नवीन लेखन...

श्री क्षेत्र गणपतीपुळे

 “कोकण” – महाराष्ट्राच्या कोंदणातील हिरवागार पाचू. समोर पसरलेला निळाभोर आणि शांत समुद्रकिनारा, आकाशाशी स्पर्धा करणार्‍या उंचच उंच नारळपोफळींच्या बागा, हिरव्यागार झाडांमधुन धावणारी लालचुटुक मातीची वाट, आंबा, फणस, काजू इ, रानमेवा, कौलारू चिरेबंदी घरे, वडे सागुती असा फक्कड बेत, प्रेमळ कोकणी माणूस हे सगळे रसायन एकत्र केले कि तयार होते “कोकण”. भगवान परशुरामने वसवलेल्या याच कोकणातील एक भाग म्हणजे “रत्नागिरी” जिल्हा. आंबे-फणस, नारळ-पोफळींच्या बागांनी समृद्ध रत्नागिरीला अप्रतिम असे निसर्गसौंदर्य बहाल केले आहे.

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला “पुळ्याचा गणपती” असेही म्हणतात. समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते.

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किनार्‍यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुसर्‍या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे Combination आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणार्‍या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आ
ि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे.

गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील पुरोहितांच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते.

तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात.

।। ॐ गं गणपतयेनम : ।।

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..