नवीन लेखन...

रंग बदलणारे सरडे

रंग बदलणाऱ्या त्या सरड्यालाही लाजवेल
इतके रंग बदलणारे काही सरडे असतात माणसाच्याच रुपात …..

हे सरडे आपल्या सोबत कधी – कधी
मित्राच्या बुरख्यात वावरत असतात आणि एक दिवस आपलाच घात करतात …..

आपल्या हितचिंतकाबद्दल आपलेच कान भरून
आपल्याला त्यांच्यापासून दूर करत असतात ….

कधी – कधी हे सरडे आपल्याला मोठेपण देऊन
आपल्या पाठीमागे आपल्यालाच कमी लेखत असतात …

स्वत : च्या स्वार्थासाठी आपला उपयोग करून
जगात प्रसंगी आपल्यालाच बदनाम करत असतात ….

अशा सरड्यांचे बदलणारे रंग आपल्याला
डोळ्यात तेल घालून पाहिल्यावरच दिसतात ….

आपल्या आजूबाजूला असे अनेक सरडे
बेमालूमपणे वावरत असतात ….

हलके कान असणारेच या अशा
सरड्यांची शिकार सहज ठरत असतात …

रंग बदलणारे हे सरडेच कित्येकदा रंग
कसे बदलावे हे त्यांच्याही नकळत इतरांना शिकवित असतात ….

निलेश बामणे

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..