नवीन लेखन...

गरज आहे बदलाची…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची नुकतीच पुण्यात हत्या करण्यात आली. हि घटना ताजी असतानाच मुंबई मध्ये एका पत्रकार तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली, हे सगळ होत असताना, पुणे जिल्ह्यात अजून एक दोन बलात्काराच्या घटना घडल्या, कोल्हापूर मध्ये एका दीड वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले. रोज देशाच्या अनेक छोट्या छोट्या शहरात, ग्रामीण भागात अशा अनेक घटना घडतात. मग महानगरात एखादी घटना घडली तरच आपण जागे का होतो?

तात्पुरता आपण देशाचा विषय बाजूला ठेऊ. महाराष्ट्रात रोज किती गुन्हे घडतात? किती खून होतात, किती बलात्कार होतात, किती चोऱ्या, लुटमारीच्या घटना असे आणि कित्येक वेगवेगळे गुन्हे आपल्याच आजूबाजूला घडत असतात. रोज सकाळी वृत्तपत्र ५०% हून अधिक याच घटनांनी तर भरलेला असत. असा काही घडल कि आपण क्षणभर हळहळ व्यक्त करतो. मनातल्या मनात कुठे तरी देवाचे आभार मानतो. कि आपण या घटनेचा हिस्सा नाही. आणि आपल्या कामात व्यस्त होतो. काही वेळा अशा घटना महानगरात घडतात तेव्हा, आपली जागृत मेडिया आपण आहोत याची जाणीव करून देत, दिवसातील prime time news किवा ब्रेअकिंग न्यूज म्हणून, दिवसभर एकाच घटना एकच वाक्य उलटपालट करून दाखवते. आणि आपणही जागृत नागरिक म्हणून अशा बातम्या बघून अरे अरे वाईट झाल, असा म्हणून चानेल बदलतो. आणि आपल कर्तव्य संपत. पण ग्रामीण भागात जे गुन्हे घडतात तिथे ज्या कोणी बालिका, महिला किवा कोणत्याही गुन्ह्याला बळी पडलेली व्यक्ती यांची दाखल कोण घेत हो? वृत्तपत्रात आतल्या पानावर बातमी छापून येते, अमुकामुक ठिकाणी शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या. आणि खाली त्या खाली ४ ओळींचा वृत्तांत. वृत्तपत्रही आणि वाचक दोघाही आपण आपला कर्तव्य पूर्ण केल्याच्या अविर्भावात आपला काम करतात, एक छापतो, एक वाचतो आणि दोघाही नंतर सरकार, प्रशासन, आणि राजकारण्यांच्या नावाने शिव्या घालत इथे काहीच होऊ शकत नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा ह्यायला पाहिजे. अशा बौद्धिक चर्चेने विषयातील गम्भिर्यात आपला किती सहभागी आहोत हे दाखवून देतात. बर अशा काही घटना घडल्या आणि त्याविरोधात कोणी रस्त्यावर उतरलं तरी त्यांचा कौतुक करायला मेडिया ला वेळ नसतो आणि वृत्तापात्रानामध्ये जागा नसते. असो हा विषय वादळी चर्चेचा ठरू शकतो. आणि हा माझा विषय हि नाही.
मुख्य मुद्दा हा आहे कि, कायम प्रशासन राजकारण्यान बद्दल बोटे मोडणारे आपण किती वेळा समोर घडणारी घटना थांबवायचा प्रयत्न करतो. रस्त्याने चालणार्या, बस मध्ये बसलेल्या, किवा कोणत्याही वर्दळीच्या भागात एखाद्या मुलीची कोणी छेड काढत असेल तर आपण किती वेळा असा छेड काढणार्यांना अडवतो. किवा काही लोक एखदयाला मारत असतील तर आपण किती वेळा त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो. वास्तविक विचार केला तर, रस्त्याने येणारे जाणारे ४ लोक जर अशा प्रसंगी एकत्र आले तर, असे गुन्हे त्याच क्षणी रोखता येतील किवा तशा गुन्हेगारांना एक प्रकारचा वचक बसेल. अगदी पुढे जाऊन रस्त्यात अपघात होऊन कोणी पडला असेल तर त्या पडलेल्या जखमी व्यक्तीला मदत करायला किती लोक पुढे येतात? असे एक न अनेक प्रश्न जेव्हा आपण स्वताला विचारतो तेव्हा खरच आपण प्रशासन, राजकारणी, सरकार यांना जाब विचारन्या योग्य आहोत का हे कळत.
