नवीन लेखन...

हृदयरोग व आहार

हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्राचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.

हृदयावर जेवढी गाणी किंवा कविता होतात,तेवढ्या इतर कुठल्याही अवयवावर होत नाहीत. कारण हृदय व डोळे हे दोन अवयव भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहेत. अविरतपणे म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत x काम करणारे हृदय, हे अत्यंत लयबद्ध काम करीत असते. या लयबद्धतेला वैद्यकशास्त्रात सुद्धा अतिशय महत्व आहे. हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्‍प्रचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.

जंकफूड, बेकरी पदार्थ, रस्त्यावरील तळलेले पदार्थ, परत परत तेच तेल टाळण्यासाठी वापरणे, क्रीम, मांसाहार, आईस्क्रीम सारखे पदार्थ, सिगारेट, मद्यपान इत्यादी गोष्टी आपल्या तब्बेतीस घातक असतात, हे आपणास माहित आहे. पण तब्ब्येत म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्या हृदयावर प्रत्यक्षपणे परिणाम करीत असतात. असे पदार्थ सतत खाल्ल्यावर रोगांची मालिकाच सुरु होते. प्रथम वजन वाढायला लागते. नंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, इत्यादी रोगांची मालिका तरुण वयातच सुरु होते. आजकालचे बैठे काम, शरीराच्या कमी झालेल्या हालचाली, व्यायाम न करणे, कामाचा ताणतणाव, ह्या सगळ्याची भरच पडते. आजकाल अनेक कंपन्यांमध्ये दर वर्षी वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे खरेतर लोकांना वेळीच आपल्या चुका कळू शकतात. पण तरी वेळ नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते. खास करून बॉर्डर वर असलेली साखर बॉर्डरलाईन लिपीड प्रोफाईलचे अहवाल ही एक धोक्यालची घंटा असते. यावेळी खरेतर तातडीने डॉक्टईर आणि आहारतज्ञ गाठणे गरजेचे असते. तसे न करता, काही दिवस आपण वाचलेले, ऐकलेले, प्रयोग करतो आणि तरी जिना चढायला लागल्यावर धाप लागते. दिवस संपता संपता थकवा जाणवतो आणि मग आम्ही डॉक्ट,र गाठतो.

हृदयविकाराची कारणे अनेक असतात,पण आहारातील चुकांमुळे जो प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे. अरुंद रक्तवाहिन्या पूर्ण क्षमतेने रक्तपुरवठा करू शकत नाहीत. आणि ही रक्तवाहिनी जर हृदयालाच रक्तपुरवठा करणारी असेल, तर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे जी अवस्था होते, त्याला ऍथेरोस्केलेसीस म्हणतात. कोलेस्टेरॉल, कमी व जास्त घनतेची लायपोप्रोटीन्स, संतृप्त व असंत्रुप्त मेद, ह्या सगळ्या बद्दल आपण मागे एका लेखात माहिती घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष हृदयरोगात आहार कसा असावा, हे पाहूया .

हृदयरोगाचा आहार, हा कमी उष्मांक , कमी कर्बोदके, सर्वसाधारण प्रथिने, कमी स्निग्ध पदार्थ, त्यातही कमी कोलेस्टेरॉल व बहुअसंपृक्त मेदाम्ले असलेले व सर्वसाधारण जीवनसत्वे व खनिजांचा असावा. आहारात तंतुमय पदार्थ असावेत.

कर्बोदके एकूणच उष्मांकाचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे कर्बोदके सुद्धा आहारात कमीच असावीत. जर रोग्याला मधुमेह व लट्ठपणा असेल तर कर्बोदाकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. बटाटा, ब्रेड, साखर, साबुदाणा, असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. साखरेच्या ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला चुकीचा ठरू शकतो कारण त्यात उष्मांक एकसारखेच असतात. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, उत्तम, थोडा तांदूळही गरजेचाच आहे. शक्यरतो सकाळी घ्यावा.

