नवीन लेखन...

मुंगी आणि झाडाचे पान

एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती.

एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली.

ती मुंगी तिच्या कामामध्ये ‘फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड’ होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याउला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते.

पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याफच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती.

सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्या च्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले.

पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते.

माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात?

याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुणात नेता आले नाही.
आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का?

तुम्हाला काय वाटते?

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..