नवीन लेखन...

३ मे, ‘सन-डे’

|| हरी ॐ ||

३ मे, ‘सन-डे’

आपण प्रत्यके महिन्यात कुठला ना कुठला दिन (डे) साजरा करत असतोच. नुकताच २२ एप्रिल २०१२ रोजी वसुंधरा दिन (अर्थ डे) सर्व जगभर साजरा करण्यात आला. आपल्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्त कोणाची मदत मिळत असेल तर ती सूर्यदेवाची आणि त्या सूर्यदेवाचा दिन किंवा दिवस आहे ३ मे आणि हाच दिवस सर्व जगभर ‘सूर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. यासाठी सूर्यदेवाचे आभार मानून त्यापासून मिळणाऱ्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर हा मानवजातीच्या विकास व उन्नती करिता करून घेणे आवश्यक आहे आणि याचेच महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

श्री सूर्यस्तुती मध्ये काही श्लोक येतात ते खुपकाही सांगून जातात जसे :

“जयाच्या रथा एकची चक्र पाहीं | नसे भूमि आकाश आधार काही | असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १ || शशी तारका गोवूनी जो ग्रहांते | त्वरें मेरू वेष्टोनिया पूर्वपंथे | भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ६ || महामोह तो अंधकारासी नाशी | प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी | अनाथा कृपा जो करी नित्य ऐशी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ८ ||

सूर्य स्वंप्रकाशीत तारा आहे, जो स्वत:ची उर्जा स्वत: तयार करतो. त्याच्या या प्रकाशामुळेच इतर ग्रहांनादेखील उर्जा मिळ्त असते. सूर्याची प्रचंड उष्णता ही हायड्रोजन परमाणुंच्या संघटनाने हेलियम परमाणु तयार झाल्यामुळे उत्पन्न होते. प्रत्यक्षात सूर्य हा एका प्रचंड परमाणु रिऍक्टरसारखा आहे. त्यात परमाणुंचे संघटन असते. सध्या, पृथ्वीवर जे रिऍक्टर बनविले जातात त्यात परमाणुंचे विघटन होते आणी त्यापासून उर्जा मिळ्ते. परंतु, सूर्यातील परमाणुंच्या संघटनामुळे जी उर्जा मिळते त्या प्रकारचे उर्जा देणारे रिऍक्टर अदय़ाप बनू शकलेले नाहीत. पण, कदाचित असे झाले तर त्यापासून आपल्याला उर्जा निर्माण करता येईल.

पृथ्वीवरील लोकांसाठी सूर्यदेव जीवनदाता झाला आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीचा आरंभ सुमारे कैक कोटी वर्षांपूर्वी झाला असावा असे शास्त्रज्ञ मानतात. बऱ्याच वर्षांपासून किंवा कदाचित त्याही आधीपासून सूर्य आपल्याला जीवन देत आला आहे. त्याच्याच उर्जेमुळे आपण जगत आहोत. आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की जर सूर्यदेवच नसता तर काय झाले असते ? १) आपल्याला कोणताच ग्रह दिसला नसता आणि पृथ्वीवर सर्वत्र अंध:कार पसरला असता. २) अतीमहत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ध्रुवाइतकी थंडी इतरत्र पडल्यामुळे आपण बहुतेक गोठून गेलो असतो. कारण सूर्याची किरणे आपल्या पृथ्वीवर पडतात आणि त्यात उर्जा (उष्णता) असते याने हवामान नियंत्रित केली जाते. यापैकी काही किरणे ही पृथ्वीच्या पृष्टभागावर शोषली जातात व काही परावर्तित केली जातात. या शोषल्या गेलेल्या किरणांमुळेच आपल्या पृथ्वीचे तापमान सर्व सजीवांना जगण्यास अनुकूल होते. सूर्य नसता तर नद्या, वारे वाहणे बंद होईल, समुद्रदेखील तळापर्यंत गोठून जातील, वनस्पती आणी प्राणीदेखील जिवंत रहाणार नाहीत.

सूर्य ग्रहणात किंवा इतर वेळा सूर्याकडे पाहण्याची वेळ येते त्यावेळेस आपले डोळे दिपतात कारण आपल्या डोळ्यांना ही उष्णता सहन होत नाही. परंतु पृथ्वीवरील वनस्पती मात्र सूर्य किरणे, कार्बनडायऑक्साईड व पाणी यांच्या सहाय्याने स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. या वनस्पती खाऊन काही प्राणी जगत असतात. मनुष्य मात्र या वनस्पती अर्थात भाजीपाला, धान्य आणि प्राण्यांचा उपयोग अन्न म्हणून करतो. अशा त-हेने ही अन्नसाखळी अखंडपणे चालू असते. या अन्नसाखळीच्या मुळाशी सूर्यप्रकाशच आहे. यावरुन आपल्याला सूर्याचे महत्व लक्षात येईल. जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असणारा महत्वाचा घटक म्हणजे पाणी. सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणा-या नदी, तलाव, समुद्रत असणाऱ्या पाण्याचे वाफेत रुपांतर होते. ही वाफ दूरवर वाहून नेताना थंड झाल्यामुळे त्याचे पावसात रुपांतर होते व पाणी पृथ्वीवर पुन्हा उपलब्ध होते. अशा त-हेने पाण्याचे आणि ऋतूंचे चक्र अखंड चालू आहे.

अतिथंड प्रदेशात सौरउर्जेचा वापर घर उबदार ठेवण्यासाठी व पाणी गरम करण्यासाठी केला जातो. वर्षभर साठवून ठेवण्यात येणाऱ्या धान्याला कीड लागू नये म्हणून उन्हात वाळवण्यात येतात. तसेच मासेदेखील उन्हात वाळवून नंतर त्यांचा उपयोग केला जातो. सौर-कुकरचा वापर अन्न शिजविण्यासाठी केला जातो. सौरउर्जा दिवसभर साठवून तिचा वापर रात्री घरातील तसेच रत्यावरील दिवे पेटते ठेवण्यासाठी केला जातो. सौरउर्जेचा वापर समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी केला जातो. राजस्थानमधील तिलोनिया येथील एका महाविद्यालयाचे कँटीन संपूर्णत: सौरउर्जेवर चालते. सध्या, जपानसारखा देश सौरउर्जेवर चालणारी वातानुकुलीत यंत्रणा तयार करीत आहे. जर्मनीतदेखील जगातील सर्वात मोठया सौरजहाजाच्या बांधणीचे काम सुरु आहे. सौरउर्जा वापरातील महत्वाच्या त्रुटी म्हणजे सौरउर्जा ही फक्त दिवसाच उपलब्ध असते. दिवसा जमा केलेली सौरउर्जा आपण बॅटरीत साठवू तिचा उपयोग जरुरी असेल तेव्हा करून घेऊ शकतो. परंतू त्यासाठी लागणारे तंञज्ञान हे अत्यंत महागडे आहेतरीही भविष्यात विजेची कमतरता भरुन काढण्यासाठी सौर उर्जेचा पर्याय नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

भारतासारख्या देशात पावसाळ्याचे काही महिने सोडले तर वर्षाचे बाकीचे दिवस मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. या उर्जेचा जास्तीत जास्त वापर आपण वीजनिर्मीतीसाठी करायला हवा. यामुळे पारंपारीक इंधनांचा उदा. दगडी कोळ्सा, डिझेल आणि तत्सम वापर वीजनिर्मीतीसाठी कमी प्रमाणात केला जाईल व त्याद्वारे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण टाळता येईल असे असले तरी त्यासाठी लागणारे विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन आणि मुख्य म्हणजे सकारात्मक इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे.

<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..