नवीन लेखन...

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले. – – – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

मराठीतली विलोमपदे

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही. इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते. १) चिमा काय कामाची २) ती होडी जाडी होती. ३) रामाला भाला मारा. पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला ‘विलोमपद’ […]

देवपूजेतील साधन – पळी पंचपात्र

पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्‍या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात. पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र […]

रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा

‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या, ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! […]

मला देव दिसला – भाग २

पौराणीक कथा व कथासार वाचण्यानी मनाच्या धार्मिक वृत्तीना, ईश्वरी सानिध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण इश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ऊँ नमो भगवते वासूदेवायन् महा ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. जय जगदंबेच्या स्वरूपात विश्वाची […]

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तुम्हीं, काका आमच्यासाठीं, बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं ।।१।।   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे, तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे ।।२।।   उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले, कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ।।३।।   आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे, दुर्दैवाने आमुच्या, नाही ते […]

मला देव दिसला – भाग १

बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे […]

मिठापरी जीवन

खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ, परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट ।।१।।   जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला, केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला ।।२।।   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते, हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते   बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी   धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे   […]

सकारात्मक नैतिक बळ

आपल्या शरीरात बिघाड होतो त्यामुळे एखादी व्याधी उत्पन्न होते. कधीकधी आयुष्यात सतत अडचणी, त्रास आणि समस्या यांच्या मालिकाच निर्माण होतात. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास घालविण्यासाठी आपण आपल्या विचारात योग्य बदल करुन सुधारू शकतो का ? याचं उत्तर ‘होय ‘ असं द्यायला काहीच हरकत नाही. कारण मानसिक स्वास्थ बिघडलं तर त्यातून शारीरिक […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..