नवीन लेखन...

दान-धर्म आणि त्याग

चुकीच्या कार्यासाठी केलेला दान-धर्म आणि चुकीच्या माणसांसाठी केलेला त्याग हा नेहमीच निरर्थक असतो. त्यामुळे सध्याच्या काळात माणसाने दान-धर्म आणि त्याग दोन्ही विचार पूर्वकच करण्याची आवश्यकता आहे. आपल्या धर्म-शास्त्राप्रमाणे मनुष्य आपल्या आयुष्यात जे काही कमावेल त्याचा दहावा भाग त्याने दान-धर्मासाठी खर्च करावा असे सांगितले आहे. मी तर त्याही पुढे जाऊन म्ह्णेन माणसाने त्याग करताना ही हातचा राखूनच करावा. आज आपण पाहतो आपल्या आयुष्यात लाखो – करोडो रूपये कमावलेले लोक ही वृध्दाश्रमात शेवटच्या घटका मोजत पडलेले दिसतात, त्यापैकी बर्याोच जणांवर ही वेळ दान – धर्म आणि त्याग केल्यामुळेच बहुदा आलेली असते. दान – धर्म आणि त्याग केल्यामुळे पुण्य मिळ्ते यात किती तथ्य आहे की नाही ते तो देवच जाणे. आज तुंम्ही जेवत असताना कोणी उपाशी आला तर त्याला आपल संपूर्ण ताट देण्यापेक्षा त्यातील काही भाग देणच हिताच ठरेल. कित्येक आई-वडील आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्या मुलांच्या नावावर करतात आणि मग एका – एका पैशासाठी त्यांच्यासमोर हात पसरावे लागतात तेंव्हा त्यांनी केलेल्या कृतीचा त्यांनाच पश्चाताप होतो आणि मग मरेपर्यत मुलांना शिव्या – शाप देत राहतात. सध्याच्या काळात माणसाने आपल्या मालकीच्या अगदी छोट्या- छोट्या वस्तूंवरीलही आपला मालकी हक्क सोडता कामा नये. ती वस्तू इतरांना वापरायला देणे ठिक आहे. पण एकदा का तुंम्ही त्या वस्तूवरील मालकी हक्क सोडला की तुंम्हाला गरज असतानाही ती वस्तू तुंम्हाला मिळत नाही आणि मग त्याच वस्तूसाठी तुमच्यावर इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येते. कोणत्याही वस्तूवरील तुमचा मालकी हक्कच तुमच्यावर कोणतही आर्थिक अथवा इतर संकट आल्यास तुंम्हाला उपयोगी पडत असतो. सध्याच्या काळात अगदी रक्ताच्या नात्यावरही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती उरलेली नाही, ती इतकी बिघडलेली आहे की अगदी बायकोने अथवा नवर्यासने ही आपले मालकी हक्क एक-मेकांच्या नावावर करू नयेत. आपल्या मह्त्वकांक्षा, आपली स्वप्ने आणि आपले अनैतिक संबंध यासाठी आजकाल माणूस रक्ताच्या नात्याचाही बळी द्यायला मागे-पुढे पाहत नाही.

