नवीन लेखन...

षंढांची मानसिकता !



एखाद्याने प्रगती करतो म्हटले की, त्याच्या हितचिंतकांपेक्षा त्याच्या शत्रूंचीच संख्या झपाट्याने वाढते. शेजारची रेषा मोठी आहे, म्हटल्यावर आपली रेषा त्याच्यापेक्षा मोठी करण्यापेक्षा त्याची रेषा आखूड कशी होईल, असा विचार करणाऱ्यांचीच संख्या आपल्याकडे खूप अधिक आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन, असा बाणेदारपणा आता अपवादानेच आढळतो, त्यापेक्षा एखाद्या जळूसारखे कुणाला तरी चिकटून आयुष्यभर त्याचे रत्त* शोषत बसण्यात धन्यता मानणारेच ठायी ठायी आढळतात. अशा लोकांचा सगळ्यांनाच त्रास होतो.अशाप्रकारच्या लाचारीने त्यांनी तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलेच असते, परंतु ते इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत. ईतीहासातील पुरू राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे. सिकंदराच्या सैन्याने पुरूला जेरबंद करून त्याच्यासमोर उभे केल्यानंतर सिकंदराने पुरूला, तुला कुणासारखी वागणूक द्यावी, असे विचारले तेव्हा आपल्या उत्तराचे परिणाम काय होणार, याची स्पष्ट कल्पना असतानाही त्या पराक्रमी राजाने मला राजासारखे वागव, असे बाणेदार उत्तर दिले. ज्यांचा आपल्या सामर्थ्यावर, आपल्या क्षमतेवर गाढ विश्वास आहे, अशी माणसेच असा बाणेदारपणा दाखवू शकतात, अशी माणसेच पुरुषार्थ गाजवू शकतात. पुरुष आणि पौरुषत्व या दोन्ही शब्दांचा अन्योन्य संबंध आहे. पुरुषाशिवाय पौरुषत्व असू शकत नाही आणि पौरुषत्व नसेल, तर त्याला पुरुष म्हणणे योग्य ठरणार नाही. या संकल्पनेच्या आधारे विचार करायचा झाल्यास आपल्याकडे पुरुषांची संख्या खूपच कमी आहे, असे खेदाने म्हणावे लागते. काही परिस्थितीने लाचार असतात, त्यांची विवशता समजून घेता येईल, परंतु बहुतेक पुरुष स्वभावाने किंवा मानसिकदृष्ट्याच षंढ असतात. मिळेल ते खायचे, आपल्या मर्यादित वकुबात शक्य असेल तितके ओरबाडण्याचा प्रयत्न करायचा, त्यासाठी एकट्याची ताकद प
रेशी नसेल, तर आपल्यासारख्याच इतर ‘पुरुषांना’ गोळा करून टोळी बनवायची आणि आव मात्र अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आणायचा, असे चित्र साधारण सगळीकडे दिसते. वाघ हा जंगलाचा अनभिषित्त* सम्राट आहे. त्याची शिकार

