नवीन लेखन...

पर्सनल काँप्युटरवरचा डाटा आता शेअर करा कुठूनही!



कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील लक्स अनंतरामन याने iTwin नावाची USB ड्राईव्हची जोडी बनविली असून त्याद्वारे केबलविना दोन काँप्यूटरमध्ये सुरक्षितरित्या डाटा शेअरींग करणे

शक्य झाले आहे. यासाठी इतर कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता लागत नाही, मात्र इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यक आहे.

अनंतरामन हा 1994 सालचा IIT चेन्नई येथील पदवीधर असून, भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे त्याचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. iTwin ही केबल विरहीत केबल आहे, दोन उपकरणांदरम्यान कोणत्याही कटकटीविना फाईल्सची देवाणघेवाण करणे अगदी सोपे आहे. यांत कोणतेही जटील सॉफ्टवेअर किंवा configuration प्रक्रिया नाही. यासाठी वेळखाऊ logins किंवा पासवर्डची गरज नाही. फक्त प्लग करा आणि फाईल शेअरिंग करायला तयार व्हा. यातील डाटा हा आपल्या काँप्युटरवरच रहातो आणि स्थानांतरण encrypted स्वरुपात होते. या सर्व प्रक्रियेवर तुमचे संपूर्ण नियंत्रण रहाते. समजा जरी यापैकी एक USB हरविले तरी तुम्ही दुसरे USB अनप्लग करुन डेटा सुरक्षित ठेऊ शकता. आणि पहिल्या वेळी पेअरिंग करतानाचा पासकोड वापरुन तुम्ही हरविलेले USB रिमोटली डिसेबल करु शकता असा अनंतरामनचा दावा आहे.अनंतरामन याने सिंगापूर येथील त्याचा सहकारी Kal Takru याच्या सहाय्याने iTwin सिंगापूर येथे विकसीत केली आहे. याची किंमत शंभर डॉलर म्हणजे सुमारे पाच हजार रुपये इतकी आहे.आगळं!वेगळं!

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..