नवीन लेखन...

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।। डॉ. भगवान […]

बाहुबली आणि आयुर्वेद!

बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती. चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. बाहुबली आणि भल्लालदेव (की […]

टक्कल- केवळ फायदेच, तोटे नाहीतच..

‘पिकलेले केस व उरलेलं टक्कल’ या विषयावर काल लिहीलेल्या लेखात टकलाचे फायदे-तोटे या विषयावर लेखाच्या विस्तारभयास्तव लिहीण्याचं मुद्दामहून टाळलं होतं. ते आता लिहीतो. फायदा दिसल्याशिवाय कोणी कुठेही पुढे जात नाही म्हणून माझ्या दृष्टीनं टकलाचे फायदे काय, ते पहिलं सांगतो. टकलावर तेल लावायची आवश्यकता नसते. लावून उपयेगच नसतो. त्यामुळे तेलाचा व केस नसल्यामुळे केसाला लावायच्या कलपाचाही खर्च […]

फराळापासून काही नवीन पदार्थ

दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत. अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा. चिवडा मिसळ साहित्य- मोड आलेली मटकी २ वाट्या, बटाटा १, आले लसूण पेस्ट १ चमचा, […]

काष्टा सोडून वैश्वदेव

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!’सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ […]

मधुमेहींसाठीचा आहार

मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर […]

वडापावाचा इतिहास….

आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहोत.. 1965-70 चा काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।। प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।। घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।। अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला ।।४।। डॉ. भगवान […]

टक्कलपुराण – पिकलेले केस व उरलेलं टक्कल

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी..!! या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न […]

1 26 27 28 29 30 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..