नवीन लेखन...

बाल निरीक्षणगृहास (रिमांड होम) आयएसओ



सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणार्‍या उद्योगांनी गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्यास संबंधित संस्थेला आयएसओ ९००१/२००० मानांकन मिळत असते. खाजगी संस्थेबरोबर शासकीय संस्थाही आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना मिळणारे आयएसओ मानांकन म्हणजे खाजगी

सेवा क्षेत्रा इतकेच तोडीस तोड सेवा देऊन नागरिकांच्या सेवेला सदैव हजर असल्याची ती एक पोचपावतीच होय. आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा, मुंब्रा, नौपाडा, वर्तकनगर आदी पोलीस स्टेशन तसेच कल्याण येथील सेतू कार्यालय, ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा आणि आता भिवंडी येथील बाल निरीक्षणगृहास (रिमांड होम) आयएसओ ९००१-२००० प्रमाणपत्रही प्राप्त झाले होते.भिवंडी जि. ठाणे येथील बाल निरीक्षण जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना, ठाणे संचलित बाल निरीक्षण गृह, भिवंडी ही संस्था अनाथ, निराधार, उपेक्षित, दुर्लक्षित, बाल अपचारी प्रवेक्षिकांना आश्रय, संगोपन, शिक्षण, संस्कार देऊन पुनर्वसनाचे व समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य गेली ५८ वर्ष करीत आहे. खाजगी क्षेत्रात सेवा देणार्‍या संस्था आयएसओ मानांकन मिळवून गुणवत्तेचा निकष दाखवित बाजारपेठेवर वर्चस्व राखत असतात. आजचा ग्राहक चोखंदळ आहे व त्याला विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे ‘चांगल्यात चांगले’ या तत्त्वावर आपली निवड तो ठरवित असतो. हे चांगले शोधून त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम आयएसओ प्रमाणपत्र करीत असते. खाजगी संस्था या नफ्याच्या दृष्टीने आयएसओ महत्वाचे मनतात. मात्र शासकीय संस्था अधिकाधिक जनहित डोळ्यासमोर ठेवून आपली कार्यप्रणाली आखत असतात. एखादा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून होणारे काम आणि एक निष्काम सेवाव्रत हाच या दोघातील महत्वाचा फरक आहे.भिवंडी येथील बाल निरीक्षकगृहात निराधार म
ले तसेच अल्पवयात एकाद्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना (वय १८ पेक्षा कमी) प्रवेश दिला जातो. जिल्हा बालकल्याण समिती व जिल्हा न्यायालयाकडून अशा मुलांची रवानगी ही बाल निरीक्षणगृहात होत असते. सामाजिक व मानसिकदृष्टय़ा भरकटलेल्या या मुलांना चांगले

व वाईट यातील फरक समजावून देतांना त्यांच्या आयुष्यात परिणामकारक सुधारणा घडवून आणण्याचे ध्येय या संस्थेचे आहे.आज या संस्थेत ११४ मुले व ५४ मुली वास्तव्यास आहेत. संस्थेतील त्यांच्या वास्तव्याच्या काळात त्यांच्या वाईट सवयी व चुकीच्या निवडी सुटण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. समाजाप्रती त्यांची कर्तव्ये व सामाजिक तत्वे हे शिकवत असताना शिक्षणाच्या बाबतीत शक्य तेवढे उत्तम ज्ञान, चांगले कपडे, पुस्तके, गादी, खेळणी, अन्न व स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध करुन घरासारखे वातावरण तेथे निर्माण करण्यात आले आहे.संस्थेच्या मनोरंजनासाठी सिनेमा, नाटके, जादूचे प्रयोग, आनंदमेळावा, पिकनिक यांचेही आयोजन होत असते. तसेच दूरचित्रवाणी संच व व्ही.सी.आर. देखील मुलांच्या सेवेसाठी तैनात असतो. खेळीमेळीच्या वातावरणात मुलांमधील विकृती घालवताना भविष्यात स्वबळावर उभे राहण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण इत्यादी दिले जाते. संस्थेचे कामकाज हे पूर्णत: संगणकीकृत असून मुलांच्या प्रवेशासोबत त्यांना निरीक्षणगृहातून सोडताना होणार्‍या कार्यालयीन बाबी या पूर्णत: पारदर्शी ठेवण्यात आल्या आहेत. भारनियमनाच्या काळात इन्व्हर्टरच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था कायम राखण्यात येते. याशिवाय कर्मचारी व मुलांकरिता इंटरनेटचे ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही याठिकाणी उपलब्ध आहे.संस्थेचे संचालक व विश्वतांची तीन महिन्यातून एकदा आढावा बैठक होत असते. संस्थेचा लेखा अद्ययावत अस
न लेखापरीक्षकाव्दारे आर्थिक व्यवहारात पारदर्शीपणा राखला जातो. याच बळावर संस्थेने देणगीरुपाने मिळणार्‍या रकमेवर आयकर सूट मिळणारे प्रमाणपत्र ३५ ए.सी. आणि एफसीआरए प्राप्त केले आहे.संस्थेच्या पुढील वाटचालीविषयी माहिती सांगताना संस्थेचे सचिव दीपक कलंत्री म्हणाले, बाल निरीक्षणगृहाची क्षमता १५० वरून ३०० पर्यंत वाढवणे, संस्थेला ३५ एसी/एफसीआरसी (विदेशी मुद्रा) प्रमाणपत्र मिळविणे, विद्यार्थ्यांना शिक्षण, अंशकाली¬न प्रशिक्षण व हा कालावधी संपल्यानंतर प्रशिक्षणार्थींना नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे या बाबींवर भर देण्यात येणार आहे.

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..