नवीन लेखन...

१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?

(एकूण २ भागात)

भाग पहिला..-

पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..!

याच अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे ‘१३’ या आकड्याला अशुभ मानणं..या आकड्याला अशुभ का मानतात याची उत्तरं त्या त्या संस्कृती देतातच पण आपल्या भारतातही त्याला समर्पक उत्तर सापडतं..! फरक केवळ इतकांच की ‘१३’ या संख्येने भारतात लघुरूप धारण करून ‘४’ हे रूप घेतलंय..आणि या ‘४’ चे जे प्रताप रोजच्या आयुष्यात अनुभवायला ते खरोखर मनोरंजक आहेत..

पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते.

भारतात १३ हा जरी अशुभ मनाला गेलेला नाहीय तरी भारतीय ज्योतिष शास्त्रात १३ ची  बेरीज ४ ही ‘लग्नाच्या’ बाबतीत अशुभ मानतात. ज्योतिषश्रद्धेनुसार ४ हा आकडा ‘हर्शल’ या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ‘हर्शल’ ग्रहाचा शोध हा तुलनेने अगदी अलीकडे लागलेला असल्यामुळे त्याची प्रकृती आणि प्रवृत्ती वैज्ञानिक आहे असे मानले गेलेय. या संख्येच्या प्रभावाचा अनुभव आपल्यालाही घेता येईल.

ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेची बेरीज (dd-mm-yyyy) ४ येते किंवा ज्यांच्या जन्म तारखेत ४ ही संख्या एकापेक्षा अधिक वेळा आहे त्यांच्या बाबतीत हा प्रभाव जाणवतो. ‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाही (१२.०१.१८६३ = ४). कोणीतरी सांगतो, किंवा पोथीत असे लिहिलेय वा अशी प्रथा-परंपरा आहे म्हणून तो कोणतीही गोष्ट करणार नाही. धर्म, प्रथा, परंपरा याचा नीट विचार करून जर त्याच्या बुद्धीला ते पटले तरच ‘हर्शल’ करणार अन्यथा जमाना कितीही बोंब मरूदे तो ऐकणार नाही..एकाच गोष्टीची नव्याने मांडणी करण्यात हे लोक आघाडीवर असतात..लक्षात घ्या, तुम्ही-आम्ही मळलेल्या वाटेवरून चालणारी नव्हे तर अशीच माणसे  इतिहास घडवतात..!!

हर्शल प्रचंड बुद्धिमान आहे. कधी कधी ही बुद्धिमत्ता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने विक्षिप्तपणाकडे झुकलेली वाटते. हे जे विचार करतात ते आपल्या कल्पनेतही येऊ शकणार नाहीत. म्हणून यांना समाजात ‘लहरी’ whimsical ठरवले जाते. हे काळाच्या खूप पुढे असतात. बुद्धीच्या कसोटीवर न टिकणारी कोणतीही गोष्ट हे करणार नाहीत.

(भाग २ लवकरच येतोय )

-गणेश साळुंखे

९३२१८ ११०९१

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..