नवीन लेखन...

शिवथरघळ – विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे

हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा आध्यात्माचा स्पर्श….हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे.घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकी गंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊस पाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांच उभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेला मोठा धबधबा आपल्या दृष्टिस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांना याचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.डोंगराच्या कपारीत १००-१५०माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेशमंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.या ठिकाणी धार्मिक विधी सतत सुरु असतात .खिचडीच्या प्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरम पिठलं-भा री ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळनाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृहआहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथूनघळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकणरेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र. ९२२५७८४१२७नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातूनबाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच…………………………………….

— श्री.सुनिल पाटकर

1 Comment on शिवथरघळ – विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे

  1. सुंदर मठ’ रामदास पठार – शिवकालीन शिवथर प्रांत

    समर्थाचे २८ वर्षे वास्तव्य असलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील जागा हि सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज – आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व ऐतिहासिक पुरावे ह्या लिंक वर देत आहे

    http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4635985100503934906&OId=5580116005441001346&TName=

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..