कित्येकदा आपण जो दान – धर्म करतो त्याचा उपयोगही चुकीच्या गोष्टींसाठी होताना दिसतो. आपण केलेल्या दान – धर्माचा उपयोग जर चुकीच्या कार्यासाठी झाला तर आपण केलेल्या दान-धर्मामुळे आपल्याला पुण्य तर मिळणार नाहीच उलट आपण पापाची भागी होऊ नाही का ? सध्याच्या काळात तुंम्ही एक माणूस म्ह्णून किती मोठे तुमचे विचार किती प्रगल्ब आहेत समाजासाठी तुंम्ही किती त्याग केलेला आहे यापेक्षा ही हल्ली तुंम्ही राहता कोठे आणि कोणत्या परिस्थितीत यावरून तुमची समाजातील पथ ठरत असते ढोबळ्मानाने. त्यामुळे आपली आर्थिक बाजू सांभाळ्तच हल्ली दान-धर्म आणि त्याग करणेच समाजाच्या हिताचे आहे. कित्येक कलाकार आणि समाजसेवी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या आर्थिक परिस्थितीचा फारसा विचार न करता समाजाला सतत काही तरी देत राहतात. पण त्यांनाही सरकारी कोठ्यातून अथवा इतर माध्यमातून घर देताना त्याच्या आर्थिक बाजुचा विचार केला जातोच ना ? तेंव्हा त्यांना स्वतःवर हसू येत पण तोपर्यत खूपच उशिर झालेला असतो आणि लोकांच्या नजरेत त्यांनी मुर्खपणा ही केलेला असतो. कित्येक लोकांनी आपल्या भावंडासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो पण नंतर त्याच्या त्याच भावंडाना त्याच्या स्वप्नांशी काहीच देण घेण असत का ? नसत कारण तेंव्हा ते आपली स्वप्ने जगण्यात व्यस्त झालेले असतात आणि हा आपल्या स्वप्नांच्या आठवणींवर जगत असतो. कित्येक तरूण- तरूणी आपल्या आई-वडिलांच्या अथवा वडिलधार्याज व्यक्तींच्या दबावाला बळी पडून आपल्या प्रेमाचा त्याग करतात आणि आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा करून बसतात. आपल्या प्रेमाचा त्याग केल्यामुळे आपल्याला होणारा त्रास वाटून घेण्यास कोणीही कधीच तयार होत नसतो. कोणासाठी ही इतका मोठा त्याग करावा इतक प्रेम कोणी कोणावर कधीच करत नसतो. आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणार ी आईही आपल्या सूनेशी पटेनास झाल की मुलाला वेगळा संसार थाटण्याचा सल्ला देतेच ना ? त्याग करतानाही तो आज डोळसपणे करण्याची नितांत आवश्यकता आहे.

समाजात एक-एकटे राहणार्यांजच प्रमाण वाढतय भविष्यात ते आणखी वाढतच जाणार आहे. पण या एकट्या लोकांकडे बरंच काही असणारही आहे त्यामुळे तू एकटा अथवा एकटी आहेस तुला हे काय करायच तुला हे काय करायचय ? वगैरे सांगून त्यांच्या मालकीच्या वस्तू अथवा संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होणारच त्यामुळे या एकट्या लोकांनी तर अधिक सावध राहायला हंव आपल्या हयातीत आपल्या मालकीच्या सुईवरचा हक्क ही सोडायचा नाही. आपण इतरांसाठी इतका दान-धर्म केला त्याग केला म्ह्णून आपल्यावर कोणतही संकट आल्यास आपल्या मदतीला कोणीतरी ताबडतोब धावून येईल असा विचार करणे यासारखा दुसरा गाढवपणा नाही. रस्त्याच्या कडेला झोपलेल्यांच्या मालकीची इतकी ही जमिन नसते की तिथे त्यांना हक्काने झोपता यावे त्यांनीच खर्याे अर्थाने इतरांसाठी सर्वोत्तम दान – धर्म आणि त्याग केलेला असतो पण जग त्यांच्या जाण्याची कधीच दखल देखील घेत नाही. माणूस मृत्यूनंतर आपल्या सोबत काहीच घेऊन जात नसतो पण तरीही सध्याच्या जगात त्याने मागे काय सोडलय यावरूनच तो गेल्यानंतरही त्याची किंमत ठरत असते हे तरी विसरून कसं बर चालेल…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

1 Comment on दान-धर्म आणि त्याग

  1. daan denaryala tya gishtichi askti asel tr to daan kadhich det nahi
    tyag khoop lambchi gosht

    daan denaryalakadhich garv nasava daanacha nahi tr tyach daan shunya aahe

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..