नवीन लेखन...

राजकारणातील काही ‘गुळगुळीत’ वाक्ये





राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :

  • विरोधकांचे ‘हुकूमी’ कार्ड : त्यांना पदावर

    रहाण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे.

  • प्रत्येक मंत्र्यांचे ‘आवडते’ वाक्य : राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

  • सर्वांचा आवडता ‘छापील’ बचाव : या आरोपात काहीही तथ्य नाही, राजकीय हेतूने प्रेरित हे आरोप म्हणजे मला बदनाम करण्यासाठी रचलेले कुभांड आहे.

  • सर्वात ‘हास्यास्पद’ हमी : तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करू. (करणार नाही म्हणून तर बघा)

  • सर्वात ‘मिळमिळीत’ घोषणा : गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, ‘कठोर’ कारवाई करू.

  • जगातील सर्वात लोकप्रिय इशारा : पाकिस्तानने आगळीक केल्यास त्याचे ‘गंभीर’ परिणाम त्यांना भोगावे लागतील.

  • सर्वात ‘मजेशीर’ आश्वासन : येत्या — वर्षात राज्य ‘भारनियमन मुक्त’ करू.

  • वेळ मारून नेणारी घोषणा : मी अजून ते निकालपत्र वाचलेले नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही.

  • चालढकल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त घोषणा : याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल.

  • सर्वात लोकप्रिय ‘उपदेश’ : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता ‘धंदा’ करावा. (फक्त राजकारणाचा सोडून)

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..