नवीन लेखन...

आम्ही कंगाल का?




प्रकाशन दिनांक :- 04/01/2004

सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत. समस्यांची उत्तरे शोधता-शोधता विकासाच्या पायऱ्या मानवाने गाठल्या, परंतु त्याचबरोबर हेदेखील सत्य आहे की, आपण समस्या म्हणून ज्यांना मिरवतो त्यापैकी बहुतेक मुळात समस्याच नाहीत आणि असल्या तरी त्यांचे समाधान अतिशय सोपे आहे. आता हेच बघा! आर्थिक विकास ही भारतासमोरची मोठी समस्या आहे. आमच्या आर्थिक विकासाचा दर, आमचे दरडोई उत्पन्न, सरकारी खजिन्यातील विदेशी गंगाजळी हेच सांगते की, आम्ही गरीबच नव्हे तर कंगाल आहोत. स्वत:ला विकसनशील वगैरे आपण म्हणवून घेत असलो तरी परिस्थिती तशी नाही. आपला देश आकंठ कर्जात बुडालेला, कफल्लक देश आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत महाराष्ट्र देशातले अठागण्य विकसित राज्य होते. आज परिस्थिती काय आहे? 95 हजार कोटी रूपयांच्या कर्जाचा डोंगर महाराष्ट्रावर आहे. एका विकसित, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्याची ही परिस्थिती असेल तर इतर राज्यांची अवस्था न सांगितलेलीच बरी. देशातील सगळ्याच राज्यांचा विचार केला तर कर्जाची ही रक्कम 20-25 लाख कोटींच्या घरात सहज जाईल. विशेष म्हणजे हे राज्याचे अंतर्गत कर्ज आहे. केंद्र सरकारने उचललेल्या कर्जाचा भार वेगळाच. या सगळ्या कर्जाचा विचार केला तर देशाच्या 105 कोटी जनतेवर दरडोई किमान 10 हजाराचे कर्ज तरी निश्चितच आहे. आपल्या दरडोई उत्पन्नाचा आकडा वादठास्त असू शकेल, तो वाढण्याची शक्यताही कमी असेल, परंतु आपल्या दरडोई कर्जाचा आकडा निश्चित आणि सातत्याने वाढता आहे. ही परिस्थिती किंवा समस्या निर्माण होण्याचे नेमके कारण कोणते? आपल्या देशातील लोक निष्क्रिय आहेत का? हे लोक नियमाने कर भरत नाही
का? शेतकरी, उद्योजक,

कामगार हातावर हात देऊन बसलेले

असतात का? तसे तर काहीच नाही. इथली जनता कष्टाळू आहे. घामाच्या धारातून मोती पिकविण्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत. करदाते संख्येने जरी कमी असले तरी जे काही आहेत ते नियमाने कर भरतात. शेतकरी अहोरात्र कष्ट करतो. कामगार मान मोडून काम करतात. इतर राष्ट्रांच्या तुलनेत करांचे प्रकार आणि दरसुद्धा जास्त असतानादेखील करदात्यांनी कधी तक्रार केली नाही. शेतमालाला भाव नसतानादेखील बळीराजाने रक्ताचे पाणी करायचे थांबविले नाही. असे असताना आम्ही कंगाल का? आमच्या सरकारी तिजोरीत नेहमीच खडखडाट का असतो? सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांनीसुद्धा कधीही उदारता दाखविली नाही. साध्या पेट्रोलचेच उदाहरण घ्या, आपल्याकडे पेट्रोल 37 रू. लीटर आहे. अमेरिकेत दीड डॉलरला (67 रूपये) साडे तीन लीटर पेट्रोल मिळते. म्हणजेच केवळ 20 रूपये लिटर. आमच्या देशात शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही; शेतकऱ्यांना सबसिडी नाही, उद्योगांना सवलती नाहीत. सांगायचे तात्पर्य, सरकारी खजिन्याला गळती अशी नाहीच, केवळ लुटण्याचे काम सुरू आहे आणि वाटण्याचा प्रश्नच नाही. खर्च वेतनासारख्या तद्दन अनुत्पादक बाबींवर होतो. एकंदरीत दोन्ही हातांनी प्रचंड लूट करूनसुद्धा देशाचा खजिना रिता का, हा एक यक्ष प्रश्नच आहे. आमच्या कंगालतेचे रहस्यदेखील याच प्रश्नात दडले आहे. खरं सांगायचे तर यात रहस्य वगैरे काहीच नाही.
अर्थशास्त्राचा पायाभूत नियमाचेच आम्हाला नीट आकलन झाले नसेल तर दुसरे काय होणार? व्यापाराचे मूलभूत तत्त्वच आम्ही विसरलो असू तर विकास कसला होणार? यासंदर्भात एक साधे उदाहरण देता येईल. प्रत्येकी 200 रूपये घेऊन पाच माणसं जुगार खेळायला बसली तर तासभरच काय, अगदी आयुष्यभर जरी त्यांनी जुगार खेळला तरी त्यांच्याजवळील एकूण जमा रक्कम एक हजारपेक्षा अधिक होऊच श
णार नाही. याच्या खिशातून त्याच्या खिशातून पैसे सतत फिरत राहतील, वाढणार कधीच नाही. आपले आर्थिक धोरण या जुगाऱ्यांसारखेच आहे. आपले सरकार आपल्याच लोकांना लुटून आपलेच खिसे भरते. देशातील एखादी व्यक्ती श्रीमंत होत असेल तर याच देशातले किमान दहा माणसं गरीब होत असतात. त्यामुळे श्रीमंतांची श्रीमंती ज्या प्रमाणात वाढते आहे त्याच प्रमाणात किंबहुना त्याच्या कैक पटीत गरिबांची गरिबी वाढत असते. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र त्यामुळेच भ्रामक ठरते. व्यापार खऱ्या अर्थाने व्यापार होत असेल, दुसऱ्या देशातला पैसा इथे येत असेल तरच खऱ्या विकासाला वाव मिळू शकतो. व्यापाराच्या या अस्सल संस्कृतीतच विकासाचे बीज दडले आहे. व्यापाराचे हे मर्म ज्यांना कळले तेच देश विकसित झाले. तराजू संस्कृतीत वाढले म्हणूनच इंठाज अर्ध्या जगावर राज्य करू शकले. आज अमेरिका जगाचा दादा बनला आहे तो याचमुळे. पेट्रोलियम उत्पादनासाठी अमेरिकी डॉलर अरब राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात वाहू लागताच, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी, अरब राष्ट्रांची दादागिरी मोडून काढण्यासाठी अमेरिकेने सरळ इराकवर हल्ला केला. व्यापार आमच्या अटींवरच होईल, हे जगाला बजावून सांगणे एवढाच त्यामागचा उद्देश होता. आमचं मात्र सगळं उलटच आहे. एखाद्या गावात खूप उत्पादन होत असेल आणि ते गावातच राहत असेल तर गाव समृद्ध होणार कसे? गावातला भाजीपाला शहरात गेला पाहिजे, शहरातले यांत्रिकी तंत्रज्ञान गावात आले पाहिजे. आपल्याकडे जे पिकते ते विकल्या गेले पाहिजे आणि त्या पैशातून जे पिकत नाही ते विकत घेता आले पाहिजे, हाच एक समृद्धीचा मार्ग आहे. परंतु आम्ही प्रवास भकास गावाच्या दिशेने करतो आणि स्वप्न विकास गावाला जायचे बघतो. आमच्या देशातले उत्पादन परदेशात जात नाही, हे उत्पादन निर्यातक्षम व्हावे, यासाठी प्रोत्साहन दिले जात नाही, प्रयत्न
ोत नाही. परदेशी उत्पादनांना मात्र अगदी मुक्तद्वार प्रवेश आहे. वेळप्रसंगी देशी उत्पादनाचा गळा घोटून विदेशी उत्पादकांना जगविले जाते, पुष्ट केले जाते. ही परिस्थिती