जंगलातला इतर कुठलाही प्राणी करू

शकत नाही, अपवाद रानटी कुत्र्यांचा! रानटी कुत्रे टोळी करून वाघावर हल्ला करतात. त्यांच्या हल्ल्याची पद्धतही अगदी तंत्रशुद्ध असते. दोन किंवा तीनचा गट करून हे कुत्रे आळीपाळीने वाघाच्या मागे लागतात. एक गट थकला की दुसरा गट पाठलाग करतो, दुसऱ्याची जागा तिसरा घेतो, अशाप्रकारे थकवून थकवून ते कुत्रे वाघाला जेरीस आणतात आणि त्याची शिकार करतात. आपल्या सभ्य मानवी समाजातही कुत्र्यांची ही ‘स्टाईल’ सर्रास वापरली जाते. कारण इथे वाघ बनण्याची कुणाची तयारी नसते, तेवढा वकूबही नसतो आणि दुसरा कुणी वाघ बनत असेल, तर ते सहनही होत नाही. अशावेळी त्याला थकवून थकवून जेरीस आणण्याचे तंत्र अवलंबिले जाते. स्वत:मध्ये धमक नसलेले, कायम लाचारीने जगणारे लोक टोळ्या बनवून ताठ मानेने, स्वाभिमानाने जगणाऱ्याचं जगणं असह्य करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक क्षेत्रात हेच चित्र पाहायला मिळते. एखाद्याने प्रगती करतो म्हटले की, त्याच्या हितचिंतकांपेक्षा त्याच्या शत्रूचीच संख्या झपाट्याने वाढते. शेजारची रेषा मोठी आहे, म्हटल्यावर आपली रेषा त्याच्यापेक्षा मोठी करण्यापेक्षा त्याची रेषा आखूड कशी होईल, असा विचार करणाऱ्यांचीच संख्या आपल्याकडे खूप अधिक आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन, असा बाणेदारपणा आता अपवादानेच आढळतो, त्यापेक्षा एखाद्या जळूसारखे कुणाला तरी चिकटून आयुष्यभर त्याचे रत्त* शोषत बसण्यात धन्यता मानणारेच ठायी ठायी आढळतात. अशा लोकांचा सगळ्यांनाच त्रास होतो. अशाप्रकारच्या लाचारीने त्यांनी तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलेच असते, परंत
ते इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत. या लोकांनी, या लोकांच्या टोळ्यांनी अनेक चांगले उद्योग बंद पाडले, स्वत:सोबत इतरांच्याही पोटावर पाय देण्याचे पाप त्यांनी केले. सरकारी नोकऱ्यांमध्ये तर अशा लोकांचा हैदोस असतोच आणि त्यामुळेच नोकरशाही, प्रशासनाविरुद्ध सामान्य लोकांचा प्रचंड रोष आहे; परंतु आजकाल खासगी आस्थापनांमध्येही अशा लोकांचे उपद्व्याप वाढले आहेत. खरेतर तुमच्यात योग्यता असेल, तर तुम्हाला कुठलीही जाहिरातबाजी करण्याची गरज नसते, तुमचे कामच तुमच्या योग्यतेचा प्रचार करीत असते आणि अशा योग्य लोकांना कोणताही मालक, कोणतेही व्यवस्थापन कधीच दूर लोटू शकत नाही. त्याची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही मालकाची गरज असते, कारण अशा लोकांच्या जिवावरच तो उद्योग किंवा ती संस्था उभी असते. अशा लोकांचे गुण-दोष सहर्ष स्वीकारले जातात; परंतु ज्यांची योग्यता नसते त्यांचे व्यवस्थापनाशी नेहमीच खटके उडत असतात. त्यात त्यांची अडचण ही असते की आपली योग्यता माहीत असल्यामुळे इथून बाहेर पडलो की दुसरीकडे ‘सोय’ होईलच याची त्यांना शाश्वती नसते. त्यामुळे आहे त्या ठिकाणीच जळूसारखे चिकटून शक्य होईल तितके रत्त* शोषणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असतो आणि दुर्दैवाने अशा लायक नसलेल्या माणसांचेच प्रमाण कोणत्याही संस्थेत अधिक राहत असल्याने त्यांच्या संघटित दादागिरीला सर्वत्रच ऊत येत असतो. खरेतर इतक्या लाचारीने जगण्याची काहीच गरज नाही. आज रोजगाराच्या इतक्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत की, स्वाभिमानी माणसाला कुणाचे ‘अरे’ ऐकून घेण्याची गरज नाही; परंतु त्यासाठी आपल्या क्षमता विकसित कराव्या लागतात, नवेनवे ज्ञान, नवेनवे कौशल्य आत्मसात करावे लागते, कष्टाची तयारी ठेवावी लागते, थोडी बुद्धीला तोशीस द्यावी लागते आणि त्यासाठी मुळात काही असावे लागते. यापैकी कशाचीही तयारी नसणाऱ्यान
एकतर सरकारी नोकरी पाहावी किंवा घरी बसावे. नोकरी-पैसा या गोष्टींना आयुष्यात महत्त्व नक्कीच आहे; परंतु स्वाभिमान नावाचीही एक गोष्ट असते, पुरुषाला पुरुषत्त्व या स्वाभिमानानेच येते. वरिष्ठांच्या एकतर शिव्या किंवा थुंकी झेलत मान खाली घालून लाचारीने जगण्यापेक्षा एखाद्या स्टेशनवर ताठ मानेने हमाली करणे केव्हाही अधिक श्रेयस्कर असते. मी लाचारीने कशाला जगू? माझ्यात काय कमी आहे, मीही पुरुष आहे, लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची ताकद माझ्यातही आहे, हा

आत्मविश्वास ज्याच्याकडे असतो, तो खऱ्या अर्थाने जगतो, त्याचे जगणे स्वाभिमानाचे

असते, त्याचे जगणे पुरुषाचे असते. बाकीच्यांचे जगणे हे जगणे नसतेच, ते असते केवळ आपल्या गटारापुरते वळवळणे! आपला समाज, आपला देश इतर प्रगत देशांच्या तुलनेत खूप मागे आहे. त्यामागे इथल्या बहुसंख्य लोकांची ही अतिबचावात्मक मानसिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. आधाराला एखादी फांदी मिळाली की अवघे आयुष्य तिला लटकून सार्थकी लावण्यातच समाधान मानणाऱ्यांनी या देशाच्या प्रगतीला खीळ घातली आहे. आपल्याभोवती छोटी-छोटी कुंपणे उभे करून त्या मर्यादित जागेतच आयुष्यभर खुरडत जगणाऱ्यांना, आपल्या स्वप्नांची झेप कुंपणाबाहेर जाणार नाही, याची कायम दक्षता घेणाऱ्यांना ,क्षितिजाची भव्यता, आकाशाची विशालता कळणार तरी कशी?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..