नवीन लेखन...

झीनत अमान

झीनत अमान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ रोजी झाला. ग्लॅमरस दिसणं म्हणजे नक्की काय, हे आपण जेव्हा जेव्हा झीनत अमान ला पाहतो तेव्हा आपल्याला कळतं. हिंदी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सौंदयवती ने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातले, आपला फॅशन सेन्स आणि पडद्यावरील ड्रॅमॅटिक भूमिकांमुळे सदैव चर्चेत राहणा-या झीनत अमान यांचे खरे आयुष्यही तसेच ड्रॅमॅटिक होते. १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिसमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. झीनत अमान यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९७० मध्ये झीनतने वेस्टर्न लूकचा ट्रेंड स्थापित केला. ७० च्या दशकात झीनत यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर त्या झळकत होत्या. सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सिनेमांत त्याकाळी हुक्का आणि सिगारेट ओढणे खूप मोठी गोष्ट होती. झीनतने ‘हरे रामा हरे कृष्णा’मध्ये हुक्का आणि सिगारेट ओढले होते. १९८० साली ‘अब्दुल्लाह’च्या सेटवर झीनत आणि संजयची भेट झाली. फिल्म इंडस्ट्रीत अशीही चर्चा होती, की संजय आणि झीनत यांचे लग्न झाले होते.

मात्र काही सूत्र या बातमीचे खंडन करतात. काही काळानंतर या दोघांच्या अफेअरबद्दल संजयची पत्नी झरीनला समजले होते. मात्र कालांतराने संजय आणि झीनत यांच्यात वाद होऊ लागले. झीनत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मला लग्न करायचे होते, फॅमिली हवी होती, मजहरमध्ये ती क्वालिटी नसतानाही मी त्याला लाईफ पार्टनर म्हणून निवडले.” १९८५ साली झीनत आणि मजहर यांचे लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र मजहर आणि झीनतचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. असे म्हटले जाते, की मजहर तिला मारहाण करायचे. त्रासाला कंटाळून झीनतने मजहरबरोबर घटस्फोट घेतला. सप्टेंबर १९९८ मध्ये मजहर खानचे निधन झाले. संजय खान आणि झीनतचे अफेअर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. मात्र संजय खान विवाहित होते. शिवाय त्यांना तीन मुलेही होती.

राज कपुर हे सत्यम शिवम सुंदरम साठी, राज कपुर एक बोल्ड व्यक्तीमत्वाच्या शोधात होते. असे सांगितले जाते कि झीनत अमान ने आपण किती बोल्ड आहोत हे सिध्द करण्यासाठी जेव्हा राज कपुर ने सांगितले, तेव्हा झीनत ने न्हाणी घरातुन एक बादली पाणि आपल्या अंगावर ओतुन घेऊन थेट राज कपुरांच्या समक्ष उभी राहिली होती, तिथेच तिचे सत्यम शिवम सुंदरम मध्ये वर्णी लागले. सत्यम शिवम सुंदरम मध्ये झीनत ने एकदम नॉन ग्लॅमरस रोल केले, पण एकच गाणं आहे, “चंचल कोमल निर्मल”, या गाण्यात त्यांनी अंग प्रदर्शन तर केलेच आहे, पण पुर्ण चित्रपटात असणारे डिग्लॅम लुक तिने ह्या गाण्यात भरुन काढले आहे.

संपूर्ण कारकिर्दी दरम्यान झीनत अमान यांना “प्रणय प्रतीक” मानले गेले. तिने ‘शालीमार’, ‘यादों की बारात’, ‘अजनबी’, ‘धर्मवीर’, ‘छलिया बाबू’, ‘डॉन’, ‘हीरा पन्ना’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘अलीबाबा आणि चालीस चोर’, ‘दोस्ताना’, ‘कुर्बानी’, ‘राम बलराम’, ‘लावारिस’, ‘गोपीचन्द जासूस’, ‘अशान्ति’, ‘क्रोधी’, ‘चोर के घर चोर’, ‘पु्कार’ आदी चित्रपटात भूमिका केली आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..