तुम्ही जे आहात, ते तुम्ही नाही आहात….

तुम्ही जे आहात, ते तुम्ही नाही आहात; तुम्ही ते आहात, जे तुम्ही बनू शकता !!

जर तुम्हाला एकाएकी खुप पैसे मिळाले तर तुम्ही तुमचे आयुष्य कसे बदलाल??  या प्रश्नाच उत्तर देताना जर तुमचा पहिला निर्णय नोकरी सोडून देईन असा असेल तर ही धोक्याची सूचना आहे हे लक्षात घ्या. अनेक यशस्वी लोकांची जेव्हा तुम्ही आत्मचरित्र वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांनी कामाची एवढी गोडी लावून घेतली होती की ते काम करताना त्यांना खूप मज्जा येत होती किंवा त्यांनी असे क्षेत्र निवडले ज्याची त्यांना आवड होती त्यामुळे ती काम त्यांनी मनापासून केली आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते.

स्वतःशी नेहमी प्रामाणिक रहा.आपण करत असलेल्या कमात आपण खुश आहोत का? ,आपण जशा आयुष्याची स्वप्न पहिली होती ते हेच आहे का ? ,आपण करत असलेल्या कामाचे समाधान आपल्याला मिळते आहे का ? असे स्वतः ला नेहमी प्रश्न विचारत जा.तुमचे मन तुम्हाला खरी उत्तर देईल.कदाचीत काहींना या सगळ्या प्रश्नांची उत्तर नकारात्मक मिळतील पण म्हणून तुम्ही यासाठी परिस्थितीला जबाबदार ठरवू नका किंवा नशीबावर त्याचे खापर फोडू नका कारण स्वतःला जे करायची इच्छा आहे त्यासाठी लागणार धैर्य ज्यांचाकडे नसत ते अशा सबबी देतात आणि स्वतःचा आयुष्याचे नुकसान करतात म्हणून समोरच्या परिस्थितीचा सामना करा.आपला आनंद,समाधान कशात आहे ते शोधा.

आपल्या समाजात असे कित्येक लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात सुख समाधान नहिये हे कळल्यावर तिथून काढता पाय घेतला.आपले ज्यावर प्रेम आहे,अशाच गोष्टी आपण करत राहणार आहोत हे ठरविण्याचे धैर्य त्याचामध्ये होत.त्यांनी आपल्या कला ,गुण ,कौशल्य आणि क्षमता यांचे व्यवस्थित मूल्यमापन केले.अस करून त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि ते यशस्वी ठरले.

आपल्या प्रत्येकाकडे असे गुण,कौशल्य आहेत एखाद्या कमाबद्दल की ती गोष्ट फक्त आपणच चांगल्या पद्धतीने करू शकतो,आपल्याला फक्त ते कौशल्य जाणायचे आहे म्हणजे आपली आवड ओळखायची आहे.एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असली की ती गोष्ट आपण मनापासून करतो मग त्याचे आपल्याला समाधान मिळते ,आणि आपण आनंदी होतो.तुम्ही जर तुमची खास वैशिष्ट्य ओळखली तर तुम्ही अल्पावधीतच यश साध्य करू शकता जे मिळवण्यासाठी कित्येक लोकांच आयुष्य पणाला लागत.

काही लोकांना आपल्या आवडीनिवडी,आपली क्षमता,आपण कशात हुशार आहोत हे माहीत असत, पण पैसे अभावी ते करणे शक्य होत नाही.अशा लोकांनी आपल्या आवडीसाठी थोडा वेळ द्यायला हवा छोटीशी का होईना पण हळूहळू स्वप्नांच्या दृष्टीने सुरुवात करायला हवी.शेवटी ईच्छा तिथे मार्ग असतोच.

काही लोकांची गोष्ट वेगळी असते.ते आताच्या कामात खुश तर नसतात पण असलेल काम सोडून आपला कल नक्की कशात आहे याचे उत्तर त्यांचाकडे नसत.म्हणजेच त्यांना त्यांच्या कलागुणांचा सुगावा लागलेला नसतो. अशा लोकांनी आपल्याला ओळखणाऱ्या,आपली कदर करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा.ते लोक बऱ्याचदा तुम्हाला एखादी चांगली कल्पना किंवा उद्दिष्ट सांगून जातात.ज्यांनी आपले आयुष्य बदलु शकत.तुम्हाला काय काय करायला मज्जा येते किंवा तुम्हीं कोणत्या कामात उत्कृष्ट आहात याकडे लक्ष दया.या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी बनवण्यात मदत करतील.

शेवटी मी एवढच सांगेन की आवडीचे काम करा किंवा करत असलेल्या कामाची आवड निर्माण करा. एकदा तुम्हाला कळले की ते काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करु शकता मग पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.नेहमीप्रमाणे यावेळी पण मी सांगेन तुमच्यामध्ये एक जादू आहे काहीही करून दाखवयची. तुमचे कौशल्य सिद्ध करून या जगाला तुम्ही जे आहात ते दाखवा.

— अपूर्वा रविंद्र जोशी 

Avatar
About अपूर्वा जोशी 6 Articles
मी अपूर्वा जोशी. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…