नवीन लेखन...

संसदेवरील हल्ल्याची २० वर्षं

१३ डिसेंबर २००१ ला पाच दहशतवाद्यांनी सकाळी संसदेवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एकूण १२ जण ठार झाले होते. त्यात दिल्ली पोलीसांचे सहा जवान शहीद झाले होते. तर संसदेचे सहा कर्मचारी ठार झाले होते. हल्ला करणारे पाच अतिरेकी हे लष्कर ए तोयबा आणि जैश ए महमद या दहशतवादी संघटनांचे होते. हल्ल्यावेळी संसदेचं कामकाज सुरू होतं…

१३ डिसेंबर २००१ हा दिवस संसदेसाठी इतर दिवसांप्रमाणे नव्हता. संसदेचे अधिवेशन सुरु होते. संसदेत शवपेटी घोट्याळ्यावरुन गरमागरम चर्चा सुरु होती. गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर जे काही झाले ते त्यावेळी ज्यांनी-ज्यांनी पाहिले ते आजही विसरु शकलेले नाहीत. सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर खासदार आणि मंत्री सभागृहाच्या बाहेर येऊ लागले तर, काही सेंट्रल हॉल किंवा संसदेबाहेर उभे राहून चर्चा करत होते. यावेळी संसद मार्गावर काय सुरु आहे, याची कोणालाच माहिती नव्हती.

संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा अधिकार्यांवनी पाहिले की एक पांढर्याण रंगाची अॅम्बेसिडर कार वेगाने त्यांच्या दिशेने येत आहे. ही गाडी ११ क्रमांकाच्या गेटकडे वेगाने येत होती. काही क्षणातच गाडीने ११ क्रमांकाचे गेट पार केले आणि १२ क्रमांकाच्या गेट जवळ पोहोचत होती. येथूनच राज्यसभेत जाण्याचा मार्ग होता. संसदेच्या आसपास इतर वाहनांच्या हलचाली सामान्य होत्या मात्र ही कार हळु-हळु उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या ताफ्याच्या दिशेने पुढेच चालली होती.

उपराष्ट्रपतींच्या ताफ्यामुळे या कारला थांबण्याचा इशारा करण्यात आला मात्र, या कारची स्पिड कमी झाली नाही आणि ती वेगाने पुढेच गेली. गेटवर तैनात एएसआय गाडी मागे धावले तेव्हा ड्रायव्हरने गडबडीत कार थांबवली.

एएसआय जवान जीतराम गाडीच्या ड्रायव्हर जवळ पोहोचले आणि त्यांनी ड्रायव्हरची कॉलर पकडली. त्यांनी पाहिले की मागच्या सिटवर लष्कराच्या वेषात काही लोक बसलेले होते. तेव्हाच ड्रायव्हरने त्यांना म्हटले बाजूला सरक नाही तर गोळी घालील. जीतराम यांनी त्या पाच जणांचा इरादा लगेच ओळखला आणि आपली रिव्हॉल्वर काढली. हे दृष्य पाहात असलेल्या इतर जवानांनी वायरलेसहून तत्काळ सर्व गेट बंद करण्याचे आदेश दिले. जीतराम यांनी रिव्हॉल्वर काढताच कारच्या ड्रायव्हरने गडबडीत गाडी सुरु केली आणि समोरच्या दगडांवर नेऊन आदळली. गाडीतील पाच दहशतवादी बाहेर पडले आणि स्फोटके लावू लगाले. यामुळे सर्वांनाच कळूनचुकले की हे दहशतवादी आहेत. तेवढ्यात जीतराम यांनी एका दहशतवाद्यावर गोळी झाडली. ती त्याच्या पायाला लागली, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि जीतराम तिथेच धारातीर्थ पडले. दहशतवादी हँडग्रेनेड फेकत पुढे निघाले होते. आता संसद गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजाने दणाणून गेली होती. त्यावेळी संसदेत 100 हून अधिक खासदार आणि माध्यमांचे प्रतिनिधी होते. बाहेर हा धुमाकूळ सुर असताना सर्व नेत्यांना आणि खासदारांना संसदेतील एका गुप्तस्थळी नेण्यात आले. लालकृष्ण अडवाणी तेव्हा संसदेतच हजर होते.