कायदा सुव्यवस्था राखण्याचा काम प्रशासनाचा आहे. सरकारचा आहे. या बद्दल दुमत नाही. आणि त्यांनी ते केलाच पाहिजे त्यांनी नाही केल तर त्यांना जाब विचारण्याचा आपला हक्क आहे. त्यांना प्रश्न विचारण, कारवाईसाठी अडून बसन हे सगळ करायलाच हव. पण त्याआधी आपण हि या सर्व यंत्रणेचा एक महत्वाचा भाग म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करण अपेक्षित आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचा झाल तर, जर आपण मतदान न चुकता करत असाल, आणि योग्य आणि लायक उमेदवारालाच मतदान करत असाल, तर त्याच्याकडून अपेक्षित कामांची, आपल्या सुरक्षेबद्दल जागृत रहायची जवाबदारी नक्कीच त्यांची आहे. आणि त्याबद्दल त्याची उलट तपासणी घेण हा आपला हक़्क़ आहे. पण जर मतदानाचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून आपण फिरायला जाण्यात घालवत असाल. तर देशात घडणाऱ्या एकही घटनेच्या विरोधात बोलायची किवा त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारायची नैतिक जवाबदारी आपली नाही. तो अधिकारच आपला उरत नाही. कारण जेव्हा आपल्या भवितव्याबद्दल काही अधिकार आपण कोणाकडे देत असतो, त्या महत्वाच्या क्षणी आपण एक सुट्टी म्हणून कुठे तरी बसून बिअर पीत असतो. सुट्टी एन्जोय करत असतो. मग नंतर त्यांच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे. बर प्रशासनाला, पोलिसांना अनेकदा आपल्या सारख्या सामान्य नागरिकांची मदत अपेक्षित असते. अनेक वेळा घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार असतात. पण असे किती सुजन नागरिक समोर येतात आणि मदत करतात.
असे आणि अनेक गंभीर प्रश्न आहेत, जे खरोखरच आपल्याला आता आपल्या मनाला विचारावे लागतील. सरकार जातील येतील बदलतील, प्रशासन बदलेल किवा तेच राहील. पण आता आपण बदलायला हव, आपल्या जागृत मेडियाने बदलायला हव. नुसत्या TRP न्यूजसाठी धावपळ न करता जे सत्य आहे. जे खरोखर लोकांपर्यंत पोहोचन अपेक्षित आहे. तेच दाखवा मग ते बरोबर कि चूक त्यात कोण दोषी आहेत आणि कोण निर्दोष आहेत हे आमचा आम्हाला ठरवू द्या. स्वत न्यायाधीश होऊन निवाडे करत बसू नका, त्यासाठी आदरणीय सर्वोच्च न्यायालय आहे. किवा कोणलाही जाणून बुजून नायक खलनायक बनवू नका. एवढीच विनंती आहे. आपण हि आपल्यात बदल घडवायला हवेत. गुन्हेगार किवा राजकारणी हि सुद्धा माणसच असतात, त्यांना कधी कुठे आणि कस डोक्यावर घ्यायचा हे आपणच ठरवतो. किंबहुना घेतो. मग त्यांना डोक्यावरून उतरवायला किवा धुळीत मिळवायला आपल्यालाच किती वेळ लागणार आहे. आणि हे जर सगळ आपण करू शकतो, मग कशाला कोणावर अवलंबून बसायचा. आपल्याला गरज आहे फक्त इच्छाशक्तीची आणि आणि आपल्या बाजूने आपण परिपूर्ण होण्याची. मराठीत एक म्हण आहे “ दृष्टी तशी सृष्टी” आगदी सोप्या शब्दात आपण आपल्या नजरेतून बघू तसाच जग आपल्याला दिसेल. मग जर आपल्याला गुन्हेगारी मुक्त आणि सुरक्षित आयुष्य हवे असेल तर आधी स्वताला आपल्या आजूबाजूच्या जगाला सुरक्षेचा विश्वास देन गरजेचा आहे. त्यासाठी कायम जागृत आणि संवेदनशील राहण्याची गरज आहे. बाकी आपण सगळे सुजन आहोतच.

आपला,
शैलेश देशपांडे
पुणे

— शैलेश देशपांडे उर्फ श…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..