प्रथिने प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येक किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिने आवश्याक आहेत. किलो वजन असल्यास ग्रॅम प्रथिने आहारात असावीत. डाळी, कडधान्ये, गाईचे दुध, अंड्याचा पांढरा भाग, मासे, कमी उष्मांक असलेले पनीर इत्यादी मधून प्रथिने चालतील. पण मटन, पोर्क, इत्यादी नसलेलेच चांगले .
स्निग्ध पदार्थ हृदयरोग असणाऱ्या साठी स्निग्ध पदार्थ हा खूपच चर्चेचा विषय असतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार होत असते. त्यामुळे आहारातून शरीरात जाणाऱ्या कोलेस्टेरॉल बद्दल प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यअक आहे. लोणी, चीज, क्रीम, अंड्याचा पिवळा भाग, मांसाहारातील रेड मिटच्या किडनी, लिव्हर इत्यादी भागात कोलेस्टेरॉल जास्त असते म्हणून हे पदार्थ टाळावेत. आपण ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतो, ते कमी घनतेचे लायपोप्रोटीन्स असतात आणि हेच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतात . त्यामुळे वरील पदार्थ टाळणेच उत्तम. रोजच्या आहारात आपण मुख्यत्वे तेल व तुपाचा वापर करतो. तेलाच्या अनेक जाहिराती आपल्याला संभ्रमात पाडणाऱ्या असतात. काही जाहिराती झिरो कोलेस्टेरॉल तेलाच्या असतात, तर काही तेले फिल्टर किंवा रिफाईंड असतात. ह्यावर उत्तम उपाय म्हणजे आलटून पालटून वेगवेगळ्या कंपन्यांचे व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा. घाण्याचे तेल पण उत्तम असते. तेलबियांपासून काढलेल्या घाण्यावरच्या तेलात स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे सुद्धा असतात. इतर तेलांमध्ये त्यांना फोर्टीफाय केलेले असते. ओलिव्ह मोहोरी, करडई तेले उत्तमच आहेत, ह्या सगळ्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक माणसाला एक महिन्याला एक लिटर तेल पुरेसे आहे. वनस्पती तूप व ते वापरून केलेले पदार्थ टाळलेलेच बरे. साजूक तूप शरीरास उत्तम आहे. प्रत्येकाने रोज चमचे ( टी स्पुन्स पूर्ण भरून ) तूप खावे.

तंतुमय पदार्थ भाज्या व फळे तसेच कडधान्य व तृणधान्याचे बाहेरील आवरण तंतुमय असते. काकडी, मुळा, गाजर, सफरचंद, यांचे साल न काढता स्वच्छ धुवावे व सालीसकट खावे. पालेभाज्यांची कोवळी देठे पूर्ण वापरावीत. शेंगभाज्यांच्या शिरा न काढता त्या चिराव्यात म्हणजे भरपूर तंतू आपल्या पोटात जातात. हे तंतू बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात व रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

जीवनसत्वे व खनिजे एखादी मोठी इमारत छोट्या विटा, त्याहून छोटे कण असलेली वाळू, व सिमेंट यांची बनलेली असते. त्याप्रमाणेच जीवनसत्वे व खनिजे यांचे प्रमाण अत्यल्प असले तरीही ते अत्यंत मोठी कामे करीत असतात. फळे, भाज्या दुध, अंडी, सुका मेवा, यामधून शरीराला याचा पुरवठा होत असतो. पण हृदयरोग्यांनी फळे व भाज्यांच्या माध्यमातूनच ह्याचे ग्रहण करावे.

ह्या सगळ्या सोबत तज्ञ व्यायाम तज्ञाकडून व्यायाम शिकणे, किंवा योगासने, प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हृदयाची धडधड अनेक वर्ष लयबद्ध होत राहावी असे वाटत असल्यास नियमित व्यायाम, उत्तम आहार व नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत आवश्यवक आहे .

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.आश्ले षा भागवत, आहारतज्ज्ञ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..