संसदेचे सर्व गेट आतापर्यंत बंद झालेले होते. फोनलाइन्स डेड झाल्या होत्या. आता फक्त सुरक्षा कर्मचारी सर्वात पुढे होते. दहशतवाद्यांना संसदेत घुसण्यापासून रोखण्यासाठी जोरदार फायरिंग सुरु होती. गोळीबारात तीन दहशतवादी जखमी अवस्थेतही पुढे निघाले होते. ते सर्व संसदेच्या गेट क्रमांक 9 च्या दिशेने पुढे चालले होते. गेट बंद दिसल्यानंतर त्यांनी गेट क्रमांक 5 कडे मोर्चा वळविला. याच दरम्यान सुरक्षा कर्मचार्यां नी फायरिंग करुन तिघांना ठार केले. एकजण ग्रेनेड फेकत होता त्याच्यावर गेट क्रमांक 5 जवळ गोळ्या झाडण्यात आल्या तो तिथेच ठार झाला.

चार दहशतवादी ठार झाल्यानंतर एक अजूनही जिवंत होता. तो वेगाने संसदेत घुसण्याच्या तयारीत होता. त्याच्या शरीरावर अनेक स्फोटके लावलेली होती. संसदेत घुसून स्वतःला स्फोटकांनी उडवण्याच्या तो तयारीत होता. संसदेत जाण्याचा मार्ग गेट क्रमांक 1 पासून जातो. हे गेटही बंद होते. ते पाहून हा दहशतवादी काही क्षण थांबला. तेवढ्यात एक गोळी आली आणि त्याच्या छातीत घुसली. त्याच्या शरीरावर लावलेल्या स्फोटकाचाही स्फोट झाला. या स्फोटासोबतच दहशतवादी जागच्या जागी मेला. पाचही दहशतवादी मारले गेले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांना किती दहशतवादी आले होते, आणि कोणी संसदेत घुसला आहे का हे माहित नसल्यामुळे ते दबक्या पावलांनी पुढे-पुढे सरकत होते. दहशतवाद्यांनी फेकलेले काही स्फोटके उशिरा ब्लास्ट झाले यामुळे दहशतवादी अजूनही दबा धरून बसलेत का याची शंका येत होती. यावेळी संसदेला सुरक्षा कर्मचार्यांननी वेढा टाकलेला असतानाही ते प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत होते.

गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्याचा हा थरार संसद परिसरात तीस मिनीटे सुरु होता. मग नंतर बॉम्ब स्कॉड, स्पेशल एजन्सीचे लोक घटनास्थळी दाखल होऊ लागले. ज्या कारने दहशतवादी संसद परिसरात आले होते, त्या कारची तपासणी करु लगाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची हत्यारे आणि त्यांनी कुठे स्फोटके लावून ठेवली आहेत का, याचाही शोध सुरु झाला. त्यांच्या कारमध्येही स्फोटके असण्याची शंका होती. त्यामुळे कारची सावधगिरीने तपासणी करण्यात आली. गाडीमध्ये काही खाण्याच्या वस्तू होत्या. त्यामुळे अशीही शक्यता वर्तवली गेली, की खासदारांना संसदेत बंदिवान बनविण्याची त्यांची इच्छा होती. संसदेतून खासदार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांचे ओळखपत्र पाहूनच बाहेर सोडण्यात आले. या हल्ल्यात ९ जण मारले गेले. त्यात निडर सुरक्षा रक्षक जीतराम यांच्यावर दहशतवाद्यांनी सर्वात पहिले गोळी झाडली आणि पाच दहशतवादी ठार झाले होते.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..