नवीन लेखन...

कुळीथ (हुलगे)

कुळीठास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्‍तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे.

आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.

आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.

कुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅलशियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना calsium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.

* कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
* शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
* कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.
* अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
* मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
* पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो.
* पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.
* खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.

कुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात.

कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.
१०० ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे –
२२ ग्रॅम प्रथिने
०.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ
३.२ ग्रॅम खनिज
५.३ ग्रॅम तंतुमय पदार्थ
५७.२ ग्रॅम कर्बोदके
३२१ किलो कॅलरी ऊर्जा
२८७ मि.लि. ग्रॅम कॅल्शिअम
३११मि.लि. ग्रॅम फॉस्फरस
८.४मि.लि. ग्रॅम लोह
७१मायक्रोग्रॅम कॅरोटीन (जीवनसत्त्व “अ’चे पूर्वरूप)
०.४०मिलिग्रॅम थायमिन (जीवनसत्त्व “ब’)
०.२० ग्रॅम रायबोफ्लेवीन (जीवनसत्त्व “ब2′)
१.५ मि.लि. ग्रॅम निआसीन (जीवनसत्त्व “ब3′)
१मि.लि. ग्रॅम जीवनसत्त्व “क’
(संदर्भ – Nutritive Value of Indian Foods – NIN, ICAR, Hyderabad).

तसा कुळीथ हा सूज,पाईल्स,उचकी,पोट फुगणे,कृमी,मुतखडा,दमा,खोकला,जुनाट सर्दी,स्थूलपणा ह्या तक्रारींमध्ये पथ्यकर आहे.

आता कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:

१)कुळीथ+भात खिचडी:
चवीला गोड,तुरट,रूक्ष,उष्ण,तृप्तीदायक,भुक वाढविणारी,पचायला हल्की,वातकफ नाशक व पित्तकर असते.

२)कुळीथ कट:
चवीला गोड,तुरट,उष्ण,वातपोटातून पुढे सरकवणारा,वात कफ नाशक,भुक वाढविणारा,मेदाचा नाश करणारा,लघ्वी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.

३)कुळीथ सूप:
तुरट,वातनाशक,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,रक्तवाढविणारा,पचायला हल्का,उष्ण असतो.

४)कुळीथ पीठले:
पचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.

५)कुळीथाची गोड पिठी:
पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविंणारी,उष्ण,शक्तिवर्धक,धातुवर्धक,तृप्तीदायक,चवीला तुरट गोड असते.
कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व अॅसीडीटी होते.
कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.

१) कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.

२) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.

३) अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.

४) कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.

५) या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळिथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे.

संकलक : प्रमोद तांबे

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

1 Comment on कुळीथ (हुलगे)

  1. Dhanywad! This information was useful to share with a colleague running through Kideny stone in USA.
    For those who want to know, in USA Kuleeth is available as Horse grams. Hopefully this comment helps someone.

Leave a Reply to Mahesh Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..