नवीन लेखन...

चीनचा प्रश्न सहकार्याने सुटू शकेल!



चीन ब्रह्मपुत्रा नदी वळवून पाणी उत्तर चीनकडे नेण्याचा विचार करत आहे. चीनच्या दक्षिणेला यांगत्से नदी २१०० सालापर्यंत तरी ठीक असेल. तिचे पाणी वळवून उत्तरेकडील आटलेल्या पिवळ्या नदीत नेण्यात येते. राजधानी बिजींगचे पूर्ण जीवन तर पूर्णपणे वळवून नेलेल्या

नद्यांच्या प्रवाहावर अवलंबून आहे. यांगत्से वळवण्यात मर्यादा आल्या, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यालोंग त्सांगपो म्हणतात. ती अरूणाचल मार्गे भारतात येण्याआधी मोठे वळण घेते व प्रचंड उंचीवरून खाली कोसळते. त्या वळणापाशी धरण बांधून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा मनसुबा आहे. भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर नदीप्रवाहामुळे युध्द होउ शकते. मात्र त्याने साध्य काहीच होणार नाही. काही वर्षांनतर नद्या आटतील, धान्याचे उत्पादन कमी होईल. उद्योगांना पाणी व वीज मिळणार नाही, सर्वांचे मोठे नुकसान होईल. भारतात विषेशत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांचे अतोनात नुकसान होईल. तेथून उत्पन्न होणारे अन्न कमी झाल्याने देशाच्या उर्वरीत भागातही महागाई वाढेल. उत्तरेकडून दक्षिण भारतात लाखो लोक स्थलांतर करतील आणि साऱ्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल. चीनमध्ये तीच परिस्थिती होईल. उत्तर चीनमध्ये कायमचे अवर्षण होऊन अंधाधुंदी माजेल.

हे सर्व महाभारत टाळण्यासाठी हुशारीने जर संबधित राष्ट्रांनी सहकार्याचा मार्ग स्वीकारला व नद्यांचे आयुष्य वाढवण्यसाठी मोठी मोहीम राबवली, तर सर्वांचाच फायदा होईल. त्यासाठी एका नवीन मानसिकतेची गरज आहे. संकुचित राष्ट्रवादाऐवजी एक व्यापक दृष्टीकोन व सर्व आशिया खंड एक परिवार या प्रवृत्तीने भवितव्याकडे पाहण्याची गरज आहे.

संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०

आशिया खंड सोडल्यास इतर खंडांमधील देश आपापसातील वैर विसरून एकमेकांशी सहकार्याच्या तत्वाने एकत्र मिळून प्रगतीची वाटचाल करत आहेत. परंतू आशिया खंडात हे चित्र दृष्टोत्पत्तीस पडत नाही. इतर खंडातील देशांनी एकमेकांत वैर असण्याचे नुकसान-तोटे भोगलेले आहेत. पण आशिया खंडातील

देश या दृष्टीने अजुनही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ येथे लक्षात घेण्याची खरोखर गरज आहे. स्वार्थ विसरून आणि एकमेकांच्या फायद्याच्या गोष्टींत समसमान रस घेउन एकत्र प्रगती करणे शक्य आहे. आशिया खंडातील अशाच गंभीर प्रश्नांवर कशाप्रकारे यशस्वीपणाने तोडगा काढला जाउ शकतो यावर संदीप वासलेकरांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे.

— तुषार भामरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..