केवळ दुर्दैवीच नव्हे तर आपल्या मूर्खपणाचे जाहीर प्रदर्शन करणारी

आहे आणि या मूर्खपणावर कळस चढविताना आपण ज्या गोष्टींचे इथे मुबलक प्रमाणात, दर्जेदार उत्पादन होते त्यांचीही आयात करीत असतो. आमचा शेतकरी उपाशी मेला तरी हरकत नाही, परंतु अमेरिकेतल्या शेतकऱ्याचे पोट भरले पाहिजे ही आमची उदारता! हे आमचे बिनडोक व्यापारी अर्थशास्त्र! आम्ही कापूस आयात करतो, साखर, अन्नधान्य, डाळी आयात करतो. या सगळ्या उत्पादनात आपण केवळ स्वयंपूर्णच नाही तर ही उत्पादने निर्यात करण्याच्या स्थितीत आहोत, परंतु घरची देवा देवा म्हणत असताना, बाहेरचीला चोळी शिवण्याचा आपला ‘नाद’ सोडायला आम्ही तयार नाही. आपल्या आर्थिक विकासाच्या मुळावर उठला आहे तो आपला हाच छंदीफंदीपणा.
आज देशावरच्या, पर्यायाने देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची आकडेवारी काढली आणि आपण विनाकारण आयात करीत असलेल्या उत्पादनासाठी केल्या जाणारा खर्चाचा त्यासोबत ताळा केल्यास तो बऱ्याच प्रमाणात जुळलेला दिसेल. आज आपल्यावर असलेले विदेशी कर्ज आयातीसाठी झालेला खर्च, या खर्चासाठी उचललेले कर्ज आणि त्यावरचे व्याज याच्यापेक्षा जास्त नाही. सांगायचे तात्पर्य, आम्ही कंगाल का आहोत? हा अर्थशास्त्राशी संबंधित फार मोठा गहन प्रश्न वाटत असला तरी त्याचे उत्तर अगदी सोपे आहे आणि ते म्हणजे व्यापार आणि अर्थशास्त्राची मुळाक्षरेच आम्ही कधी गिरविली नाहीत.
ज्यामुळे अगदी जगणेच अशक्य आहे अशा ज्या गोष्टी आपल्या देशात उपलब्ध होऊ शकत नाही त्यांची आयात एकवेळ समजू शकते. परंतु आपल्या आयातीला कोणता धर्मच उरलेला नाही. ज्या दिवशी आयात पूर्णपणे थांबून
ा देशातून केवळ निर्यात होऊ लागेल त्याच दिवशी विकासाचे चक्र योग्य दिशेने आणि वेगात फिरू लागेल. त्यासाठी विकासाचे हे मर्म जाणणाऱ्या लोकांच्या हाती सत्तासूत्रे सोपवावी लागतील. खरे राष्ट्रवादी अशाच लोकांना म्हणता येईल. सध्या सत्तेत असलेल्या, सत्ता मिळविण्याच्या मार्गावर उभ्या असलेल्या लोकांमध्ये ही ‘राष्ट्रवादी’ वृत्ती अभावानेच आढळते. अशा राष्ट्रवादी लोकांचा शोध घ्यावा लागेल. जितकी ती देशाची तितकीच काळाचीही गरज आहे. शेवटी सुख, समाधान, समृद्धी याचा संबंध कुठेतरी पैशाशी, पैशाचा अर्थशास्त्राशी, अर्थशास्त्राचा व्यापाराशी आणि व्यापाराचा सत्तासूत्रांशी येतोच.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..