲ‍ण्ड सायन्सेसचे फेलो आहेत. दहापेक्षा अधिक मानद डॉक्टरेट त्यांना मिळाल्या. इंटरनेट हॉल ऑफ फेममध्ये ते झळकले नसते तरच नवल.

जगात सकारात्मकतेवर आधारित खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम’ संस्कृती फुलवण्याचा त्यांचा प्रयत्न आजही आहे. इंटरनेट सव्‍‌र्हरही प्रत्येकाला निवडता/ बदलता यावेत, यावर ते अद्याप काम करत आहेत.

वर्ल्ड वाइड वेबला ३१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले होते.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..